दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या भावनेतून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी शेतकऱ्या��सह दिवाळी साजरी करत आहेत. याच उपक्रमांतर्गत शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते मा. श्री. भाऊसाहेब चौधरी यांनी दुगाव येथील शेतकरी कुटुंबासह फराळाचा आनंद घेत दुष्काळामुळे होणारा त्रास आणि शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींवर चर्चाही केली. चांदवड–देवळा विधानसभा मतदारसंघातील ५ हजार शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी वस्तीत प्रत्यक्ष भेट देऊन हजारो कु���ुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले. केवळ दिवाळीचा शिधाच नव्हे, तर दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याचाही संकल्प यावेळी करण्यात आला.
'भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक पोहचेल बांधावर!' या ��ा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी शिवसेनाच !
#Diwali #Shivsena #EknathShinde #maharashtra #farmers #Drought
रुग्णांच्या जीवाशी तडजोड नाही; रत्नागिरीतील पाचही डायलिसिस केंद्रांसाठी मोठा निर्णय!
रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील डायलिसिस सेवा बंद असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल आणि एचएलएल कंपनीच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली.
डायलिसिससारखी अत्यावश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद राहता कामा नये, ही माझी ठाम भूमिका आहे. त्याचप्रम���णे राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनीही यासंदर्भात आग्रही भुमिका घेतलेली आहे. त्यामुळं संबंधित कंपनीला आठ दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर सेवा चालविण्यास असमर्थता दर्शविल्यास जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रं जिल्हा आरोग्य विभागामार्फत चालविण्याचा निर्णय घेतला.
यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या वेतनाची व्यवस्था आउटसोर्सिंग किंवा सीएसआर निधीतून करण्याचं नि��ोजन आहे. भविष्यात आर्थ��क अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सीएसआरच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. डायलिसिस संदर्भातील रत्नागिरी जिल्ह्याचा हा निर्णय राज्यभरासाठी दिशादर्शक ठरु शकेल. रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक किंवा प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू नये. त्यांच्या आरोग्याशी तडजोड न करता अखंडित डायलिसिस सेवा उपलब्ध करून देणं, हीच आमची प्राथमिकता आहे!
@Shivsenaofc @Dev_Fadnavis @mieknathshinde
#udaysamant #udaysamantsaheb #Ratnagiri #DialysisServices #Healthcare #PatientCare #HealthcareForAll #PublicHealth #HealthInfrastructure #UninterruptedDialysis #DistrictAdministration #CSRInitiative #UdaySamant #KiranSamant #Maharashtra #आरोग्यसेवा #डायलिसिससेवा #रत्नागिरी #रुग्णसेवा #आरोग्यसुविधा #अखंडितडायलिसिससेवा #रुग्णांचंआरोग्य #जनसेवा #महाराष्ट्रविकास
Eknath Shinde Live I कुलाबा, मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित आश्रय यो��ना कक्ष, टप्पा २ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांचा चाव्या वाटप कार्यक्रम - लाईव्ह https://t.co/WvSWGpSyyW
📍 #मुंबई |
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची ४५ वी बैठक आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) रखडलेल्या काही प्रकल्पांची जबाबदारी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने घेऊन हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी असे निर्देश याप्रसंगी दिले.
यासोबत सप्टेंबर २०२६ अखेरच्या आढाव्यानुसार खासगी विकासकांकडे वितरित केलेल्या ६६७ संक्रमण सदनिकांच्या भाड्यापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही थकीत भाड्याची रक्कम प्राधान्याने वसूल करण्याचे निर्देशही यावेळी ��िले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत #बदलापूर येथील #जोवेली येथे ४ हजार ५९० आणि #कल्याण तालुक्यातील माणिवली येथे ५ हजार ३३० अशी एकूण ९ हजार ९२० परवडणारी घरे उभारण्याच्या प्रस्तावाचाही आढावा यावेळी घेतला. सर्व प्रकल्प अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट आणि विकासक यांना सहभागी करून घेण्याचे निर्देशही याप्रसंगी दिले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक लहू माळी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
#Thane #Kalyan #Badlapur #EknathShinde #Maharashtra
मुंबई महानगरपालिका आयोजित आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्यांचे वितरण उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमु��� उपस्थितीत आज कुलाबा, मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी त्यांनी मांडलेल�� ठळक मुद्दे:
#Shivsena #Eknathshinde #Maharashtra #mumbai
Shivsena Live I मुंबई ना.म. जोशी मार्ग लोअर परेल बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ पुनर्वसन सदनिकांचा वितरण समारंभ - लाईव्ह https://t.co/GympSB7Lbd
Eknath Shinde Live I नंदनवन निवासस्थान, मुंबई
हृदयशस्त्रक्रिया व कॉकलर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेली बालके व त्यांच्या पालकांच्या समवेत आयोजित दिवाळी स्नेहमेळावा - लाईव्ह https://t.co/QDQB0tJVUq
📍 #मुंबई |
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ येथील बीडीडी चाळीत राहणाऱ्या ५५७ कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या ५०० चौरस फुटांच्या सुसज्ज घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. मुख्यमंत्र�� देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार की नाही, अशी चर्चा गेली अनेक वर्षे सुरू होती; मात्र आता १०० टक्के बीडीडी प्रकल्प वेळेत पूर्ण होणार, याची खात्री बाळगा असे नमूद करून आमचा पाय ब्रेकवर नसून एक्सेलटरवर आहे, त्यामुळे हा प्रकल्प नक्की वेळेत पूर्ण होईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
क्लस्टर व��कासातून उद्याने, मोकळ्या जागा, क्लब हाऊस आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. शापूरजी, टाटा, एल अँड टी सारख्या विकासकांनी गुणवत्ता आणि वेळेचे पालन करावे, सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी दिल्या.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार सुनील शिंदे, आमदार मनीषा का��ंदे, #शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडाचे मिलिंद शंभरकर, मिलिंद बोरीकर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर आणि लाभार्थी उपस्थित होते.
#Mumbai #EknathShinde #Maharashtra
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @rahulnarwekar @AhirsachinAhir @ShelarAshish @milinddeora @KayandeDr @ShainaNC
📍छत्रपती संभाजी नगर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा ८० टक्के समाजकारणाचा विचार जपत, मा. एकनाथजी शिंदे साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दुष्काळाच्या संकटातही प्रत्येक शेतकरी कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी प्रत्येक कुटुंबांपर्यंत दिवाळीचा शिधा पोहोचवला जात आहे. संकट कितीही मोठं असलं तरी शिवसेना बळीराजासोबत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, त्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश उजळावा, हीच या मदतीमागची भावना आहे !
#Shivsena #ShivSenaForFarmers #maharashtra #EknathShinde #HappyDiwali #farmers #drought
📍 #मुंबई |
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजना कक्ष टप्पा दोन अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्या वाटपाचा शुभारंभ सोहळा आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कुलाबा येथील राजवाडकर मार्गावरील पंचशील नगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात १४० सफाई कर्मचाऱ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्या��� आल्या.
मुंबईचे आरोग्य जपणाऱ्या आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. सफाई कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो असून त्यांना चांगले जीवनमान आणि सन्मानाचे निवासस्थान मिळणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना पूर्वी १५० चौरस फुटांची घरे मिळत होती, ��ता ३०० चौरस फुटांची प्रशस्त घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने आणि दर्जेदार घरांचे बांधकाम करण्याचा महापालिकेचा हा अभिनव प्रयोग आहे. ही घरे १०० वर्षांपेक्षा अधिक काळ टिकावीत, अशा गुणवत्तेवर भर देण्यात आला आहे. लाड-पागे समितीच्या तरतुदींनुसार पात्र कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत असून, पुढील टप्प्यात उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांनाही घरे दिली जातील असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, #शिवसेना गटनेते अमे�� घोले, अतिरीक्त आयुक्त विपीन शर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Mumbai #EknathShinde #Maharashtra
@Dev_Fadnavis @rahulnarwekar @AmeyGhole
📍 #मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांची आज मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच��यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा लोकसेवेसाठी कार्यरत व्हावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि खासदार मिलिंद देवरा उपस्थित होते.
#SharadPawar #Mumbai #EknathShinde #Maharashtra
@PawarSpeaks @AhirsachinAhir @milinddeora
मदतीचं तोरण,
हेच शिवसेनेचं धोरण!
बळीराजा हा महाराष्ट्राच्या विकासाचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोणतेही संकट आले, तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे व शिवसेनेने कायमच घेतली आहे. यंदाच्या दुष्काळामुळे अनेक श���तकरी कुटुंबांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या घरची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी आणि सणाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या भावनेतून शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेच्या वतीने ‘दिवाळीचा शिधा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिधा घेऊन जाणारे १०० ट्रक रवाना करण्यात आले. या अभियानांतर्गत राज्यातील विविध भागांतील गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत टप्प्याटप्प्याने मदत पोहोचविण्यात येत आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत, तर अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्यासह शिवसैनिकांच्या उपस्थ��तीत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.वैजापूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप आणि संजय बोरनारे यांनी, तर छत्रपती संभाजी नगर मध्य मतदारसंघात शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल आणि किशोर नागरे यांनी दिवाळीचा शिधा दिला.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे तालुकाप्रमुख योगेश नंदन पाटे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, तालुका संघटक प्रदीप देवकर, पं��ायत समिती सदस्य जयसिंग पोते, पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघा काकडे आणि जीवन शिंदे यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. तसेच, सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व नेत्यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळीच्या शिधा देण्यात आला.
संकटाच्या काळात बळीराजाची दिवाळी काळी होऊ नये, यासाठी शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक थे��� शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे.
#ShivSenaForFarmers #Shivsena #EknathShinde #maharashtra #महाराष्ट्र #बळीराजा