राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की बदल नावं, बदल स्थळं आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं दिसतंय. बरं कधी ना कधी आता उरलो गुजरातपुरते अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी माहात्म्य निर्माण करून घेऊ हा अट्टाहास सध्या केंद्रातील २ सत्ताधीशांचा दिसतोय.
बरं समजा पुरस्कार सोहळ्याचं स्थळ हलवायचं होतं तर ते मुंबईत का नाही आणलं? ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या राज्यात का नाही पुरस्कार वितरण ? किंवा देशात सगळ्यात जास्त सिनेमे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे घडवले जातात यापैकी कुठल्या राज्यात हा सोहळा का नाही ? दक्षिणेत तर सिनेमांनी तिथल्या राजकारणाला आकार दिला आहे. गुजरातच का ?
या आधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इथे कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, २०२३ च्या क्रिकेट वल्डकपचा अंतिम सामना गुजरातमध्ये, बाहेरून राष्ट्राध्यक्ष आले त्यांना गुजरातमध्ये घेऊन जायचं, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातमध्ये न्यायची. या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे की या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा हा गुजरातमध्ये हलला ? आज जो देश उभा आहे तो कित्येक पिढ्यांच्या त्यागातून आणि देशातील प्रत्येक प्रांताच्या योगदानातून उभा आहे. यांना गुजरातपलीकडचा देश फक्त आठवतो त्या त्या राज्यात निवडणुका आल्या की. मग तिकडे जाऊन तिथले कपडे घालून भाषणं करून, माझं कसं या राज्याशी जुनं नातं आहे सांगून मतं मिळवायची एवढंच जमतं का ?
सध्याचे सत्ताधीश ‘कलासक्त’ नाहीत हे माहित आहे. कशाही निवडणुका जिंकायच्या ही एकमेव कला आणि त्यासाठी सगळ्यांवर सक्ती इतकाच यांचा ’कलासक्त’पणाशी संबंध. आणि चित्रपटांशी संबंध म्हणाल तर वाट्टेल ते प्रचारकी सिनेमे बनवून घ्यायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायला लावायचे इतकाच संबंध. बरं या सगळ्याला दक्षिणेतील इतर सिनेमाप्रेमी राज्य कडाडून विरोध करतील, पण महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. पण कलाकारांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. मुद्दा केवाडिया किंवा इतर शहर हा नाही, देशाच्या राजधानीत या पुरस्कराची जी उज्वल परंपरा आहे ती का मोडली जात आहे यावर कलाकारांनी बोललं पाहिजे. नाहीतर उद्या गुजरातमधली स्थळं नसतील तर राष्ट्रीय पुरस्कार नाही असा फतवा पण हे लोकं काढतील. ऑस्कर सोहळा लॉसएंजलिसला होतो . ट्रम्प किंवा बुश किंवा ओबामा यांनी आपल्या राज्यात हा सोहळा नेला नाही.
माझी गुजराती बांधवाना विनंती आहे की तुम्ही यांच्या नादी लागून उगाच वाहवत जाऊ नका. आपल्या भाषिक नेत्यांची सत्ता आहे याच्या ज्या गुदगुल्या होत आहेत, त्या सत्ता गेली की अस्वलाच्या गुदगुल्या होतील. भारतातील इतर प्रांतांचे नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर, तिथल्या व्यावसायिकांवर काय अन्याय झाला याचा हिशेब ठेवतील.
या विषयाला आम्ही वाचा फोडूच पण देशातील समस्त कलाकारांनी पण भूमिका घ्यायला हवी. सरकारच्या स्तुतीची गीतं गायला सांगितली की ती लगेच गायला सुरुवात केल्यामुळे आजची ही वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी याविरोधात भूमिका घ्यायलाच हवी. आणि महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी जर कणखर भूमिका नाही घेतली तर या दख्खन प्रांताची जी ओळख आणि अस्मिता आहे त्यावरच हे वरवंटा फिरवतील आणि तेंव्हा वेळ निघून गेली असेल.
राज ठाकरे ।
#राष्ट्रीय_चित्रपट_पुरस्कार
#NationalFilmAwards
धन्यवाद अविनाश जाधव @avinash_mns 🙏
अंबरनाथमध्ये एका मराठी महिलेचा गाळा बळकावून तिथे मुजोरी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी गेलेले मनसे शहराध्यक्ष श्री. शैलेश शिर्के यांच्यावरच पोलिसांनी कारवाई केली. एवढेच नाही, तर पोलिस ठाण्याच्या आवारात भाजप कार्यकर्त्यांनी शिर्के यांच्या गाडीची नासधूस केली, तरीही सुरुवातीला त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिस धजावत नव्हते.
ही बाब मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचताच मनसे नेते श्री. अविनाश जाधव तात्काळ अंबरनाथमध्ये दाखल झाले. न्यायालयापासून पोलिस ठाण्यापर्यंत त्यांनी सरकारच्या या भोंगळ कारभाराचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी लावून धरली.
पोलिसांकडून टाळाटाळ सुरूच राहिल्यानंतर अविनाश दादांनी रविवारी अंबरनाथ पोलिस ठाण्यावर मनसे आणि सामान्य नागरिकांचा विशाल मोर्चा काढण्याची घोषणा केली... आणि अखेर सरकारला नमते घ्यावे लागले!
शनिवारी रात्री उशिरा भाजपचे नगरसेवक करंजुळे आणि वाळेकर यांच्यासह सहा जणांविरोधात BNS 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 189(2), 190, 191(2), 324(5) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
बदलापूर-अंबरनाथ पट्ट्यात सत्तेच्या जोरावर मुजोरी करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत नसतील, तर मनसे त्यांना कायद्याच्या चौकटीत आणल्याशिवाय शांत बसणार नाही!
सामान्य कार्यकर्त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभं राहणं, हीच खरी नेतृत्वाची ओळख.
राजसाहेब ठाकरे प्रत्येक कार्यकर्त्याकडे लक्ष ठेवतात, हे पुन्हा एकदा दिसून आलं.
केवळ भाषणं नाहीत...
केवळ घोषणा नाहीत...
कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा नेता म्हणजे अविनाश जाधव!
म्हणूनच अविनाश जाधव हे फक्त नेता नाहीत...
अविनाश "दादा" आहेत! 🔥
मनसे रिपोर्टकडून मनसेच्या या लढवय्या सरसेनापतीला सलाम! 🚩
मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाला हाताळताना विद्यार्थ्यांवर सर्रास लाठीचार्ज केला जात आहे. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असता तरी एकवेळ ठीक, पण हा म्हणजे कुठलातरी सूड उगवल्यासारखा केला जात आहे. जे व्हिडीओज समोर येत आहेत त्यात फक्त आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे. आणि पोलीस अशी कृत्य करत आहेत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊच शकत नाही .
मुळात आंदोलन का झालं? तर NEET परीक्षेत गोंधळ झाले ज्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थी पण उतरले. थोडक्यात हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलं, मोठं केलं. मग विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय होतं ? आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोणी ? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसाना पण नाही. पण तरीही हे का केलं गेलं ?
पूर्वी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना सर्रास मारायचे ( त्यांचे प्रसाद मलाही अनेकदा मिळालेले आहेत ) जिच्यावर पुढे बंधनं आली कारण न्यायव्यवस्था सोडली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मग हाच न्याय पोलिसांना का नाही ? मी अनेकदा सांगत आलो आहे आणि आजदेखील हेच म्हणेन, महाराष्ट्रातले पोलीस असोत की इतर कुठलेही त्यांना जी कृती करायला सांगितली जाते ती करणे याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कोणी अधिकार दिले ? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का ?
युनायटेड नेशन्सचे काही महत्वाचे नियम आहेत जे ऍम्नेस्टी इंटरनॅशनल पण पाळते. ते म्हणजे, जेंव्हा केंव्हा बळ वापरायची वेळ येईल त्यासाठी केली जाणारी कृती संविधानिक असली पाहिजे- आवश्यक असेल तरच झाली पाहिजे- ती प्रमाणात असली पाहिजे -त्याचं उत्तरदायित्व हवं.
आज नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, न्यूझीलँड या देशांमध्ये अशा पद्धतीने पोलिसी बळाचा वापर झाला तर त्याची कठोर चौकशी होते. आणि त्या चौकशीचा रोख हा आदेश देणाऱ्यांकडे जास्त असतो. हे आपल्याकडे पण व्हायला हवं.
हे कोण करेल असा प्रश्न आहे. पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश या मुलांना झुरळ म्हणणार आणि मग हेच देशातील सर्वोच्च न्यायालय आम्हाला सध्या तरी हे मारहाणीचे व्हिडीओज बघायला वेळ नाही सांगणार. हे अजब आहे. त्यांना नक्की कशासाठी वेळ आहे मग हा प्रश्नच आहे. सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत म्हणून तरुण-तरुणींना रस्त्यावर उतरावं लागत आहे. त्यामुळे याचा विचार सिव्हिल सोसायटीने करायला हवा. यावर चर्चा व्हायला हवी. खासदारांनी संसदेत यावर चर्चेचा आग्रह धरला पाहिजे.
प्रश्न राज्याकडे नागरिकांवर बळ वापरण्याचा अधिकार आहे की नाही, हा नाहीच आहे. तो अधिकार जवळपास प्रत्येक राज्याकडे असतो. खरा प्रश्न असा आहे की, घटनात्मक लोकशाही स्वतःच्या अधिकारावर संयम ठेवण्याची क्षमता दाखवते का? लोकशाहीची परिपक्वता विरोध किती कठोरपणे दडपला जातो यावर ठरत नाही; तर विरोधाचा आवाज कसा संयमाने आणि पुढच्या परिणामांचा विचार करत हाताळते हा आहे !
राज ठाकरे ।
६) आज महाराष्ट्रातील शहरांचा विचका करून ठेवला आहे, आणि याला हे विकास म्हणतात. रस्ते, फ्लायओव्हर्स म्हणजे विकास नाही. हे आमदार खासदार परदेशात जाऊन नक्की काय बघतात हे कळत नाही मला. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आत्ता शहरातील बांधकामं थांबवा.
१ मे ला मिसिंग लिंकचं उदघाट्न झालं आणि पुढे ६०,६५ दिवसांत तिथे पिलर पडून तिथे पाणी गळायला लागलं. फडणवीसांनी भाषणात मिसिंग लिंक प्रोजेक्टला कुठल्या कुठल्या देशातले सल्लागार आणले हे सांगितलं. आणि पुढे आमचा कॉन्ट्रॅक्टर भारतीय हे सांगितलं. इतके सगळे बाहेरून आणले मग कॉन्ट्रॅक्टर तिकडचाच आणायचात. या सगळ्याची वाट लावायला आमचा कॉन्ट्रॅक्टर आहेच. आज कंत्राटदारांना ५६% द्यावे लागतात म्हणे. जर उरलेल्या ४४% मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला अशाच दर्जाचे रस्ते आणि कामं मिळणार.
७) ब्रिटिशांनी बांधलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आज देखील उभं आहे, ब्रिटिशांच्या काळात उभे राहिलेले ब्रिज अजून टिकून आहेत. अमेरिकेत उभी राहिलेली एम्पायर स्टेट बिल्डिंग १४ महिन्यात उभी राहिली पण आज देखील उभी आहे. मग आपल्याकडे काय घडतं नक्की ?
८) नितीन गडकरींच्या खात्याचं काम रस्ते बांधायचं. पण ते सोडून ते बोलत आहेत पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळायचं यावर. हे तुमचं काम नाही ते पेट्रोलियम मंत्री बघून घेतील.
९) इतकं सगळं घडून पण लोकांना राग येत नाही. लोकांना जो काही राग येतो तो ते मोबाईलवर व्यक्त करतात आणि शांत बसतात. मला कोणाची सत्ता आहे किंवा नाहीये याने काही फरक पडत नाही. भाजपचा एक आमदार, विधिमंडळात लोकं कशी गटारात पडून मरत आहेत, झाडं पडत आहेत यावर चर्चा सुरु आहे म्हणून हसतोय. भावनाशून्य झाले आहेत हे सगळे. आणि हे भावनाशून्य झालेत कारण लोकांना राग येत नाहीये.
१०) आपले सत्ताधारी, आमदार फोडता येत आहेत का, खासदार फोडता येत आहेत का, नगरसेवक फोडता येतील का यातच रमले आहेत.
११) लोकशाही कशी जिवंत असते याचं एक उदाहरण सांगतो. याच्या आधी पण सांगितलं आहे पण पुन्हा सांगतो. दुसरं महायुद्ध विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली जिंकलं. त्याबद्दल संपूर्ण इंग्लडने त्यांना डोक्यावर घेतलं पण पुढे ८ महिन्यांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. कारण लोकांनी सांगितलं तुम्ही युद्ध काळात उत्तम कारभार केलात पण म्हणून शांततेच्या काळासाठी तुम्ही योग्य नाहीत. माणसं किती सुज्ञ असतात बघा. माणसं फक्त सुशिक्षित असून चालत नाहीत तर ती सुज्ञ असावी लागतात. ज्या देशातील समाज सुज्ञ असतो त्याच देशाची प्रगती होत असते.
१२) मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकची झालेली घटना मान्य करून, खरंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं म्हणायला हवं होतं. पण ते सोडून ते म्हणत आहेत की मी बघून घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही कुठली भाषा आली ? एक खासदार सांगतो बॉम्ब टाकेन, माझ्यावर ५ खुनांचे आरोप आहेत असं सांगतो. तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही.
१३) आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही सतर्क रहा. मराठी मुलांना नोकऱ्या मिळत आहेत का, त्यांना टेंडर मिळत आहेत का, त्यांना कामं मिळत आहेत का पहा.
राज ठाकरे ।
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे.
यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील.
तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.
यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत.
फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.
बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच.
आपला नम्र
राज ठाकरे ।
मुंबई महानगर पालिकेत आता भाजपची सत्ता आहे , म्हणजे तिथल्या सर्व चांगल्या वाईट कामाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचीच आहे.
मात्र चांगल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी हा पक्ष शहर भर बॅनर बाजी करत आहे मात्र जेव्हा कसोटीचा काळ येतो तेव्हा ते अपयश प्रशासनाच्या माथी मारत आहे.
#BMC #नालेसफाई #भाजप #Mumbairains
अजून पाऊस आलाच नाही मात्र केवळ मान्सून पूर्व थोड्याशा सरींनी अमित साटम ह्यांच्या मतदार संघाजवळील अंधेरी सब वे पाण्याखाली जातो.... हा सबवे बंद होतो.....त्याच्या बातमी होतात.
मग प्रश्न हा पडतो भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे दिवसभर महानगर पालिकेत बसून नक्की करत काय असतात ? २० एक गाड्या घेऊन केवळ प्रसिद्धीसाठी पाहणी दौरे करणाऱ्या अमित साटम ह्यांना आता उत्तर द्यावे लागेल. मुंबईची तुंबई होऊ देणार नाही हे फक्त बोलून नाही तर करून दाखवावे लागेल. #mumbairains
@AmeetSatam@BJP4Mumbai@YKilledar@SandeepDadarMNS
आता जी ५०० रू ची नोट वापरात आहे ती अभिमान नाही का? स्वाभिमान नाही का?
ही फक्त नोट नाही... पॉलिमर कंपनीला नफा मिळवून देण्याचा डाव पण आहे.
कोणाची आहे पाॅलिमर कंपनी.
सोलापूर–मुंबई ट्रेन महाराष्ट्रातच धावते. मग या ट्रेनमध्ये दिले जाणारे अन्न गुजरातमधून का येते?
महाराष्ट्रातील उद्योग, महिला बचत गट किंवा स्थानिक पुरवठादारांना संधी का दिली जात नाही?
हा निर्णय कोण घेतं? यावर देखरेख कोणाची?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@BJP4India
जनगणनेत १९९० पुर्वी जन्माला आलेले परंतु अविवाहित असलेल्या तरुणांची संख्या वेगळी मोजावी शेतकरी व कामगार तरुणांचे एक भीषण वास्तव समाजासमोर येईल.
@ANI@PTI_News
मराठी तरुणांनो,
भारतीय रेल्वे सारख्या केंद्रीय आस्थापनेत भरती व्हा. तुमच्या जवळील मित्र, नातेवाईक ह्यांपर्यंत हे नक्की पोहचवा. अधिक माहितीसाठी RRB च्या वेबसाइटला भेट द्या.
रेल्वेत मराठी तरुण भरती व्हावेत ह्यासाठी राजसाहेब ठाकरे, मनसे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना नेहमीच प्रयत्न करत असते. तरी आपण ह्या संधीचा नक्की लाभ घ्या. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ जून २०२६ आहे हे लक्षात ठेवा , त्वरा करा.
#RAILWAY #ALP #लोको_ड्राइवर #राज_ठाकरे #मनसे #MNS
अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
खड्डे दाखवले… व्हिडिओ दाखवले… 29 दिवस 490किमी पायी सत्याग्रह केला GPS लोकेशनसह पुरावे दिले… तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, पेन तालुका, निगड्या गावाजवळ… नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डा पडतो. तीन महिने तसाच राहतो. दाखवल्यानंतर भरला जातो… पण कशाने? मातीने!
मग प्रश्न विचारायचा नाही का?
वेगाने धावणाऱ्या गाड्या, मिडियन कट, अचानक समोर आलेला खड्डा, सडन ब्रेक… आणि मागून येणारा ट्रक!
जर एखादा जीव गेला तर जबाबदार कोण?
टोल मात्र वेळेवर घेतला जातो… मग सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?
मी विरोधासाठी बोलत नाही… मी त्या आई-वडिलांसाठी बोलतोय, ज्यांचा मुलगा किंवा कुटुंबातील व्यक्ती उद्या या खड्ड्यामुळे घरी परत आली नाही तर?
आता तरी सांगा…
मी अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #reality #potholes #pen #chaitanyaushalaxmanpatil