#MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून #MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून हटवावं या मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विद्यार्थ्यांची विराट ताकद दाखवून दिली. या मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भावनेचा विचार करुन सरकारने तातडीने त्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या #MPSC च्या कारभाराची झाडाझडती घेऊन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसंच MPSC ची ऑफलाईन परीक्षा, औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्याकाळातील सर्व परीक्षांचं फॉरेन्सिक ऑडीट यासह विद्यार्थ्यांच्या सर्वच मागण्या या न्याय्य आहेत. त्याकडं सरकारने दुर्लक्ष करु नये, अन्यथा विद्यार्थ्यांचं यापेक्षाही मोठं आंदोलन पुण्यातच उभारण्याचा इशारा यावेळी दिला.
यावेळी खा. सुप्रियाताई सुळे, आ. डॉ. विश्वजीतजी कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (SP) प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. सचिन ढवळे सर, प्रा. यशवंत सोलाट सर, प्रा. अजित काकडे सर, प्रा. गणेश कड सर, प्रा. धनंजय मते, प्रा. समाधान कोकटे सर, प्रा. अनिकेत पाटील सर, सचिन म्हस्के सर, तसंच या आंदोलनात प्रमुख भूमिका घेणारे प्रमोद पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी किरण जगताप, संग्राम नराळे, अक्षय कांबळे, अमोल अतकरे (जॉली), स्वप्नील भिसे, प्रविण पाटील, दीपक कसबे, नितीन गिते, अजय जगताप, निकेतन शिंदे, साहेबराव क्षीरसागर, सिद्धांत जांभुळकर, ऋषिकेश गांगुर्डे, कुणाल दिलपाक, तनया साठे, शकील शेख, शिवदास मोरे, बालाजी मिसाळ, अजय बनसोडे, अमोल शिंदे, महेश सरकाळे, राहुल तरंगे, मिथुन भालेराव, गणेश कोराळे, आश्रूबा चौधरी, साक्षी खंडावळे, स्नेहा बावनकर, ऋषिकेश शिंदे, राहुल गुडदे यांच्यासह सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सीजेपी यांचे पदाधिकारी, मा. आ. मोहनदादा जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, रविराज साबळे पाटील यांच्यासह राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #MPSC_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
पुण्यात विद्यार्थ्यांच्या यशस्वी झालेल्या विराट आंदोलनामागे अनेकांचे हात राबत होते. यामध्ये प्रामुख्याने प्रमोद पाटील आणि या फोटोत दिसणारे त्यांचे सहकारी तसंच फोटो फ्रेममध्ये न येता कायम विद्यार्थी हितासाठी निःस्वार्थी भावनेने काम करणारी शिक्षक मंडळी या सर्वांचे मनस्वी आभार..! या सर्वांच्या मेहनतीमुळंच पुण्यात विद्यार्थ्यांची अभूतपूर्व एकजूट आणि ताकद सरकारला दिसली आणि म्हणूनच सरकारला विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल, यात शंका नाही…!
सर्व प्रसार माध्यमांनीही मोर्चातील विद्यार्थ्यांचा आवाज सरकारसह राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोचवला, मोर्चामुळं गैरसोय होऊनही पुणेकरांनीही विद्यार्थ्यांना समजून घेतलं आणि पोलिस प्रशासनानेही अत्यंत सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळं या सर्वांचेही मनापासून आभार!
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी #MPSC
राज्यसेवा तर्फे ज्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्या जागांची यादी बघितल्यानंतर राज्यसेवा आयोग नेमक काय करत आहे हेच कळत नाहीं.
राज्यसेवेच्या मागील परिपत्रकात PSI पदासाठी 441 जागांची भरती करण्यात येणार होती.त्या जागा कमी करून केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे.शिवाय DYSP,तहसीलदार सारख्या महत्वाच्या पदांच्या तर जागाच काढण्यात आलेल्या नाहीयेत.ही क्रूर थट्टा आहे त्या लाखो विद्यार्थ्यांची जे,ही परिक्षा पास होण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत.
शिवाय राज्यसेवेची ही होणारी परीक्षा Objective Pattern नुसार शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे राज्य शासनाने यात लक्ष घालत 2024 च्या जाहीरातीमध्ये सर्वच्या सर्व पदे कसे भरता येतील याकडे लक्ष देत,विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा..!
प्रत्येक विभागात हजारो जागा रिक्त असताना हे सरकार काहीच जागा भरणार आहे.माझी राज्य सरकारला आणि राज्यसेवा आयोगाला विनंती आहे की,राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका...!! त्यांना न्याय द्या..त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या..!
#राज्यसेवा
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
विद्यार्थी हितासाठी केलेल्या आणखीन एका मागणीला मूर्त स्वरूप आले. मा देवेंद्रजींनी विधिमंडळात शब्द दिल्याप्रमाणे गट-क दर्जाची शासकीय पदे सुद्धा टप्प्याटप्प्याने एमपीएससीमार्फत भरणेबाबतचा शासननिर्णय निर्गमित झाला आहे. मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांचे मनःपूर्वक आभार. #MPSC