भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. @NCPspeaks ने @ShivSena व @INCMaharashtra यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. @AjitPawarSpeaks यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.
#सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेचे उमेदवार दीपक पवार आणि लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना आपल्याला जिंकून आणायचेच आहे.
#NCP2019
साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय @PawarSpeaks साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय,इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं @NCPspeaks च्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली.
“गरिबीचे निर्मूलन” हा विषय सध्या बाजूला पडलेला असताना एका भारतीय अर्थतज्ञाला त्यानी गरिबी निर्मूलनाचं शास्त्र मांडलं म्हणून नोबेल पुरस्कार मिळणं हा योगायोग म्हणायचा की जगानं दिलेला इशारा? अभिजीत बॅनर्जी ह्यांचं मन:पूर्वक अभिनंदन !
मराठी कळत नाही ही सबब मुळीच खपवून घेणार नाही, हायकोर्टाने बजावले https://t.co/q8bkZqBC3h
#महाराष्ट्रात#मराठी येत नाही ही कारणे देणाऱ्याला उच्चन्यायालयाने फटकारले
महाराष्ट्रात राहायचे तर मराठी शिकून घ्या - High Cout Mumbai
#मराठीएकीकरणसमिती च्या वतीने मा.न्यायालयाचे आभार.
लोकसभा निवडणूक होऊन चार महिने झाले परंतु अजून निवडणूक आयोगानं त्यांची आकडेवारी अधिकृत म्हणून जाहीर केलेली नाही.. निवडणूक प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून ईव्हीएम वापरलं ना? मग चार महिन्यांनी सुध्दा अंतिम आकडेवारी का नाही? काय गडबड आहे? वाचा : https://t.co/ubfcm1etRV
जगातल्या अनेक देशांना लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी फार झगडावं लागलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यासोबत लोकशाही आपसूक आली. आपल्याला त्याचं "मूल्य" कळलं नाही.. आता लोकशाहीसाठी झगडावं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते हेच खरं..