इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिनरने सलग पाचव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम १६ मध्ये (चौथ्या फेरीत) प्रवेश करून एक नवीन विक्रम रचला आहे. याआधी पहिल्या फेरीत त्याला ५ सेटपर्यंत झुंजावे लागले होते. कार्लोस अल्कराझ या स्पर्धेत खेळत नसल्यामुळे सिनरला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे
विम्बल्डनमध्ये मोठा उलटफेर!
गतविजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा श्वीआंतेकचा विम्बल्डन २०२६ मध्ये धक्कादायक पराभव! फिलिपिन्सच्या अलेक्झांड्रा इआलाने तिसऱ्या फेरीत इगाचा ७-६, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत तिला स्पर्धेतून बाहेर काढले.
#wimbledon
आज इतिहास घडणार! 🇮🇳
सचिन तेंडुलकरपेक्षाही लहान वयात (१५ वर्षे ९९ दिवस) पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी आज टीम इंडियासाठी मैदानात उतरतोय. संपूर्ण देशाचे प्रेम आणि लक्ष या तरुण खेळाडूवर आहे. एका नव्या वैभवशाली कारकिर्दीची सुरुवात! ✨
#EngvInd#TeamIndia#Cricket#VaibhavSooryavanshi
सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने फ्रान्सच्या आर्थर रिंडरनेकचा ७-५, ६-४, १-६, ७-६ असा पराभव करत चौथ्या फेरीत (Round of 16) धडक मारली आहे. या विजयासह जोकोविचने ओपन एरामध्ये १८व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत पोहोचून दिग्गज रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
#wimbledon
भारतासाठी दुहेरी सुवर्णक्षण! 🇮🇳🥇🏹
नवे मेस्टो पॅरा आर्चेरी मालिकेत भारताच्या मिश्र संघाने इतिहास रचला:
👉 शीतल देवी आणि श्याम सुंदर स्वामी (कंपाऊंड प्रकार - सुवर्ण) 👉 हरविंदर सिंग आणि भावना (रिकर्व्ह प्रकार - सुवर्ण)
आपल्या चॅम्पियन्सचा अभिमान आहे! 🎉
#GoldMedal#ProudIndian
नाओमी ओसाकाची शानदार घोडदौड:
जपानच्या नाओमी ओसाकाने ऑस्ट्रेलियाच्या डारिया कसात्किनाचा ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत 'राउंड ऑफ १६' (चौथ्या फेरीत) प्रवेश केला आहे. ओसाकाने तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे.
#Wimbledon
तन्वी खन्नाने पटकावले विजेतेपद! 🇮🇳🏆
मुंबईत झालेल्या 'HCL स्कॉश PSA चॅलेंजर टूर २०२६' मध्ये भारताच्या तन्वी खन्नाने अप्रतिम पुनरागमन करत एक संस्मरणीय विजय नोंदवला आहे.
भारतीय स्टार खेळाडू तन्वीने अंतिम सामन्यात इजिप्तच्या फरिदा वालिदचा ५ गेम्सच्या अटीतटीच्या लढतीत पराभव केला.
🎾 विम्बल्डन २०२६:
इगा श्वीआतेकची विजयी घोडदौड!
गतविजेत्या श्वीआतेकने माजी जागतिक नंबर १ खेळाडू कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. 🌟
#wimbledon
विम्बल्डन मधील भारताचे आव्हान आजच सुरु झाले आणि आजच संपले देखील.
युकी भाम्बरी, बालाजी आणि अनिरुद्ध चंद्रशेखरन हे तिघेही आपापल्या साथीदारांसोबत पहिल्या फेरीतच गारद झाले.
भारतीय टेनिसची अवस्था सध्या अतिशय हलाखीची बनली आहे.
#wimbledon#IndianTennis#KJTennis
#आजच्यादिवशी २००६ साली, द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजला १-० ने हरवले. ३५ वर्षांच्या कालावधीनंतर विंडीजमध्ये भारताने फक्त दुसर्यांदा कसोटी मालिका जिंकली होती.
दौऱ्यामध्ये सर्वाधिक धावाः द्रविड ४९६
सर्वाधिक बळी : कुंबळे २३
मालिकावीर : द्रविड
#RahulDravid#OnThisDay
फिफा वर्ल्ड कप: इंग्लंड, बेल्जियम आणि अमेरिकेने उप-उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक! 🤩🔥
⚽️ इंग्लंडने डी. आर. काँगोचा २-१ ने केला पराभव.
⚽️ बेल्जियमने सेनेगलवर ३-२ ने मिळवला विजय.
⚽️ अमेरिकेने बोस्निया आणि हर्झगोव्हिनाचा २-० ने उडवला धुव्वा.
#FIFAWorldCup#KJFootball
आंतर-राज्य राष्ट्रीय स्पर्धेत (Inter-State Nationals) सुवर्णपदक जिंकून आणि राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केल्यानंतर, सर्वेश कुशारे आता मोनॅको येथील डायमंड लीग स्पर्धेत भाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे! 🇮🇳🏅🏃♂️
#SarveshKushare#DiamondLeague#MonacoDL#TeamIndia#Athletics
ऑलिंपिक मध्ये २३ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य अशी तब्बल २८ पदके जिंकलेला तसेच ७ विश्वविक्रम नावे असणारा सर्वश्रेष्ठ जलतरणपटू मायकल फेल्प्सचा आज जन्मदिवस. 🏊
फेल्प्सला जर एक देश मानले तर तो आतापर्यंतच्या ऑलिंपिक क्रमवारीत २३व्या स्थानी आहे.🙏 #महान#HappyBirthday@MichaelPhelps 🎂
श्रीलंकेचा महान अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०००० धावा, ३०० बळी, १०० झेल पकडणारा एकमेव खेळाडू आहे जयसूर्या.
#HappyBirthday#Jayasuriya#क्रिकेटजगत#मराठी
मोरोक्कोने वर्ल्ड कपच्या अंतिम १६ मध्ये धडक मारली आहे.
एका अत्यंत थरारक सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे लागला. १० पैकी ५ पेनल्टी हुकल्या आणि केवळ एकच पेनल्टी रोखली गेली; अखेर मोरोक्कोने हा शूटआऊट ३-२ ने जिंकला
नेदरलँड्सनी आजवर ५ पैकी केवळ १ च शूटआऊट जिंकला आहे.
#KJFootball
आनंदाची बातमी 🎉
भारतीय महिला क्रिकेट संघ लॉस एंजलिस ऑलिंपिक २०२८ साठी पात्र.🇮🇳👏
सध्या चालू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत आशिया खंडातून अव्वल स्थान प्राप्त केल्यामुळे भारताला ही पात्रता मिळाली.
T20 क्रिकेटचा पहिल्यांदाच ऑलिंपिक मध्ये समावेश करण्यात आला आहे.
#TeamIndia#LA28
शेवटच्या मिनिटाला गोल मारत ब्राझीलने जपानला २-१ ने हरवले.
विजयी गोल मार्टीनेलीने केला.
ब्राझील उप उपांत्यपूर्व फेरीत दाखल.
#FifaWorldCup#brazil#Japan#BraJpn
फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठी उलथापालथ! 🚨
बलाढ्य जर्मनीला पॅराग्वेने धूळ चारली.
खेळाच्या मैदानात कोणीच कायमचा 'किंग' नसतो हेच खरं! पॅराग्वेचा ऐतिहासिक विजय, तर जर्मनीसाठी हा मोठा धक्का. ⚽🔥
ज्यादा वेळेतील १-१ बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊट मध्ये पॅराग्वेने मारली बाजी.
#KJFootball