��ा. देवेंद्र फडणवीस – भरती घोटाळ्यांचे खलनायक!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आणि मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या भरती घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे. औषध प्रशासन विभागाच्या (FDA) परीक्षेत संगणक बदल, मोबाईल-ब्लूटूथचा वापर, उत्तरांची फॉरवर्डिंग – हे सर्व प्रकार स्पष्ट पुराव्यांसह उघड झाले आहेत. TCS सारख्या मोठ्या कंपनीमार्फत परीक्षा घेत असूनही, ही यंत्रणा फसवणूक थांबवू शकली ना���ी.
नंदुरबारसारख्या केंद्रांवर विशिष्ट उमेदवारांना सोयी देण्यात आल्या. यामागे कोण आहे?
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात पोलीस भरती, टॅलाठी, ZP आरोग्य, MSRTC, आरोग्य विभाग, वन विभाग आणि आता FDA – एकही भरती परीक्षा घोटाळ्याशिवाय पार पडलेली नाही. २०२२ मध्ये झालेली पोलीस भरती परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली. ���लाठी भरतीत आरक्षित जागांची अफरातफर झाली. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा तपास अद्याप अपूर्ण आहे.
मा. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात भरती प्रक्रिया ही पारदर्शकतेऐवजी दलालांच्या ताब्यात गेली आहे अशी परीक्षार्थींची भावना झाली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास, कष्ट, पैसे खर्च करून परीक्षांची तयारी केली, पण जागा मिळाल्या त्या लायनीत न उभ्या राहिले���्या ‘भ्रष्ट नेटवर्क’ला!
महायुती सरकारमध्ये मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गृहमंत्री म्हणून जबाबदारी घेतली असताना व्यवस्थेची ही अवस्था का? कोणत्या दबावाखाली किंवा आशीर्वादाखाली हे घडत आहे?
मा. फडणवीस हे आज महाराष्ट्रातील तरुणांच्या दृष्टीने भरती घोटाळ्यांचे खलनायक आहेत.
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @INCMaharashtra @BJP4Maharashtra
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती - रोजगार विभाग - जिल्हा दौरा.
रविवार २५ मे, २०२५
१. नवी मुंबई जिल्हा : सकाळी ९ ते सायंकाळी ४
२. पनवेल जिल्हा : सायंकाळी ४.३० ते रात्री ९
कार्यसूची :
१. नवी मुंबई जिल्ह्यातील ऐरोली, तुर्भे, नेरुळ, वाशी, सानपाडा, सीवूड, बेलापूर आणि पनवेल आदी ठिकाणी स्���र्धा परीक्षांर्थींची भेट व चर्चा
२. अभ्यासिकांना भेट
३. रोजगार या विषयावर काम करणाऱ्या विविध संघटना/ पदाधिकाऱ्यांशी बैठक
४. कार्यकर्ते व पक्ष पदाधिकाऱ्यांची भेट
@INCHarshsapkal @INCMaharashtra @NaviMumCongress @NavimumbaiIyc @NaviMumbaiDMC @INCPanvel @PanveYouth_IYC @panvelscdept @Mpsc_Andolan @punyachiMPSC @Yesjassociation
शुक्रवार १६, मे २०२५.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समितीचे मुख्यालय टिळक भवन येथे ठाणे जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध���यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत बैठक झाली. ही बैठक अत्यंत फलदायी ठरली. मा. सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले की, काँग्रेस पक्ष राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या न्यायासाठी त्यांच्या सोबत ठामपणे उभा राहील.
या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
राज्यभरातील लाखो रोजगारक्षम तरुणांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्षच घटनात्मक चौकटीत लढा देऊन आम्हाला “न्याय” मिळेल याची खात्री आहे अशी भावना यावेळेस परीक्षार्थींनी व्यक्त केली.
@INCHarshsapkal
@mpsc_office 111/2023 लिपिक opting आउट च्या लिंक वर अशा खूप टेक्निकल अडचणी येत आहेत. मा. आयोगाने हा टेक्निकल प्रॉब्लेम सोडवून 2 दिवसांचा वेळ वाढवून द्यावा ही विनंती.
@CMOMaharashtra@RRPSpeaks@Drsuvarnas
धन्यवाद मा @mpsc_office 111/2023 क्लर्क जाहिराती संदर्भात clarification दिलं. पुढील आठवडा म्हणजे शनिवार देखील होऊ शकतो आणि सोमवार देखील होऊ शकतो ही कळकळीची विनंती आहे जरी पुढचा आठवडा सुट्यांचा असला तरी सोमवार मंगळवारी निकाल लावा खूप मानसिक तणावातून उमेदवार जात आहेत.
आहे. परिस्थिती खूप भीषण आहे एक एक दिवस ढकलन कठीण झालेलं आहे . एक जाहिरात अडीच वर्षे झाली तरी निकाल लागून पूर्ण होत नाही हे खरंच खूप गंभीर आहे. कृपा करून आपल्या कर्मचाऱ्यांना मिशन मोड वर काम करायला लावून हा निकाल लवकरात लवकर लावा .
#declarempsccler2023result@CMOMaharashtra
मा . @Suvarnakharat4@mpsc_office तुम्हाला clerk 2023 च्या निकालाचे गांभीर्य माहीत आहेच. कृपा करून निकाल लवकरात लवकर लावा कुणाचे आईवडील आजारी आहेत. कुणाचे लग्न ठरले आहे. कुणाचे लग्न ठरत नाही आहे. पूर्व मुख्य स्किल सगळं सगळं कष्टाने पास होऊन गावात मुला मुलींना चोरून रहावे लागत
आज स्किल टेस्ट 2023 ची MAT मध्ये सुनावणी आहे. तरी @mpsc_office ला विनंती आहे की आज स्किल टेस्ट चा निकाल लावावा. 2 वर्षे झाली ही भरती रेंगाळत पडली आहे.
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या 258 जागांचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सरकारने या विद्यार्थ्यांचा अंत न बघता तातडीने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी. या विद्यार्थ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे असून वेळ प्रसंगी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक संस्थेचा "रामभरोसे का���भार"
मा. @mpsc_office
@Drsuvarnas ma'am
👉 6 जुलै ला होणारी महाराष्ट्र संयुक्त राजपत्रित नागरी सेवा परीक्षा पु��्हा एकदा postpone होत आहे असे ऐकलं.
हे खरं आहे काय??????
वेळीच अडचणी दूर केल्यास अशी वेळ येत नाही.
postpone होणार असल्यास हे जाहीर करण्याचा मुहूर्त कधीचा आहे?
तात्काळ मुहूर्त काढला तर बरं होईल.
( तसेही आपले notification म्हणजे फक्त एक formality उरली आहे,social media वर सर्व बातम्या आधीच leak झालेल्या असतात.
कळस म्हणजे result लागण्यापूर्वीच
उमेदवारांना cut off सुद्धा माहित असतो)
👉 आरक्षणासंदर्भात मागेच सर्व त्रुटी आपल्या निदर्शनास आणून दिल्या.
तरीही आपण गप्पच.
OBC ना वाऱ्यावर सोडून दिले
व SEBC ना अर्धवट / चुकीची
माहिती दिली
( कायद्याच्या चौकटीत न बसणारी)
मा. @mieknathshinde साहेब आपले काय म्हणणं आहे यावर??
👉 संयुक्त अराजपत्रित 2024 परीक्षा
जाहिरातीचा पत्ता तर नाहीच पण साधी तारीख जाहीर करण्याचे सौजन्य सुद्धा दाखवले नाही अजून.
2023 मध्ये वारंवार ��पल्याला वारंवार निदर्शनास आणून दिले होते की ही
Scheme of exam सर्व उमेदवारांचे नुकसान करणारी आहे,PSI उमेदवारांना सुद्धा वेगळ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
शेवटी आपण उमेदवारांचे नुकसान केलेच पण MAT ने आपल्याला दणका दिलाच.
आता दणका मिळाला आहेच तर सर्वोतोपरी विचार करून Scheme of exam येईल अशी अपेक्षा करतो.
👉 समाजकल्याण परीक्षा
व इतर मागास बहुजन परीक्षा ची तारीख
जाहीर करण्याचा विसर पडला आहे
त्याबद्दल काय मत आहे आपले?
👉 Descriptive pattern
ची तर भारी हौस आहे आपल्याला पण ज्या exam descriptive pattern ने
घेतल्या त्याचा निकाल वेळेत लावता
आला नाही आपल्याला.
आणि Objective pattern ने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल तर सोडाच अजून final key आली नाही.
👉 Typing skill test
च्या तारखा जाहीर केल्या नाही अजून.
त्या उमेदवारांना किती दिवस ताटकळत
ठेवण्याचा विचार आहे?????
@maha_governor
@CMOMaharashtra
@mieknathshinde @NANA_PATOLE
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
राज्यभरातील स्पर्धा परीक्षा ���मेदवार म्हणजे #MPSC च्या व सरकारच्या हातातले खेळणं झाले आहे,
हवे तसे खेळा,कुठेही फेका, काहीही करा
🙏धन्य आहे 🙏
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्र���िद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.