2026 FIFA World Cup in 'NEW JERSEY':
Messi's Argentina fails to grabbed back-to-back titles, as European champions Spain won second trophy. Spain defeated defending champions 1-0 in extra time & won World Cup in New Jersey, as Ferran Torres scored crucial goal. Congratulations.
नियतीचा 'फेरा':
गतविजेत्या अर्जेंटिनाचा स्पेनने १-०ने पराभव करत फिफा विश्वचषक २०२६ चे विजेतेपद पटकावले. अटीतटीच्या अंतिम सामन्यात निर्धारित ९० मिनिटांपर्यंत गोलशून्य बरोबरी राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेत (१०६ व्या मिनिटाला) 'फेरा'(न) टोरेसने एकमेव निर्णायक गोल केला. अभिनंदन स्पेन!
KRANTI at Lords:
India won one-off Test against England by 270 runs at Lord’s. Kranti Gaud (5W) & Yastika Bhatia (113R) played vital role. This is 2nd-highest win by margin in Women’s Test cricket. In 2023 India had trumped England by 347 runs in Navi Mumbai. Congratulations!
आरक्षणाचे जनक, वृत्तपत्रांचे हितरक्षक:
कोल्हापूर संस्थानात शिक्षण मोफत करणारे, मागासवर्गीयांना ५०% आरक्षण देणारे आंतरजातीय विवाहांना मान्यता देणारे, संविधानकार डॉ. आंबेडकरांना शिक्षणासाठी आणि 'मूकनायक' वृत्तपत्रासाठी आर्थिक मदत करणारे राजर्षी शाहू महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन!
'न्यू ऑलराऊंडर':
न्यू चंदीगड येथील एकमेव कसोटी सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर एक डाव, 300 धावांनी विजय मिळविला. गिल, राहुल यांनी शतके झळकाविली. पदार्पणातच फिरकीपटू सामनावीर मानव सुथारने 7 विकेट्स घेण्याबरोबरच फलंदाजीत 28 धावांचे योगदान दिले. अभिनंदन मानव, अभिनंदन टीम इंडिया!
"VIRAAT" CONGRATULATIONS:
Royal Challengers Bengaluru (RCB) retained Indian Premier League (IPL) title, grabbed second title, beating Gujarat Titans by five wickets . Virat (75* in 42 balls, with nine fours and three sixes) led RCB to a win with two overs left. Congratulations.
विनम्र वंदन:
त्याग, समर्पण, मानवता, सहिष्णुता या तत्त्वांना उजाळा देणार्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन. या धम्म विचारांचे प्रवर्तन करणारे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा !
विनम्र वंदन:
त्याग, समर्पण, मानवता, सहिष्णुता या तत्त्वांना उजाळा देणार्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन. या धम्म विचारांचे प्रवर्तन करणारे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा !
विनम्र अभिवादन!
---------------
मानव जातीतील विशिष्ट समुदायाला पशुवत वागणूक देत मानवतेचा 'उपमर्द' करणारे 'फूटपाडे' जातीयवादी शास्त्र तथागत बुद्धांच्या अहिंसक प्रेरणेतून संविधानात्मक शस्त्राने नेस्तनाबूत करणार्या बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
'सन' ऑफ इंडिया :
संपूर्ण क्रिकेट जगताचे डोळे 'सूर्य'तेजासारख्या 'शान'दार विजयाने दिपवणार्या आणि अभिमानास्पद कामगिरीचा 'तिलक' लावून, खेळरुपी 'शिवम'वर 'अभिषेक' करत सुवर्ण'अक्षरा'त नाव लिहिण्याची 'राह' दाखवणार्या T20 विश्वचषक विजेत्या 'सन' ऑफ इंडिया संघाचे 'हार्दिक' अभिनंदन!
वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस:
राज्याच्या काही भागात अमोसमी पाऊस पडत असतानाच सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 30 षटकार, 25 चौकारांचा पाऊस पडला. विंडीजने फटकेबाजी करत टी-20 विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेवर 107 धावांनी विजय मिळविला. सामनावीर हेटमायरने झंझावाती 85 धावा केल्या.
शेवट गोड तर सारेच गोड :
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या शेवटच्या सामन्यात नेपाळने शेवट गोड केला. स्कॉटलंडवर 7 विकेट्स राखून शानदार विजय मिळविला. नेपाळला साखळी फेरीतील पहिल्या 3 सामन्यांत सलग पराभव पत्करावा लागला होता. नेपाळने अखेर विजयी भरारी मारली.
शेवट गोड तर सारेच गोड :
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 विश्वचषक स्पर्धेआपल्या शेवटच्या सामन्यात नेपाळने शेवट गोड केला. स्कॉटलंडवर 7 विकेट्स राखून शानदार विजय मिळविला. नेपाळला साखळी फेरीतील पहिल्या 3 सामन्यांत सलग पराभव पत्करावा लागला होता. नेपाळने अखेर विजयी भरारी मारली.
महाशिवरात्रीला महाविजय:
भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर महाशिवरात्रीला ६१ धावांनी महाविजय मिळविला. सुपर-8 फेरीत प्रवेश निश्चित केला. सामनावीर किशनने (40 चेंडूत 77) जणू 'हर हर महादेव' म्हणतच हल्लाबोल केला. करंगळीने विजयाचा गोवर्धनपर्वत उचलला.भारताने 'बम बम भोले' केले.