भाजप महाराष्ट्रात सत्तेत आली - एकनाथ शिंदेच्या मदतीने
बिहार मध्ये - नितीशकुमार
काश्मीर मध्ये - महबूबा मुफ्ती
आसाम - हेमंता बिस्वा सरमा
आंध्र - चंद्राबाबू नायडू
नागा लँड - नेफेयू रिओ
पुड्डुचेरी - रंगस्वामी
आता बंगाल - सुवेंद्रु अधिकारी
..
हे सगळे एकतर दुसऱ्या पक्षातून आयात केलेले किंवा त्याच्याशी अभद्र युती करून त्यांना सोबत घेतलेले....
..
ह्यात मोदींचं किंवा भाजपचं कर्तृत्व काय? भाजपाडे कशाचा आनंद साजरा करतायत?
..
"मेरा बाप चोर है" असं हातावर लिहिलं म्हणून संतापाने पोरगं बदला घ्यायला निघालं.
इथे भक्ताड मंडळी आनंदाने नाचतायत "आमचा बापू चोर आहे"
.
.
#मोदी #बंगाल_का_रिजल्ट
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
हिंदी सक्तीवरून प्रबोधनकारांचे वारसदार एकत्र येत आहेत ही मोठी गोष्ट आहे!
फक्त एकच विनंती आता मागे फिरू नका...
महाराष्ट्रात दगाफटका झाला आहे, मुंबईवर सावट आलेलं आहे... एकत्र या आणि लढा... नाहीतर महाराष्ट्र आणि मराठी माणूस सगळ गमवून बसेल! #महाराष्ट्रधर्म
मराठी साठी #दोन्ही_भाऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. #मराठी_माणूस#मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल.
#माय_मराठी | #महाराष्ट्र_धर्म | #मराठी_माणूस |
आताच दिल्लीच्या वजीराने मिंधे आणि त्यांच्या गटाला 'त्याग' शब्दाचे महत्व सांगितले म्हणे!
खेळ सुरू झाला आहे..आता तत्व वगैरे सांगून शिंदे गटाच्या जागांची प्राथमिक छाटणी होईल.. मग येतील सर्व्हे.. मग येतील उमेदवार बदलायच्या अटी.. लक्षात ठेवा, शिंदे गटाला भाजप एक-एक जागेसाठी रडवणार!
#MaharashtraElection2024
#MaharashtraAssemblyElections2024
#MaharashtraPolitics
ज्या क्षणाची महाराष्ट्रातले आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलाय!
२० नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस आहे.
गेल्या २ वर्षात महाराष्ट्राला लुटणाऱ्या शिंदे-भाजपला हुसकावून लावण्यासाठी आपल्याला बदल घडवायचा आहे...
आम्ही न्यायसंस्थेकडून न्यायाची वाट पाहत होतो, पण आता जनताच न्याय करणार! मशाल धगधगणार!
जय महाराष्ट्र!
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांना कोणी सांगावं...महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही..
इतिहासात हेच लिहिले जाणार, महाराष्ट्र पायदळी तुडवला जात असताना प्रेक्षक गॅलरीत VVIP सीट वर तुम्ही फक्त बघत बसले होते! #महाराष्ट्र
१२ ऑक्टोबरला फेरीवाला व रिक्षाचालक यांनी केलेल्या हल्ल्यात मनसे कार्यकर्ता आकाश माईन याचा जीव गेला तर त्याच्या पत्नीचा गर्भपात झाला व वडिलांचा डावा डोळा निकामी झाला..
पक्ष बाजूला ठेवून एक मराठी माणूस म्हणून हा प्रकार तीव्र संतापजनक आहे..🤬🤬
हिंदवी स्वराज्य शिवरायांनी घडवलं ते माँसाहेब जिजाऊच्या स्वप्नातीलच.
महिलांना तुम्ही जे कमी लेखत आहात ना त्या तुमच्या सडक्या बुद्धीची कीव येते,
महिलांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत, आ.गोगावले यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी.
@AUThackeray@SardesaiVarun