📍महाराष्ट्र विधीमंडळ- पावसाळी अधिवेशन
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 2026 च्या पहिल्या दिवशी आज विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधानसभा गटनेते विजय वडेट्टीवार, आमदार भास्करराव जाधव, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, नितीन राऊत, सचिन अहिर, वरूण सरदेसाई यांच्यासह अभिवादन केले. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
सोमवार, 22 जून 2026
अभिनंदन भैया !
अगदी सुरुवातीपासून शेतीची प्रचंड आवड असणारे , कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रह, शेती आणि शेतकरी यांच्या विकासाची भूमिका, कृषी शिक्षणाच्या माध्यमातून युवा ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे माझे ज्येष्ठ बंधू डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या या गौरवाने कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून आम्हा सर्वांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागात दाखल होणाऱ्या ई-बसेस साठीच्या नुतन यंत्रशाळेतील चार्जिंग स्टेशन, कॅंटीन, मॅनेजमेंट इमारत तसेच इतर चालू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी परिवहन समिती सदस्य श्रीधर गाडगीळ व महेंद्र कोरडे उपस्थित होते.
अक्षय शेळके
परिवहन समिती सदस्य
आज कंदलगाव के गंगावेस या मार्गावर के.एम.टी ने प्रवास केला यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या के.एम.टी बाबतच्या समस्या व मत जाणून घेतले यावेळी के.एम.टी चे वाहतूक निरीक्षक नितीन पोवार उपस्थित होते.
अक्षय शेळके
परिवहन समिती सदस्य को.म.न.पा
स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या स्मृतीदिनी अभिवादन
आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आयुष्य वाहणारे देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या स्मृतीदिनी आज जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, नगरसेवक अमर समर्थ, संजय मोहीते, दिपाली घाटगे, शुभांगी पाटील, अर्चना बिरंजे, यांच्यासह बाळासाहेब सरनाईक, बबन रानगे, मोहन सालपे, संजय पटकारे, संदिप बिरंजे, विशाल गवळी, राजदिप भोसले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवार, २१ मे २०२६, स्थळ- कोल्हापूर
*कोल्हापूर NSUI कडून NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा निषेध*
NEET परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणात NTA च्या चुकीच्या कारभाराचा तसेच केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाचा कोल्हापूर NSUI च्या वतीने निषेध करण्यात आला.
*कोल्हापूर NSUI कडून NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा निषेध*
NEET परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणात NTA च्या चुकीच्या कारभाराचा तसेच केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाचा कोल्हापूर NSUI च्या वतीने निषेध करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाची पाचवी सभा आज पार पडली. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदतवाढ, किमान वेतन,परिवहन विभागाच्या रिकाम्या जागांचा भाडेत्तत्वावर वापर यांसारखे महत्वाचे ठराव करण्यात आले यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.
अक्षय शेळके
परिवहन समिती सदस्य को.म.न.पा
कोल्हापूर दक्षिण मधील 13 गावांसाठीची जलजीवन योजना जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याची मेघा कंपनीची लेखी ग्वाही ; एमजेपी कार्यालयावर घागर मोर्चा आणि ठिय्या आंदोलन
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 13 गावांसाठी वरदान ठरणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजना राजकारणासाठी जाणीवपुर्वक रखडत ठेवून पाण्यात सुद्धा राजकारण करणाऱ्या महायुती सरकार आणि मेघा इंजीनियरिंगच्या विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोल्हापूर येथील कार्यालयावर आज माझ्या नेतृत्वात घागर मोर्चा नेण्यात आला. योजनेचे काम कधी पूर्ण होणार हे लेखी द्यावे यासाठी ठिय्या आंदोलन केले.
आमदार सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आमदार असताना विशेष प्रयत्न करून ही योजना मंजूर करून आणली होती. या कामाचे क्रेडिट आम्हाला मिळू नये, यासाठी विद्यमान राज्य सरकार आणि हैदराबाद येथील मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुद्दामहून हे काम रखडवत आहेत. त्यामुळे यापुढे कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कंपनी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत मी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेणार असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगितले. माझ्यासह महिला आणि ग्रामस्थांनी यावेळी योजनेच्या कामाबद्दल एमजेपी अधिकारी आणि मेघा कंपनी अधिकारी यांना धारेवर धरले. काम कधी पूर्ण होणे हे लेखी द्या त्यानंतरच आम्ही इथुन उठणार अशी भूमिका यावेळी घेतली. यावर जून 2027 पर्यंत योजना पूर्ण करण्याची ग्वाही मेघा कंपनीचे श्री. नितीन माने यांनी लेखी स्वरूपात दिली. यावेळी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय पाटील, प्रभाकर गायकवाड, आर एन. मेस्त्री उपस्थित होते.
या मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, संग्राम पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील (चुयेकर), जिल्हा बँक संचालक स्मिता गवळी ,पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, शिल्पा हजारे, अनिता कांबळे, संगीता यादव, सरपंच उत्तम आंबवडे, मधुकर चव्हाण, निशांत पाटील, चंद्रकांत डावरे, ए व्ही कांबळे, प्रियंका पाटील, रूपाली कुसाळे, सुमन गुरव, शुभांगी अडसूळ, अश्विनी शिरगावे, राधिका खडके, जहीदा इनामदार, शैलजा भोसले, प्रताब चंदवानी, बाबासो माळी, आशिष पाटील, युवराज गवळी, सुनील शिंदे, अमर मोरे, अरुण पाटील टोपकर, विनोद हुजूरानी, कीर्ती मसुटे, रावसाहेब पाटील, सचिन देशमुख, महेश जाधव, सुदर्शन पाटील, के. डी. माने, नायडू बागणे, दत्ता भिलुगडे, संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, सतिश निर्मळ, ऋषिकेश हुन्नुरे आदींसह महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*निशाना मारा पुस्तक मिळवा*
कोल्हापूर शहर जिल्हा NSUI च्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल गरळ ओकणाऱ्या धिरेंद्र शास्त्री व अपशब्द वापरून धमकावणारे आमदार संजय गायकवाड यांचा निशाना मारा व पुस्तक मिळवा असे आंदोलन करून निषेध करण्यात आला..