हिंगोली येथे झालेल्या फटाके स्फोटाची घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. आज स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच स्फोट झालेल्या घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या दुर्घटनेत जखमींना वाचवण्यासाठी धाव घेत असताना अवघ्या २६ वर्षांच्या अविनाश बांगर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पत्नी वैष्णवी आणि आई वंदना यांचे सांत्वन केले. संकटाच्या या कठीण काळात बांगर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
अविनाश यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेले धैर्य समाजासाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या बलिदानाला मनापासून सलाम.
#Hingoli #HingoliBlast #FirecrackerBlast #HingoliNews #Maharashtra
सेलसुरा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथील शेतकरी स्व. दत्तराव मारुतीराव घुगे (वय ४३) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
आज त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या पत्नी तसेच तीन मुलींची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी घुगे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना सरकारने केवळ घोषणा न करता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी कर्जमाफी, आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत.
#MaharashtraDrought #farmersuicide #FarmerCrisis #farmerlife #drought
हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आज शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात लढा देणाऱ्या शेतकरी बांधवांची भेट घेतली.
सत्ताधारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बैठका घेतात, तेव्हा शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्याऐवजी काजू-बदाम खात बसतात. बळीराजाने प्रेमाने दिलेली चटणी-भाकरी आम्ही खाल्ली. कारण शेतकऱ्यांच्या कष्टाची भाकरी आमच्यासाठी काजू-बदामापेक्षा मोठी आहे. चटणी-भाकरी खाऊ, शेतकऱ्यांसोबत राहू आणि त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करू, हीच आमची भूमिका आहे.
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना शेतात जाऊ न देता मोजणी सुरू असल्याची व्यथा त्यांनी मांडली. हा महामार्ग रद्द करावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या हक्कांशी तडजोड होऊ देणार नाही. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील या लढ्यात मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही यावेळी शेतकरी बांधवांना दिली. त्यांच्या न्याय्य मागणीसाठी हा लढा अधिक ताकदीने पुढे नेण्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील.
महिला शेतकरी आत्महत्या ही धोक्याची घंटा; सरकारने आता तरी कर्जमाफी करावी!
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून, या संकटामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यामध्ये एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, सरकारसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा आहे.
शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरू असताना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ पोहोचलेला नाही. कर्जपुनर्गठन हा शेतकऱ्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय नाही. आजचे कर्ज पुढे ढकलून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होत नाही; उलट भविष्यात ते कर्ज फेडावेच लागणार आहे.
म्हणून सरकारने कर्जपुनर्गठनाचा फार्स न करता सरसकट शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे करून त्यांना कर्जमुक्त करावे. शेतकऱ्यांना केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष दिलासा हवा आहे.
📍 भानखेडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली
भानखेडा येथे शेतात जाऊन कापूस आणि झेंडू पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कापूस व झेंडू उत्पादक शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, पिकांची स्थिती आणि शेतीतील आव्हाने जाणून घेतली.
भारत कोटकर यांच्या झेंडू शेतीची, तसेच गजानन आनंदा कोटकर यांच्या कापूस पिकाची पाहणी केली. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्च, पिकांची अवस्था आणि बाजारभाव यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रश्नांबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी नारायण बाबा राठोड, लिंबा राठोड, सुरेशअप्पा सराफ, अब्दुल हाफिज, श्यामराव जगताप, संतोष दळवी, हरिभाऊ फडके, हृषिकेश देशमुख आणि सुधीरअप्पा सराफयांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
#hingoli #farmers #FarmerCrisis #maharashtradrought #drought
📍 दिल्ली
काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे जी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वात लोकसभा-राज्यसभेतील खासदारांनी आज राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना नमन केले आणि देशातील लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी बापूंच्या विचारांची प्रेरणा घेतली.
नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्या संगनमताने सुरू असलेली मतांची चोरी आणि जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न हा केवळ निवडणुकीचा मुद्दा नाही, तर हा थेट संविधान आणि लोकशाहीवरचा हल्ला आहे.
जनतेच्या मताची ताकद कुणालाही चोरता येणार नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचा हा संघर्ष अखेरपर्यंत सुरूच राहील.
@RahulGandhi@kharge
#Rajghat #delhi #IndianNationalCongress
📍हिंगोली दुष्काळ पाहणी दौरा
काँग्रेस विधिमंडळ नेते, माजी मंत्री व मा.विरोधी पक्षनेते श्री.विजय वडेट्टीवार साहेब हे दोन दिवसीय हिंगोली जिल्हा दुष्काळ दौऱ्यावर येणार आहेत.
वर्धा,हिंगोली व जालना जिल्ह्यात दुष्काळ दौरा करून शेतकऱ्यांशी वडेट्टीवार संवाद साधणार.
@VijayWadettiwar
लोकप्रिय धुळे लोकसभा खासदार डॉ. शोभाताई बच्छाव आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!!
@ShobhaBachhavMP
📍हिंगोली
आज हिंगोली येथील श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) हिंगोली दौऱ्यावर आले असता हिंगोली जिल्हा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने त्यांची भेट घेत महामार्ग रद्द कराची मागणी केली.
#शक्तिपीठमहामार्ग#एकचजिद्दशक्तिपीठरद्द#हिंगोली
युवक कॉंग्रेस ते आजवर स्व.राजीवभाऊ सातवांनंतर मोठ्या भावाची भुमिका पार पाडणारे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!
नेहमी आपल्या हातून अभ्यासू क्रांति घडत राहो व राज्याचे नेतृत्व आपण करावे हीच सदिच्छा…!!
@satyajeettambe
देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
देशाच्या आर्थिक विकासात आणि सामाजिक सलोखा व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांच्या जपणुकीत त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
पक्षाचे ज्येष्ठ नेते, कॅांग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व राज्यसभा खासदार श्री.मुकुलजी वासनिक साहेबांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!
साहेब आपणास निरोगी दिर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना…!!!
@MukulWasnik