महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
2008पासून सहकार विभागात भरती नाही, BMC च्या लेखा विभागात 10 वर्षांपासून भरती झाली नाही
सहकार विभागाचा 1500पदांचा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवला आहे तरीजास्तीत जास्तजागांचा मंजूर करा.तसेच वरील लेखा विषयक पदांसाठी फक्त वाणिज्य पदवीधारक पात्र ठरवून त्यांच्यावरील अन्याय थांबवावा
@mybmc
महाट्रान्सकोच्या परीक्षेसाठी उमेदवारांना मिळालेले परीक्षा केंद्रे कसे आहेत ते एकदा बघून घ्या. उमेदवारांना दूरवरचे परीक्षा केंद्र दिले गेले आहेत आणि जे परीक्षा केंद्र मिळाले आहेत त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. राज्यातील तरुणांचे भविष्य अंधारात लोटू नका. सरळसेवा परीक्षांसाठी फक्त TCS ION परीक्षा केंद्र म्हणून देण्याचा निर्णय राज्य सरकारने तत्काळ जाहीर करावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@AUThackeray@MSEDCL
पारदर्शक परिक्षा घेण्याबाबत सरकारी यंत्रणा गंभीर तर नाहीतच उलट पोरखेळ करत आहेत. महाट्रान्सकोच्या परिक्षेसाठी मुलांना एकतर २००-३०० कि. मी. लांबची सेंटर दिली गेली. त्यातही TCS केंद्रांची मागणी करूनही खाजगी केंद्र देण्याचा आडमुठेपणा करण्यात आला. आतातर हद्द म्हणजे परिक्षा केंद्रांवर ना भौतिक सुविधा आहेत ना सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्यात. एकंदरीतच महाट्रान्स्कोला विद्यार्थीहित महत्त्वाचं आहे की हेकेखोरपणा हा प्रश्न पडला आहे.
सरकारने तात्काळ महाट्रान्स्कोला राज्यभरातील परिक्षा केंद्रांची पुनर्पडताळणी करून सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis
MAHATRANSCO परीक्षार्थ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे!
Lower Division Clerk (Finance & Accounts) परीक्षेसंदर्भात खासगी केंद्रांमुळे निर्माण झालेला गोंधळ, तांत्रिक त्रुटी व अपारदर्शक प्रक्रिया ह्या गंभीर चिंता आहेत. परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवरच पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने घ्यावी, अशी स्पष्ट मागणी मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास आणि भवितव्य सुरक्षित ठेवणे हीच खरी व्यवस्था!
#MAHATRANSCO #विद्यार्थीहित #पारदर्शकपरीक्षा #OmarajeNimbalkar #Maharashtra
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
📍MAHATRANSCO च्या LDC पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी #TCS ची केंद्रें देणे अपेक्षित होते, परंतु २००–३०० कि.मी. अंतरावरील खासगी अविश्वासाई केंद्र देण्यात आल्याने पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
📍राज्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
📍परिणामी सरकारने MAHATRANSCO ला परीक्षेसाठी TCS ची केंद्रें तसेच पावसाचे वातावरण पाहता जवळ परीक्षा केंद्रें देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
#mahatrancoexam
**१ ऑगस्ट २०२५** रोजी होणाऱ्या **MAHATRANSCO च्या LDC पदांसाठीच्या परीक्षेचं आयोजन** अत्यंत गोंधळात आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार न करता करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी **TCS सारख्या अनुभवी आणि विश्वासार्ह संस्थेच्या परीक्षा केंद्रांची अपेक्षा** होती. मात्र, विद्यार्थ्यांना **२०० ते ३०० किमी दूर अंतरावर असलेल्या खाजगी आणि अविश्वासार्ह केंद्रांवर** पाठवण्यात आलं आहे.
राज्यात याआधी अनेक **पेपरफुटीच्या घटना** घडल्या असून त्याचा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसला आहे. अशा पार्श्वभूमीवर, **MAHATRANSCO परीक्षेत घोटाळ्याची शक्यता नाकारता येत नाही.**
शिवाय, **सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे दूरच्या प्रवासामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.**
* **TCS सारख्या विश्वासार्ह एजन्सीकडे परीक्षा केंद्रांची जबाबदारी देणे**
* **विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ परीक्षा केंद्र देणे**
या दोन्ही गोष्टींबाबत **MAHATRANSCO ला स्पष्ट निर्देश द्यावेत**, ही विद्यार्थ्यांची आणि पालकांची ठाम मागणी आहे.
#maharastra
MahaTransco LDC परीक्षा पोस्टपोन्ड नाही ट्रान्सपरन्सी हवी आहे..!! I आता फक्त लढ म्हणा..!!
राज्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1) TCS ion Centre भेटलेच पाहिजे
2) 100 किलोमीटरच्या आत एक्झाम सेंटर भेटलेच पाहिजे
प्रति,
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. ऊर्जामंत्री, महाराष्ट्र
विषय : MAHATRANSCO परीक्षेतील परीक्षा केंद्र संबंधित अडचणी व आवश्यक सुधारणा संदर्भात निवेदन
MAHATRANSCO अंतर्गत जाहिरात क्र. 24/2024 अन्वये Lower Division Clerk (Finance & Accounts) या पदासाठी दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा यापूर्वी ६ जुलै २०२५ रोजी नियोजित होती, मात्र त्या वेळी परीक्षार्थींना खाजगी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच परीक्षार्थींनी संबंधित यंत्रणेला याची माहिती देऊन तक्रार नोंदवली, व त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
तथापि, पुन्हा एकदा दिनांक १ ऑगस्टच्या परीक्षेसाठी त्याच स्वरूपाची खाजगी केंद्रेच देण्यात आली आहेत. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी वाढली असून, तांत्रिक अकार्यक्षमता व व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव ही गंभीर चिंता बनली आहे.
परीक्षार्थ्यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
👉 सदर परीक्षा फक्त TCS iON अधिकृत डिजिटल झोन केंद्रांवरच घेतली जावी.
👉 परीक्षा वेळेत, पारदर्शक, गोंधळमुक्त पद्धतीने पार पडावी.
या परीक्षेला हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य जोडलेले आहे. त्यामुळे वरील बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, ही नम्र विनंती.
'महाट्रान्सको'च्या विविध पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी 'टीसीएस'ची केंद्रे देणे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांना खासगी केंद्रे देण्यात आली असून ती २००-३०० किमी दूर अंतरावर आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा. देवेंद्र जी,
महाट्रान्सको परीक्षा (१ ऑगस्ट २०२५) साठी उमेदवारांना २००-३०० कि.मी. दूर खासगी केंद्रे देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना त्रास होतोय.
कृपया आपण तात्काळ हस्तक्षेप करून TCS मार्फत परीक्षा घेण्याचे आणि जिल्हास्तरीय केंद्रे देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
#MahaTransco #ExamJustice
महाट्रान्सको'च्या विविध पदांसाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी #TCS ची केंद्र देणे अपेक्षित होते, परंतु २००–३०० कि.मी. अंतरावरील खासगी केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार आहे..
राज्यात झालेली पेपरफुटीची प्रकरणे पाहता सदरील परीक्षेत घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. परिणामी सरकारने महाट्रान्सकोला परीक्षेसाठी TCS ची केंद्र तसेच पावसाचे वातावरण पाहता जवळ परीक्षा केंद्र देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis
परीक्षा खाजगी कंपनी कडे देऊन मुलांच्या भविष्याचे वाटोळे करत आहे हे सरकार. कित्येक परीक्षा सेंटर हे मॅनेज होते हे सिद्ध झाले आहे. ज्या कंपन्या परीक्षा घेतात तेथील कर्मचारीच पेपर फोडतात, खाजगी कंपनीकडे परीक्षा फी ही 1000 आहे तरी या सरकारला खाजगी कंपनी का लागते. मुलांचा विश्वास आहे @mpsc_office आयोगावर मग द्या ना परीक्षा आयोगाकडे @Dev_Fadnavis साहेब
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@INCHarshsapkal@RRPSpeaks
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या
#सरळसेवा_शुल्क_कमी_करा
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या महा ट्रान्सकोमध्ये विविध पदाच्या भरतीची जाहिरात डिसेंबर २०२४ मध्ये आली. त्यांपैकी लोअर डिव्हिजन क्लार्क आणि असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर (सिव्हिल) या पदांसाठी येत्या ६ जुलै रोजी परीक्षा होणार आहेत. ६० हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. यासाठीची बरीच परीक्षा केंद्रे ही अधिकृत नसून अत्यंत सुमार दर्जाची आणि अपारदर्शी आहेत. बऱ्याच उमेदवारांना दुर्गम भागातील परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे परीक्षेला जाणे कठीण झाले आहे.
मागील काही विभागाच्या भरती प्रक्रियेत परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेले गैरप्रकार आणि त्यामुळे उमेदवारांना झालेला मानसिक त्रास व पारदर्शकतेचा मुद्दा लक्षात घेता, ही परीक्षा TCSION च्या अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे अशी या मुलांची मागणी आहे. परीक्षेच्या दिवशीच आषाढी एकादशी आहे त्यामुळे, उमेदवारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश शासनाने द्यावे.
#PointOfInformation #MonsoonSession2025 @NCPspeaks
महाट्रान्सकोच्या सहायक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी ६ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ३० जून रोजी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. मागील काही परीक्षांतील गोंधळाचा अनुभव लक्षात घेता परिक्षार्थींना 'टिसीएस आयऑन' ची केंद्रे मिळणे अपेक्षित आहे.परंतु या परिक्षेसाठी अनेकांना खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.शिवाय ती खुप लांबची देखील आहेत. तसेच याच दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी मोठा शारिरीक व मानसिक ताण सहन करावा लागणार आहे. हे लक्षात घेता ही परिक्षा पुढे ढकलावी आणि त्यासाठी टिसीएस आयऑन ची परीक्षाकेंद्रेच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिक्षार्थी करीत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा विषय आहे. त्या कृपया आपण या मागणीची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या १,८४६ कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ इतकी आहे.
म्हणजे एका पदासाठी ६० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सदर जाहिरातीची पात्रता बदलण्यासाठी आपल्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते.
खासगी परीक्षा केंद्रे, केंद्र चालकांनीच मॅनेज केल्याने मागील नोकर भरतीत घोटाळे झाले आहेत. #TCS चे उच्च अधिकारी घोटाळ्यात सामील होते. म्हणून मुंबई महापालिकेला विनंती आहे, कृपया खासगी कॉम्प्युटर सेंटर परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येऊ नये. TCS ION चे अधिकृत TCS ION परीक्षा केंद्रेच सेंटर म्हणून देण्यात यावेत. कारण TCS ION परीक्षा केंद्रे सुसज्ज अशी आहेत तिथे #घोटाळ्याची शक्यता कमी आहे.
परीक्षेला कितीही दिवस लागले तरी चालतील परंतु TCS ION केंद्रांवर परीक्षा पारदर्शक होतील, पुन्हा BMC लिपिक पदाची जाहिरात कधी येईल याची शास्वती नसल्याने, #BMC ला नम्र विनंती आहे कृपया आमच्या मागणीकडे गांभीर्याने विचार करावा.
@Dev_Fadnavis@AUThackeray@MPLodha@CMOMaharashtra@mieknathshinde@RRPSpeaks .