कार्यकर्ता पदाधिकारी संवाद बैठक
: प्रमुख मार्गदर्शक
सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
दिनांक : 11 ऑगस्ट 2026
वेळ : दुपारी 1 वाजता
स्थळ : शासकीय विश्रामगृह, नांदेड
#VBAForMaharashtra#VBAForIndia
जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा - राजेंद्र पातोडे
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. ही घटना केवळ दुर्दैवी अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवास व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाची कार्यक्षमता यावर या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करून कार्यवाही आणि राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे सोशल ऑडिट करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी ई-मेलद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना केली आहे.
९ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात ७९ विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या होत्या. त्यापैकी सापाने सहा विद्यार्थिनींना दंश केला. त्यापैकी दीपिका लाकडा, सुष्मिता मांडल आणि अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. ही अत्यंत गंभीर घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे निवेदन देऊन जपतलाई दुर्घटनेची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तसेच एका आश्रमशाळेची चौकशी करून प्रश्न संपणार नाही. जपतलाईच्या घटनेची चौकशी आवश्यक आहेच; मात्र राज्यातील हजारो विद्यार्थी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये राहत असल्याने संपूर्ण व्यवस्थेची तपासणी होणे गरजेचे आहे. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे आणि छात्रालयांचे तातडीने सामाजिक सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी वंचितने केली आहे.
या सर्वेक्षणामध्ये इमारतींची सुरक्षितता, वीज व्यवस्था, स्वच्छता, साप-विंचू व इतर विषारी प्राण्यांपासून संरक्षण, विद्यार्थ्यांची निवास क्षमता, खाटा व झोपण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आहार व पोषण, वैद्यकीय सुविधा, औषधसाठा, आपत्कालीन उपचार व्यवस्था, शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, शैक्षणिक सुविधा तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा प्रत्यक्ष वापर यांची तपासणी करण्यात यावी.
हे सर्वेक्षण केवळ कागदोपत्री न करता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून करण्यात यावे. यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यावर प्रशासनाने केलेली कार्यवाही याचीही तपासणी करावी. त्याचा १५ दिवसांत अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. राज्यातील सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांचे सर्वेक्षण १५ दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
ज्या ठिकाणी गंभीर त्रुटी आढळतील, त्या तातडीने दूर कराव्यात. धोकादायक वसतिगृहांमध्ये आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्यायी निवास उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक आश्रमशाळेत सर्पदंश, आग, विद्युत अपघात आणि इतर आपत्कालीन परिस्थितींसाठी २४ तास आपत्कालीन वैद्यकीय व प्रतिसाद व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
जपतलाई दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य आर्थिक मदत व पुनर्वसनाची व्यवस्था करावी. जखमी विद्यार्थिनींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उभारलेल्या आश्रमशाळांमध्ये त्यांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची हमी शासन देऊ शकत नसेल, तर सामाजिक न्यायाच्या घोषणा निरर्थक आहेत, असा आरोप राजेंद्र पातोडे यांनी केला. जपतलाई दुर्घटनेची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
साप वसतिगृहात कसा शिरला, विद्यार्थिनी जमिनीवर का झोपत होत्या, सुरक्षा व्यवस्था कुठे कमी पडली, निधीचा वापर कसा झाला आणि यापूर्वीच्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली, याची संपूर्ण माहिती जनतेसमोर आली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रयस्थ आणि निष्पक्ष यंत्रणेचा वापर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
तीन विद्यार्थिनींचा जीव गेला आहे. हा केवळ अपघात म्हणून विषय संपवता येणार नाही. दोषींवर कारवाई झाली नाही आणि राज्यातील आश्रमशाळांचे तातडीने सामाजिक सर्वेक्षण झाले नाही, तर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने ‘जवाब दो’ आंदोलन उभारेल, असा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला.
दिल्लीतील विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याचा घटनाक्रम असंवैधानिक आणि अत्यंत क्रूर आहे. विद्यार्थ्यांवर वॉटर कॅनन आणि टियर गॅस वापरले गेले. खिळे असलेल्या काठ्यांनी मारहाण केली गेली. बॅरिकेड्सना करंट लावलेला होता. भारताच्या इतिहासात असे कुठे झाले नाही.
दिल्ली पोलीस हे अमित शहांच्या कंट्रोलमध्ये आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर काम करते. विद्यार्थ्यांवर जो हल्ला केला, तो गृहमंत्री अमित शहांच्या इशाऱ्याने झाला आहे.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#Students #NEETExam #Exam
📍लातूर
कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक
वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात लातूर येथे कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक संपन्न झाली. पक्षाने उचललेले मुद्दे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची आखणी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधून सुजात आंबेडकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी मराठवाडा महासचिव संतोषभाऊ सूर्यवंशी, गटनेते म.न.पा. लातूर अमोल लांडगे, जिल्हा महासचिव ॲड. रोहित सोमवंशी, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, महिला शहराध्यक्ष सुजाता अजनीकर, युवा जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड व सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शाखाध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
#VBAForMaharashtra #VBAForIndia
आज मिरज, सांगली येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यात अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला, हीच परिस्थिती महाराष्ट्रभर आहे.
प्रत्येक जिल्हा-तालुक्यात वंचित बहुजन आघाडीत येणाऱ्यांचा कल आणि संख्या वाढताना दिसत आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे युवकांसमोरचे प्रश्न समजून घेण्यात अपयशी ठरले आहेत.
ज्या युवकांना राजकीय प्रतिनिधित्व हवे आहे, स्वतःची राजकीय भूमिका घेऊन महाराष्ट्रात उभे राहायचे आहे, त्यांना आपला हक्काचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी दिसत आहे.
गेल्या पाच वर्षांत अतिक्रमण, स्मार्ट मीटर, गायरान जमीन, बोधगया महाबोधी महाविहार, TET पेपरफुटी अशा अनेक प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली. अन्याय-अत्याचार झाला की एका फोनवर धावून येणारे कार्यकर्ते म्हणून जनतेचा विश्वास 'वंचित'वर वाढत आहे.
इतर पक्षांवरील विश्वासार्हता संपत असताना भाजप विरुद्ध लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडीच आहे, हे सिद्ध झाल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडले जात आहेत.
जसे आपण भाजपला विचारांनी हरवतो, रस्त्यावरील आंदोलनाने हरवतो, तसेच भाजपला प्रत्येक बूथवर निवडणुकीतही हरवायचे आहे. अशी खूणगाठ सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बांधावी. त्यासाठी प्रत्येक शहर, वॉर्ड, गण आणि गावात शाखा उभी करून पक्षाची मजबूत बांधणी करावी.
प्रत्येक गावात १० जणांची कमिटी आणि ‘गाव तिथे शाखा’ या भूमिकेतून पुढील काही महिन्यांत बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचा विचार आणि भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी.
नव्याने पक्षात आलेल्या तरुणांचे स्वागत आहे.
#VBAForIndia
उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ८ खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत.
सगळं काही लपवताही येत नाहीये. सगळं काही उघडपणे होत आहे!
बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच म्हटले आहे की, शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष नेहमीच भाजपला पाठिंबा देत आले आहेत. निवडणुका असोत किंवा मोदींची स्तुती, लग्नांच्या माध्यमातून आरएसएससोबत संबंध दृढ करणे असो किंवा रात्रीच्या अंधारात आरएसएससोबत सरकार स्थापन करणे असो, किंवा जाती-जातीवर आधारित आरक्षण संपवण्याबद्दल बोलणे असो, शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने नेहमीच भाजपला पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुरोगामी बनून मते मिळवण्याचा प्रयत्न करून, लोकांची दिशाभूल करून आणि वारंवार भाजपचा अजेंडा राबवून जनतेला फसवले आहे.
निवडणुकीच्या काळात फुले-शाहू-आंबेडकर ओठांवर असतात, पण आरएसएस-भाजप मनामध्ये आणि हृदयात असतात.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजप समर्थक आहेत. आम्हाला याचे आश्चर्य वाटत नाही. तुम्ही मोदींना भेटून भाजपचे सदस्य असल्याची घोषणा कधी कराल, याचीच आम्ही वाट पाहत आहोत.
@supriya_sule@shindespeaks@Awhadspeaks
#BJP_NCP_SP #भाजप_राष्ट्रवादी
My warning to the RSS chaddiwalas —
If the RSS does not stop sowing divisions among the Scheduled Castes, then this time the community will neither think twice, nor care about anything, nor seek permission for a protest. We will simply descend in full force in front of the RSS’s doorsteps.
The last time we protested in Nagpur, RSS had to leave their office. This time, we will get it shut down altogether. In any case, the entire organisation is unregistered.
And remember, the community recognises your “salespersons” you have in the market. The community will go to their doorsteps as well.
संघ है और संघ का एक अंग है, आज यही लोग “देशांतर्गत राजनीति” चला रहे हैं, बाकी बहुजन समाज केवल “प्रेक्षक” बनकर रह गया है। इस एकतरफ़ा राजनीतिक व्यवस्था में बदलाव आना बेहद ज़रूरी है।
“भाजप विरुद्ध लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडीच आहे, हे सिद्ध झाल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडले जात आहेत” - सुजात आंबेडकर
आज मिरज, सांगली येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यात अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला, हीच परिस्थिती महाराष्ट्रभर आहे.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#VBAForMaharashtra #VBAForIndia
आरएसएस के चड्ढीधारो को मेरी चेतवानी -
अगर आरएसएस ने अनुसुचित जातियों में फूट डालना बंद नहीं किया तो समाज इस बार ना सोचेगा, ना कुछ देखेगा, ना आंदोलन की परमिशन लेगा, बस आरएसएस के दरवाजे के सामने पूरी ताकत से टूट पड़ेगा।
पिछली बार जब नागपुर में आंदोलन किया था तो ऑफिस छोड़ के जाना पड़ा था, इस बार बंद ही करवा देंगे। वैसे भी पूरा संगठन अपंजीकृत है।
और याद रखो, आपके जितने मार्केट में दुकानदार हैं, उनको समाज के लोग पहचानते हैं। उनके दरवाज़ों पे भी समाज के लोग जायेंगे।
जनतेने संधी दिली, वंचित जनतेचा आवाज बनला आहे.
भाजप नगरसेवक जोपर्यंत संविधान मान्य आहे म्हणत नाही तोपर्यंत भाजप नगरसेवकांना बोलू देणार नाही वंचितांचा आक्रमक भूमिका
लातूर महानगरपालिका मध्ये भाजपा नगरसेवक संवेदनशील मुद्द्यावर कायदा बाजूला ठेवून चर्चा करा असे म्हटल्यावर वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अमोल लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेत कायदा बाजूला ठेवून चर्चा करा हे कोणत्या आधारावर बोललात असा प्रश्न विचारला.
देश संविधानावर चालतो असे वक्तव केल्यामुळे भाजपा सभागृहात व्यक्त करावे लागेल की आम्हाला संविधान मान्य आहे म्हणून अन्यथा आम्ही सभागृहात चर्चा होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी घेतली.
#Constitution #संविधान #Latur
संपूर्ण महाराष्ट्रात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरतीची जाहिरात आली आहे, त्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींच्या जागा जाणीवपूर्वक कमी करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात पोलीस भरतीमध्येही सरकारने जाणीवपूर्वक अनेक जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींच्या जागा शून्य दाखवून पोलीस भरती केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या प्रश्नाचा ठामपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय राज्य कमिटीने घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तातडीने सरकारकडे मागणी करणार आहोत की, पवित्र पोर्टलवरील जाहिरात तत्काळ मागे घ्यावी. पोलीस भरतीची चौकशी व्हावी आणि रोस्टर पद्धतीने आरक्षण लागू झाले पाहिजे. त्याच पद्धतीने भरती झाली पाहिजे. जर असे झाले नाही तर, वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात याविरुद्ध आंदोलन करेल.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण #VBAForIndia
जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली, वंचित जनतेचा आवाज बनली आहे.
नीट पेपरफुटीमुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना आदरांजली अर्पण करूनच सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात यावे, असा आग्रह वंचित बहुजन आघाडीचे लातूर महानगरपालिकेचे गटनेते नगरसेवक अमोल लांडगे यांनी धरला. त्यानंतर सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांना आदरांजली अर्पण करून सभेला सुरुवात केली.
#NEET #Students