📍 नाथ्रा ता. परळी वैद्यनाथ
विधानपरिषदेच्या बीड - लातूर - धाराशिव स्थानिक स्���राज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. बस्वराज पाटील यांनी आज निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगर परिषदेच्या सदस्यांसह त्यांचे स्वागत केले.
या निवडणुकीत श्री. बस्वराज पाटील यांना एकमताने पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित सर्वांना केले...
@basavrajmpatil
#विधानपरिषद_निवडणूक
#महायुती
#ParliVaidyanath
#DMUpdates
📍 जगमित्र कार्यालय, परळी वैद्यनाथ
दि. ०९ जून, २०२६
आपला नेहमीचा जनता संवाद...
जगमित्र कार्यालयात नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिक, सहकारी, पदाधिकारी आदींच्या भेटीसाठी उपस्थित राहून त्यांच्या समस्यांच��� निराकरण केले...
#ParliVaidyanath
#DMUpdates
परळी शहरातील 350 वर्ष जुने असलेल्या श्री बालाजी मंदिरात आज आरती करण्याचा योग आला, यावेळी श्री. बाजीराव धर्माधिकारी, राजाभैय्या पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
#परळी@dhananjay_munde
परळी शहरातील आमचे स्नेही तथा परळी नगरीचे उनगराध्य��्ष राजा खान व त्यांचे बंधू जाफर खान यांनी मुस्लिम धार्मियांच्या गरीब कुटूंबातील मुला मुलीच्या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#परळीशहर
@dhananjay_munde
📍परळी वैद्यनाथ
परळी वैद्यनाथ मतदारसंघात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेतून प्रस्तावित कामांचा आज संबंधित विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह आढावा घेतला.
मतदारसंघात मनरेगा व जिल्हा नियोज��� समितीच्या संयुक्त माध्यमाने आगामी वर्षात शेत/पाणंद रस्त्यांचे उद्दिष्ट ठरवणे, त्यानुषंगाने निधीची मागणी करणे, प्रस्तावित रस्त्यांच्या कामातील अतिक्रमण सह विविध अडचणी दूर करणे यांसह विविध विषयांवर व्यापक चर्चा करून आवश्यक सूचना केल्या.
मतदारसंघातील प्रत्येक गावातील सरपंच व प्रतिनिधींच्या सुचनांचा सकारात्मक विचार करून अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचनेसह आवश्यक तिथे मी स्वत�� मदतीसाठी उपलब्ध राहील, असा शब्दही दिला.
#ParliVaidyanath
परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास सुधारित ३०० कोटी रुपयांची मान्यता देण्यात येणार असल्याचे आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले.
श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा व्यापक विकासासाठी कायम सकारात्मक राहून गती दिलेले स्व. अजितदादा पवार यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून मा. मुख्यमंत्री महोदयांचे व महायुती ��रकारचे मनःपूर्वक आभार!
@Dev_Fadnavis
#Parli
#ParliVaidyanath
#Development
महाराष्ट्र विधानभवनातील स्व. अजितदादांच्या कार्यालयात स्व. दादांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. दादांच्या विधिमंडळातील अनेक वर्षांपासूनच्या अनेक आठवणी क्��णात डोळ्यात उभ्या राहिल्या...
#AjitDada
आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा,
तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी काळ जरी पुढे गेला तरी भरून निघणार नाही
भावपूर्ण श्रद्धांजली..!
📍गणेशपार, परळी वैजनाथ
प्रत्येक निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीच्या प्रचाराची सांगता परळी शहरातील गणेश पार येथे माझ्यासह ना. पंकजाताईंच्या उपस्थितीत जाहीर सभेने झाली, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित परळीकर मायबाप जनतेशी संवाद साधत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
रस्ते, नाली, पाणी, वीज अशा भौति�� सुविधांसह ज्योतिर्लिंग स्थळ असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या तीर्थक्षेत्र विकासाचे 350 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत, कामे पूर्ण झाल्यानंतर यातून रोजगाराच्या संधीसह आर्थिक उलाढालीमध्येही वाढ होणार आहे. आगामी काळात उभारण्यात येणाऱ्या 350 मेगावॅटचा मेगा सोलर प्रकल्प, अल्ट्राटेक कंपनीने 600 कोटींच्या गुंतवणुकीचा केलेला करार, यासह विविध शासकीय शिक्षण संस्था मधूनही रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालला मिळेल. त्याचबरोबर आगामी काळात केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेमध्ये परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करून राष्ट्रीय पातळीवर या शहराचा विकास करण्याचा रोडमॅप आजच्या या सांगता सभेमध्ये जनतेच्या समोर मांडला.
विरोधकांनी मला संपवण्याचे ठरवून गेल्या वर्षभरात मला आणि परळीला हिणवून बदनाम करून आपले पोट भरले आणि अजूनही भरत आहेत. या बदनामीला ��नता आता मतदानातून उत्तर देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
2011 पासून आज पर्यंत कुठेही विकास कामांना ब्रेक न लागू देता एक रुपयाही टॅक्स वाढवला नाही, भविष्यातही वाढवणार नाही. मराठवाड्यात सर्वाधिक घरकुले आम्ही दिली पुढेही विविध योजनांसह म्हाडा सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून घरकुलांचा कोटा पूर्ण करू, असा शब्दही यावेळी दिला.
बौद्ध विहार उभारणीच्या 28 कोटी रुपयांच्या प्रस्तावास लवकर��� प्रशासकीय मान्यता मिळेल, त्याचबरोबर विविध धार्मिक स्थळांची जागा पी टी आर स्वरूपात नोंद करण्याची प्रक्रिया ही आगामी काळात पूर्ण करायची आहे.
मुळात आम्हाला मोठे व्हायची हाव नाही, परळीचे नाव आणि इथला माणूस मोठा झाला पाहिजे हे आमचे एकमेव ध्येय असून यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू असा विश्वास माझ्या मायबाप जनतेला दिला.
इथल्या जनतेने आम्हाला भरभरून ��्रेम दिलेले आहे, नगरपरिषदेच्या या निवडणुकीत देखील महायुतीच्या नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे नम्र आवाहन यावेळी समस्त परळीकरांना केले.
गणेश पार येथील सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहून विजयावर शिक्कामोर्तब केलेल्या सर्व परळीकर मायबाप जनतेचे व सहकाऱ्यांचे मनापासून आभार...!
@Pankajamunde
#ParliVaidyanath
#LocalBodyElections
#NagarParishad
#Mahayuti
#WeWillWin
परळीतील पंकजाताईंच्या व प्रीतमताईंच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात आज माझ्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे यांची भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
#स्नेहमिलन#परळीशहर@Pankajamunde@DrPritamMunde
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमास आज परळी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली व दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
@andharesushama#परळीशहर