दादा.. तुमच्या आठवणी कायम मनात राहतील. तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे संस्कार आणि जनतेसाठी जगण्याची प्रेरणा आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करू. तुमच्या कार्याचे ऋण आणि तुमच्या प्रेमाची उब आम्ही कधीही विसरू शकणार नाही.
तुमच्या पवित्र स्मृतींना व कार्यकर्तृत्वाला जयंतीदिनी त्रिवार अभिवादन!
आज पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादी परिवारातून आपल्याच राष्ट्रवादी परिवारात आल्याची भावना आहे.
आपणा सर्वांच्या अथक सेवेचा हा वसा पुढं-पुढं घेऊन जाण्याचा निर्धार आज करतोय. प्रश्नांना न्याय देऊ. अन्यायाला वाचा फोडू!
चालत राहू, लढत राहू.
जय राष्ट्रवादी!
��ुंबई येथे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते जीवाभावाचे शेकडो सहकारी, माझ्या हजारो संवगड्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला! मा. नवाब मलिक साहेब, आ. राजेशदादा विटेकर व पक्षाचे मान्यवर नेते याप्रसंगी उपस्थित होते.
या आपल्या परंपरेला नवा आयाम दिल्याची भावना याक्षणी मनात आहे.
ना. अजितदादांबरोबर आम्ही मागील अनेक वर्ष�� काम केलं. दादांच्या कामाचा धडाका अवघ्या देशाला ठावूक आहे. ‘जिवाभावाचे दादा’ हा त्यांचा महाराष्ट्राला असलेला परिचय आम्ही कैकवेळा अनुभवला.
चैत्रशुद्ध उषःकाल, नव्या स्वप्नांची पहाट, संस्कृतीच्या सुवर्ण किरणांत गुढी उभारूया नवचैतन्यांची, निष्ठेच���, उत्तुंग भरभराटीची... मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या आपणास व आपल्या परिवारास मनस्वी शुभेच्छा!
#Gudhipadwa2025
तुम्हा आम्हाला केवळ फोटो बघून�� वेदना होत असतील तर त्या जिवंत माणसाने हे हाल कसे सहन केले असतील हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
अत्यंत क्रूर व पाशवी कृत्य
स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना ठेचून काढलं पाहिजे एवढच म्हणावं वाटत.
हजारो जिंतूर-सेलूकर जनतेच्या उदंड उपस्थितीत देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांची झंजावाती सभा सेलू शहरात पार पडली.
महावरदायिनी ल���्ष्मी आईसाहेबांची निवासस्थानी संपूर्ण परिवारासह पूजा केली. आजचे लक्ष्मीपूजन आपणा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धीचे तेज घेऊन येवो, ही प्रार्थना करून आपणा सर्वांचे यश, भरभराटी चिंतितो. 🙏🏻
माझ्यावर उमेदवारीची जबाबदारी देत विश्वास टाकल्याबद्दल आदरणीय @PawarSpeaks साहेब, प्रांताध्यक्ष @Jayant_R_Patil साहेब, तसेच महाविकास आघाड���चे सर्व नेतृत्व, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्यांच्या उत्थानासाठी मी सतत कार्य करत आलो त्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेचे आभार मानतो
रतनजी टाटा गेल्याचा कळलं! तमाम भारतीयांच्या मनात स्वतःचं अतुल्य, ध्रुवताऱ्यासारखं स्थान कायम ठेवत आपल्या कार्याने भारतीयांना आनंद देऊन गेले. एका तपस्वीचं आयुष्य जगताना देशसेवेची तपस्या करत राहिले. कर्मालाच देव मानलं; देशाला अमोघ, अमाप अर्थार्जन द���ल
भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🏻
वर्णा गावातील ग्रामस्थांनी मोठे स्वागत केले! आजवर माझ्या राजकीय प्रवासात या गावाने मला कायमच साथ दिली. त्यांचे स्वागत स्वीकारून गावकऱ्यांशी हितगुज केले. तो स्नेहाचा, परस्परसंबंधांचा स्पर्श पुन्हा अनुभवला!
तमाम मराठीजनांचा संघर्ष फळाला आला..
केंद्राकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने दशकानुदशके सुरू असलेल्या या मागणीची प्रतीक्षा संपली आहे. यामुळे मराठी भाषेचा इतिहास, साहित्य आणि वारसा अधिक दृढ होईल. जागतिक स्तरावर मराठीची प्रतिष्ठा वाढणार आहे.
���माम मराठीजणांचे अभिनंदन..
विकासाची दूरदृष्टी असणारे, शेतकरी, विद्यार्थी, युवकांचे प्रश्न सातत्यानं मांडत त्यांना न्याय मिळवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे कणखर युवा नेतृत्व आ. रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@RRPSpeaks