Today in Pune, the High-Power Committee on Examination Reforms interacted directly with more than 600 students to understand their experiences, concerns and suggestions.
Key issues that emerged included:
📌 Fixed annual examination calendar
📌 Stability in examination pattern and syllabus
📌 Examination through offline mode
📌 Transparency in paper-checking and evaluation
📌 One-time registration and one-time annual fee
📌 Common grievance redressal mechanism at MPSC level
📌 A more systematic and transparent interview process
📌 Better quality of questions
📌 Timely filling of vacant posts
Thank you to the students of Pune Division for such a positive and constructive response.
@CMOMaharashtra@MahaDGIPR
आज पुण्यात परीक्षा सुधारणा विषयक उच्चस्तरीय समितीने ६०० हून अधिक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे अनुभव, अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या.
चर्चेत पुढील मुद्दे विशेषत्वाने समोर आले:
📌 निश्चित वार्षिक परीक्षा वेळापत्रक
📌 परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमात सातत्य
📌 परीक्षा पद्धत – ऑफलाइन माध्यमातून
📌 उत्तरपत्रिका तपासणी व मूल्यमापन प्रक्रियेत पारदर्शकता
📌 वर्षातून एकदाच नोंदणी आणि एकदाच परीक्षा शुल्क
📌 MPSC स्तरावर एकत्रित तक्रार निवारण व्यवस्था
📌 मुलाखत प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करणे
📌 प्रश्नांचा दर्जा अधिक चांगला करणे
📌 रिक्त पदांची वेळेत भरती
पुणे विभागातील विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अत्यंत सकारात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@CMOMaharashtra@MahaDGIPR
महा eHRMSचा शुभारंभ, शासकीय सेवाप्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘महा ई-एचआरएमएस’, ‘महा-आयएएस’ आणि ‘मेंटॉर मेंटी पोर्टल’ या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘जिज्ञासा’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहाय्यकासह देशातील पहिले स्वयंचलित मॉड्यूलही कार्यान्वित करण्यात आले.
देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आहे. 'महा ई-एचआरएमएस' प्रणाली ही गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, महाराष्ट्राने डिजिटल सामर्थ्याची आणखी एक उत्तम यशोगाथा देशासमोर उभी केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय व्यवस्थेमध्ये सेवा देताना अधिकारी, कर्मचारी शासन निर्णय आणि नियमांच्या चौकटीत पारंपरिक पद्धतीने कामकाज करत असतात, त्यात बदल करण्याच्या अनुषंगाने, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना अर्थात जीपीआर अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या व्यापक प्रशासकीय सुधारणांचा हा पहिला टप्पा आहे. शतकाहून अधिक काळ प्रचलित असलेल्या कागदाधारित प्रशासकीय कार्यपद्धती आणि सेवापुस्तकाच्या देखभालीचे आधुनिकीकरण करून त्या अधिक सुलभ, गतिमान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शासकीय प्रक्रिया पुनर्रचना उपक्रमाचा आणि प्रस्तावित एकात्मिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचा हा प्रमुख घटक आहे.
शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना 'मोटिव्हेशन' मिळणे हे महत्त्वाचे असते. यामुळे कामातील उत्साह कायम राहतो. शासकीय सेवेमध्येही पदोन्नती हे 'मोटिवेशन' आहे. या प्रणालीमुळे पदोन्नतीची प्रक्रिया गतिमान होऊन शासकीय सेवेमध्ये नियुक्ती आदेशापासून ते सेवा निवृत्तीच्या कागदपत्रांपर्यंत संपूर्ण व्यवस्था डिजिटल स्वरूपात आली आहे. यंत्रणेमधील प्रत्येक अधिकाऱ्याला 'ग्राउंड रियालिटी'वर काम केलेले असल्यामुळे राज्यापुढील आव्हाने, प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अनुभवांचा, ज्ञानाचा चांगला उपयोग होतो. सामान्य प्रशासन विभागाने या प्रणालीच्या विकासात मोलाची भूमिका बजाविल्याबद्दल विभागाचे अभिनंदन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
‘महा ईएचआरएमएस’मुळे 1935 पासून प्रचलित असलेल्या भौतिक सेवापुस्तकाऐवजी संरचित डिजिटल ई सेवा पुस्तक उपलब्ध होणार आहे. ई ऑर्डर मॉड्यूलमधून निर्गमित होणाऱ्या प्रत्येक आदेशाच्या आधारे संबंधित सेवाविषयक नोंदी स्वयंचलितपणे अद्ययावत होतील. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना एसएमएस अथवा ई-मेलद्वारे सूचना मिळतील. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण सेवाकालातील आदेशांनुसार डिजिटल सेवापुस्तक सातत्याने अद्ययावत राहील.
जिज्ञासा, ‘मेंटॉर मेंटी’ पोर्टल आणि मोबाईल ॲप
‘जिज्ञासा’ हा स्वदेशी आणि सार्वभौम स्वरूपाचा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट सहाय्यक आहे. आयएएस तसेच एआयएस सेवांशी संबंधित नियमांच्या आधारे तो प्रशिक्षित करण्यात आला आहे. त्याद्वारे अधिकाऱ्यांना सेवाविषयक नोंदी, लागू सेवा नियम, अनुज्ञेय हक्क आणि अन्य सेवाविषयक बाबींची माहिती व मार्गदर्शन मिळू शकेल. ‘मेंटॉर मेंटी’ पोर्टलच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा क्षेत्रीय कामकाजाचा अनुभव, प्रशासकीय कौशल्ये आणि संस्थात्मक ज्ञान कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ईएचआरएमएस मोबाईल ॲपद्वारे अधिकारी आणि कर्मचारी कोणत्याही ठिकाणाहून वेतन पावती पाहणे, उपस्थितीची नोंद तपासणे तसेच रजेचा अर्ज सादर करणे अशा सेवांचा लाभ घेऊ शकतील.
सर्व सेवा डिजिटली एकत्रित
राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या महाराष्ट्र राज्य घटकाने हा सुरक्षित, ओपन सोर्सवर आधारित, एकात्मिक आणि भविष्यवेधी डिजिटल मानव संसाधन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ‘परिचय’ आणि ‘ नॅपिक्स' तंत्रज्ञानाचा त्यात वापर करण्यात आला असून, ई-ऑफिस, आयगॉट कर्मयोगी, महापार, सेवार्थ, एनपीएस, डिजिलॉकर, भाषिणी, ई-कॅबिनेट तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अन्य प्लॅटफॉर्मशी त्याची जोडणी करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचाही या प्लॅटफॉर्ममध्ये समावेश आहे. ‘जिज्ञासा’, ‘महा-एआय’ आणि ‘अनुभव एआय’ यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामासाठी बुद्धिमान सहाय्य उपलब्ध होईल.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@rahulnarwekar@SunetraA_Pawar@MPLodha@JaykumarRawal
#Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance
आधुनिक प्रशासनाची नवी ओळख, सक्षम कर्मचारी, सशक्त शासन!
🔸Launch of the ‘Maha eHRMS’ digital human resource management system at the hands of CM Devendra Fadnavis.
Various services under ‘Maha eHRMS’:
✅'Maha eHRMS' Mobile App
✅'Maha IAS' Portal
✅'Mentor-Mentee' Portal
Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Jaykumar Rawal, senior officials and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महा eHRMS' या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ.
'महा eHRMS' अंतर्गत विविध सेवा :
✅'महा eHRMS' मोबाइल ॲप
✅'महा IAS' पोर्टल
✅'मेंटॉर-मेंटी' पोर्टल
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘महा eHRMS’ इस डिजिटल मानव संसाधन प्रबंधन प्रणाली का शुभारंभ।
‘महा eHRMS’ के अंतर्गत विभिन्न सेवाएं :
✅‘महा eHRMS’ मोबाइल ऐप
✅‘महा IAS’ पोर्टल
✅ ‘मेंटॉर-मेंटी’ पोर्टल
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧 12.25pm | 24-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.२५ वा. | २४-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis@rahulnarwekar@SunetraA_Pawar@MPLodha@JaykumarRawal
#Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'महा eHRMS' या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीच्या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@rahulnarwekar@SunetraA_Pawar@MPLodha@JaykumarRawal
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahaEHRMS
शासकीय कर्मचाऱ्यांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासनाला डेटा-आधारित, जलद आणि अचूक निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'महा eHRMS’ या ॲप आधारित डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीची सविस्तर माहिती...
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance
🔴 Live Stream | Launch of Maha eHRMS
The General Administration Department,GOM is launching Maha eHRMS @CMOMaharashtra
📅 24 August 2026 | 12:00 Noon
🔗 Watch the event live on YouTube:
https://t.co/EXDPS9qLOW
#MahaeHRMS#GovTech#MahaIAS#MobileApp#nicmeity
Day 2 | 5th May 2026 #Techwari2
An engaging session on Effective Leadership by Minocher Patel, Corporate Trainer, YASHADA—focusing on
building vision, inspiring teams, and driving excellence in governance.Empowering leaders. Transforming systems.
https://t.co/zxDc3TapP2
Day 2 | TECH-वारी 2.0 | 5th May 2026 | Understanding data in the digital age An insightful technical session on the Digital Personal Data Protection (DPDP) Act, 2023, led by Advocate Khushbu Jain (Supreme Court)
#TechWari2
Posting this on tweeter Maam
Day1. | Techwari 2.0 | 4th May 2026, Chief Minister Devendra Fadnavis unveiled the Smarnika—a powerful reflection of initiatives, measurable progress, and the evolving journey of governance transformation from #TechWari1 to #TechWari2.
🔸Inauguration of 'TECH - Wari 2.0: Maha Tech Learning Week' at the hands of CM Devendra Fadnavis.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Chairperson of the Capacity Building Commission (CBC), Government of India S. Radha Chauhan and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक'चे उदघाटन.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या (सीबीसी) अध्यक्षा एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक' का उदघाटन।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकार के क्षमता विकास आयोग (सीबीसी) की अध्यक्षा एस. राधा चौहान एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕦 11.30am | 4-5-2026📍Mantralaya, Mumbai | स. ११.३० वा. | ४-५-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@MPLodha@CBC_MK@ACS_GADServices
#Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक' अंतर्गत पार पडलेल्या 'तालरंग : जर्नी ऑफ रिदम अँड टीमवर्क' या कार्यक्रमातील कलाकार निलेश परब व कृष्णा मुसळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा (सीबीसी) एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@MPLodha@CBC_MK@ACS_GADServices
#Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'TECH - वारी 2.0 : सप्ताह तंत्रस्नेही वारीचा' या स्मरणिकेचे ई-प्रकाशन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या (सीबीसी) अध्यक्षा एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@MPLodha@CBC_MK@ACS_GADServices
#Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek