A Knock on the Door
By imposing a 'Merchant Discount Rate' (MDR), or simply put, a fee on UPI transactions (albeit not across the board), the Central Government has set a 'digital trap' for Indians, whether they are merchants or consumers. First came demonetization; then the UPI system was introduced with great fanfare to showcase the push for digital transactions. They trumpeted its success, basked in self-praise, got people habituated to it, and then suddenly announced that fees would apply to these transactions. In short, they lulled citizens into a false sense of security and quietly ensnared them in a 'digital trap.' For years, I have been warning people not to be complacent or assume that everything is running smoothly. This government is bound to come knocking at your door eventually, and that process has already begun.
The government introduced the UPI system for digital transactions. It sought a positive response, and it got one. Which is fine. But if the intention behind introducing this digital payment system was truly to simplify financial exchanges, why weren't provisions made right from the investment stage to ensure its sustainability without hitting the common man's pocket? Such payment systems require funds for long-term maintenance and cybersecurity; why wasn't a permanent budgetary provision made for this?
Will an MDR of 0.4% apply to purchases exceeding ₹2,000? The government claims that merchants should bear this burden, but what guarantee is there that merchants will absorb the cost instead of passing it on to the customers? Does the government have any mechanism to monitor this? The answer is a resounding 'no.'
The current Finance Minister would likely levy 18% GST on the air that we breath if it were physically possible; since it isn't, she has imposed GST on the MDR (Merchant Discount Rate) instead. In short, dip into citizens' pockets wherever possible. Prime Minister Modi used to travel abroad promoting UPI and patting himself on the back; when he visits foreign countries next, will he laugh aloud and explain how he imposed MDR and GST?
The Congress party has alleged that this move was made under pressure from the US government. I do not know about that. However, can the central government confidently state whom they consulted before this decision, or deny that foreign card companies and global payment systems were uneasy about the situation? The answer is no. There was likely pressure from somewhere, and the government seized the opportunity to fill its own coffers.
The issue isn't about forty paise or forty rupees; it is about the government's intentions. Whether it was demonetization or digital payments, the government's intentions were never transparent. The question of who would bear the cost of operating UPI should have been addressed right when the system was being established - a step that was either overlooked or deliberately avoided. The Finance Ministry had explicitly stated this in 2022. However, as I mentioned, the plan to dip into your pockets had already been fixed. The government should not resort to hollow arguments about transactions between individuals being exempt. You have set a digital trap, and every Indian is now caught in it.
The Maharashtra Navnirman Sena registers its protest against this MDR (Merchant Discount Rate). Merchants should vehemently oppose paying these charges.
(I am deliberately attaching a screenshot of the tweet from August 21, 2022, in which the government announced that there would be no charges on UPI transactions.)
Raj Thackeray
आज ६ सप्टेंबर २०२६ रोजी ठाणे येथील श्री. गडकरी रंगायतन येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरं कोणी नाही बसू शकत.
आपण धर्माभिमानी असलं पाहिजे धर्मांध होता कामा नये. तुम्हाला धर्मांध केलं जात आहे, जेणेकरून इतर गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून व्हिडीओ करून भारतीयांना सांगितलं परदेशात जाऊ नका. पण एकीकडे मोदी सांगतात परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका आणि दुसरीकडे आपल्याला सांगितलं जातंय आपला जीडीपी वाढला. हे कसं शक्य आहे?
देशाची अर्थव्यवस्था डगमगली याचा परिणाम म्हणून ज्याप्रकारे सध्या पेपर फुटी व शिक्षणाच्या प्रश्नांवर विद्यार्थी रस्त्यावर आले त्याप्रकारे उद्या आख्खा देश रस्त्यावर येईल.
आपल्या देशातील ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातलं कामकाज बंद केलं. यातून किती जणांचे रोजगार गेले असतील याचा विचार करा!
पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावला पाहिजे पण दुसऱ्या भिंतीवर. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत नाही.
२०१८-१९ पासून आजपर्यंत भारतात २००-२५० कोटींची गुंतवणूक करू शकणारे साधारण १३००० उद्योगपती देश सोडून गेले. जर देशाता जीडीपी ७.८ टक्के आहे तर हे उद्योगपती देश सोडून का जातात?
डीजेच्या विषयावर मुख्यमंत्री पुण्यात काय म्हणाले ते मला अजून पर्यंत कळलं नाही. नागपूरात डीजे बंदी करण्यात आली आहे मग, संपूर्ण महाराष्ट्रात का होऊ शकत नाही?
बेरोजगारी, महागाई, ढासळलेली शिक्षण व्यवस्था हे असे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावरून दुर्लक्ष व्हावं म्हणून तुम्हाला धर्माची गुंगी दिली जातेय.
२०२४ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात जे नवीन मतदार टाकले होते त्यातले ९५ टक्के मतदार सध्या एसआयआरच्या माध्यमातून काढून टाकले. म्हणजे २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष खोट्या मतदारांवर निवडून आला असाच त्याचा अर्थ झाला ना?
मला सर्वाधिक भिती आहे ती म्हणजे येत्या गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील. जेणेकरून तुम्ही त्याच्यात गुंतून राहिलं पाहिजे. माझं सुजाण हिंदू आणि सजाण मुस्लिम नागरिकांना आवाहन आहे की सतर्क राहा!
डीजे, डॉल्बी वापरला जाऊ नये आपले सण-उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जावेत ही भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली आहे.
राज ठाकरे ।
उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रात टॅक्सी-रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ देण्याचं हे लाचार राजकारण आहे. मालाडमध्ये मराठीत OTP सांगणाऱ्या मुलाशी टॅक्सीचालकाने केलेली मुजोरी असो, किंवा संपात सहभागी झाले नाहीत म्हणून आमच्या मराठी चालकांना झालेली मारहाण असो... हे असे मराठी माणसाला चॅलेंज करणे अजिबात सहन केले जाणार नाही. जे परप्रांतीय प्रामाणिकपणे मराठी शिकतात त्यांचं स्वागतच आहे, पण "शिकणार नाही, काय उखाडायचं ते उखाडा" अशी मुजोरी केली, तर उत्तर सडेतोडच मिळणार! सरकार भलेही त्यांना हिंदीत बोलण्याची सूट देईल, पण आम्ही मराठीतच बोलणार.
दुसरीकडे, राजकीय दडपशाहीचा घाणेरडा खेळ सुरू आहे. खारघरमध्ये 'SIR' चे सरकारी फॉर्म्स थेट सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडे सापडतातच कसे? १५-१५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना आता लोकांनीच रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची वेळ आली आहे.
माझ्या वाढदिवशी वात्सल्य या विशेष मुलांच्या संस्थेत गेलो होतो, तेव्हा या मुलींनी हक्काने राखी बांधायला बोलावलं होतं. आज रक्षाबंधनानिमित्त पुन्हा त्या प्रेमाच्या नात्याने त्यांची भेट घेतली. लालबागच्या राजाच्या दर्शनाची त्यांची इच्छा आहे, ती नक्कीच पूर्ण करणार!
महाराष्ट्राची संस्कृती, अस्मिता आणि हक्क यासाठीचा हा लढा असाच सुरू राहील!
आपल्या प्रश्नांबद्दल खरी आस्था फक्त राज ठाकरेंनाच असते याची खात्री मराठी माणसाला आहे, त्यामुळे मराठी माणूस त्याचे प्रश्न हक्काने सत्ता नसली तरी सत्ताधार्यांना हलवू शकणाऱ्या, त्यांना कृती करायला भाग पाडणाऱ्या राजसाहेबांकडेच घेऊन येतात.
#राजठाकरे#RajThackeray#मराठी#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा २० वा वर्धापनदिन. त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना संबोधित केलं.
१) माझ्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाली. तिथे काम करत इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
२) NEET परीक्षेतील गोंधळाच्या नंतर देशभर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्यानंतरचा विद्यार्थ्यांचा हा पहिला मेळावा. मी जेंव्हा कामाला सुरुवात केली तेंव्हा काळ वेगळा होता, तेंव्हाचे विद्यार्थ्यांच्या समोरचे प्रश्न वेगळे होते, आजचे प्रश्न वेगळे आहेत. सगळं स्वरूपच बदललं आहे. मी टेलिग्राम ते इंस्टाग्राम काळ पाहिला आहे.
३) आज 'जेन झी' आंदोलनानंतर 'जेन झी' बद्दल खूप बोललं जात आहे. पण जेन झी म्हणजे फक्त शहरातील जेन झी असा समज करून घेऊ नका. जसे त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजेत तसे ग्रामीण महाराष्ट्रातील पण याच वयोगटातील जे तरुण-तरुणी आहेत. त्यांचे प्रश्न काय आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सहकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
४) सगळ्याच कल्पना आता बदलल्या आहेत. आमच्या लहानपणी सांगायचे की रोज डोक्याला तेल लावा मग बुद्धी तल्लख होते. पण सध्या राज्याचे जे उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत ते त्यांच्या डोक्यावरच्या प्रत्येक केसाला तेल लावतात तरीही त्यांच्या बुद्धीत फारसा फरक पडला नाही. ते म्हणाले दिल्लीत आंदोलनाच्या दरम्यान जी दगडफेक झाली त्या दगडांवरचे फूटप्रिंट घेऊन ते आधार कार्डशी लिंक करून दगडफेक करणाऱ्याना शोधणार. काय बोलताय ? फूटप्रिंट आणि फिंगरप्रिंटमधला फरक नाही कळत ? अशा माणसांबद्दलचा 'जेन झी' च्या मनात राग असणारच ना. कोल्हापूरकरांनी पुण्याला यांना पाठवलं की विद्येच्या माहेरघरात जाऊन काही फरक पडेल पण काहीही फरक पडला नाही यांच्यात.
५) आज सकाळीच पंतप्रधानांचं निवेदन पाहिलं. त्यात त्यांनी म्हणलं आहे ते मान्य आहे. त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली गेली ती अयोग्यच होती. अशी भाषा कोणी कोणाच्या बाबत वापरूच नये. हे चूकच आहे. पण हे तुमच्या लोकांना पण सांगा. २०१२ पासून ज्या ट्रोलच्या सेना तुमच्या पक्षाने पोसल्यात त्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी ते आमच्यासकट सगळ्यांना घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करतात. आज महाराष्ट्रात कलाकारांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर ट्रोल केलं जातं. या सगळ्याबद्दल तुमच्या लोकांना पण कधीतरी सांगा. जे पेराल तेच उगवतं.
पंतप्रधान म्हणाले की माझ्या आईबद्दल चुकीचं बोललं गेलं. ते चूकच आहे. असं होता कामा नये. पण दुसऱ्यांना सुद्धा आई असते हे तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुमच्या पक्षाने जे ट्रोल पोसलेत त्यांना सांगा. तुम्ही म्हणालात की 'मुलांना माफ केलं आहे'. पण तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार ? ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठ्या मारल्या, ज्यांनी विद्यार्थ्यांची डोकी फोडली आणि हे सगळं करा असं ज्यांनी सांगितलं ते कधी माफी मागणार ?
६) जे आंदोलन झालं ते फक्त NEET परीक्षांतील गोंधळामुळे झालं आहे असं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन मुलांच्या, तरुण-तरुणींच्या मनात काय खदखदतंय याचा विचार करा. आज रस्ते धड नाहीत, सगळीकडे पाणी तुंबतं, मैदानं नाहीत, बागा नाहीत, धड शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत, सर्वत्र खाजगीकरण सुरु आहे. सगळ एकाच उद्योगपतीच्या घशात टाकणं सुरु आहे. आज आमदार, खासदार ५०, १०० कोटी देऊन फोडले जात आहेत. डिजिटल इंडियाची घोषणा करणारं सरकार आमदार खासदार फोडताना कार्ड कुठे स्वाईप करता ? या सगळ्या परिस्थितीचा राग आज विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या, तरुण-तरुणींच्या मनात आहे, आणि त्याचा हा उद्रेक होता. आणि अजून सुद्धा उद्रेक बाहेर येणार आहे. कोणाला सत्तेवरून खेचणं आणि कोणालातरी सत्तेत आणणं हा विषय नाहीये. देशातील तरुणांच्या भविष्याचा विषय आहे.
७) ग्रामीण भागातील तरुण-तरुणींच्या मनात काय सुरु असेल ? ते काय विचार करत असतील ? आज त्यांच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जे आत्महत्या करत आहेत ते तरुण-तरुणींच्या नात्यातील, ओळखीतील लोकं असतील. त्यांच्या अंत्यविधीला जाताना या मुलांच्या मनात काय विचार येत असेल ? आपल्या घरच्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून ही मुलं गाव सोडून शहरांत येतात. नोकरीसाठी वणवण करतात. आणि इथे येऊन सुद्धा काय तर शहरं बकाल झालेली आहेत हे पाहतात.
८) या सरकारने 'स्मार्ट सिटी'चा गाजावाजा केला. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटी ? इथलं एकही शहर धड नाही. आज मुलं परदेशात जात आहेत. का तर इथे त्यांना राहावंसं वाटत नाही. शहरं बकाल आहेत, मुलाबाळांना कुठे बाहेर नेण्याची सोय नाही. परदेशात उत्तम रस्ते, मैदानं, बागा, स्वच्छता, खेळांची संकुल सगळं काही आहे. या सगळ्यामुळे या मुलांना परदेशात जाऊन स्थायिक व्हावंसं वाटतं. आणि आपल्याला याचं काहीच वाटत नाही ?
९) सरकारने लोकसभेत मान्य केलं आहे की या देशातील उद्योजक हा देश सोडून जात आहेत. मोदींच्या आयुष्यावरच्या सिनेमात मोदींची भूमिका करणारा विवेक ओबेरॉय हा दुबईत राहतो. मोदींच्या काळात कसं सगळं छान झालं, कसा देश बदलला असल्या गप्पा मारणारा आर माधवन कुटुंबासकट दुबईत जाऊन राहतो. जर मोदींनी सगळं कसं छान केलं आहे असं वाटतंय ना मग तुम्ही का परदेशात स्थायिक होत आहात ? हे लोक इथे येणार सरकार स्पॉन्सर्ड फिल्ममधे काम करणार आणि पुन्हा दुबईला जाणार.
उद्योगपती परदेशात जात आहेत
१०) पंतप्रधान म्हणतात विद्यार्थी चुकीच्या रस्त्यावर भरकटलेत. ते भरकटले नाहीयेत तर त्यांना तिकडे ढकललं जात आहे. ओशोंच एक सुंदर वाक्य मध्ये ऐकलं, ते म्हणाले, "कौन कहता है देश का युवक गलत रास्ते पर भटक रहा है। अगर रास्ता बननेवालेने गलत रास्ता बनाया है तो युवकों का क्या उसमें दोष ?" या मुलांच्या अपेक्षा मारल्या जात आहेत. त्यांना आसपास आपल्यासाठी काहीच चाललं नाहीये हे दिसल्यावर त्यांनी काय करायचं ?
११) आज देशातील तरुण-तरुणी माझं सगळं चांगलं होऊ दे, मला नोकरी मिळू दे, माझं लग्न होऊ दे म्हणून देवळात जाऊन देवाकडे प्रार्थना करतात. त्या देवाच्या देवळातच चोरी होत आहे. राम मंदिर या देशातील करोडो लोकांच्या भावनेचा विषय. पण त्याच देवळातून पैशाचा अपहार होणार असेल तर या मुलांनी कुणाकडे बघायचं ? मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला स्वतः एकटे आत होते आणि स्वतः एकट्याने पूजा केली. मग मोदी राम मंदिरातील अपहाराबद्दल का बोलत नाहीत ? का अयोध्येत खासदार निवडून नाही आला म्हणून यांचा संबंध संपला ?
१२) या देशातील तरुण-तरुणी श्रद्धाळू आहेत जे योग्य आहे पण त्यांना धर्मांध बनवू नका. त्यांना शिक्षणाच्या वाटेवर न्या. त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नका. फक्त जय श्रीराम म्हणून काय होणार ? देशात गोरक्षक गाड्या पकडतात आणि नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात अभिमानाने सांगतात की जगात बीफ एक्स्पोर्टमध्ये भारताचा नंबर पहिला आहे. गायी मारल्याशिवाय बीफ एक्स्पोर्ट होईल का ? मग गोरकाक्षांनी काय करायचं ?
१३) देशातील एक लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत... १५,००० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही... १० लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत.२००४ मध्ये शिक्षणावर ३.२% खर्च होत होता, आज २०२६ मध्ये २.८%. खर्च होत आहे.
१४) सिद्धिविनायक मंदिरात अपहार झाल्याचं या मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कळवलं आहे. दानपेटीतुन १८ कोटी रुपये लुटले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना सरकारवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणून ते देवळात जाणार तर त्या देवळातच चोरी सुरु आहे, या मुलांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर ?
१५) माझ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना सांगणं आहे की सदस्य नोंदणी कराच पण या विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय सुरु आहे हे पण समजून घ्या.
राज ठाकरे
सस्नेह जय महाराष्ट्र!
आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा २० वा वर्धापन दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा!
महाराष्ट्रातल्या शेवटच्या विद्यार्थ्याला न्याय मिळवून देणे... याच एका उद्देशाने २० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही संघटना, आज तुमच्या मेहनतीमुळे आणि निष्ठेमुळे अधिक मजबूत बनली आहे. ही फक्त एक विद्यार्थी संघटना नाही; तर विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी चालू असणारा संघर्ष आहे.
गेल्या २० वर्षांत आपण प्रत्येकाच्या अडचणीत खंबीरपणे उभे राहिलो. अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. पण आज आपल्यासमोर पेपरफुटी आणि भरतीप्रक्रियेतील घोटाळ्यांचे एक नवीन, भयानक संकट उभे आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या आपल्या तरुण मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. या भ्रष्ट सिस्टीमविरोधात आपल्याला पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने आणि आक्रमकपणे लढावे लागणार आहे.
लक्षात ठेवा, या चळवळीत प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. संकट कितीही मोठे असले तरी तुम्ही ज्या हिमतीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहता, हेच आपले खरे यश आहे.
त्यामुळे या भ्रष्ट सिस्टीमविरोधातील लढा अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजपासून आपण मनविसेची 'सदस्य नोंदणी' सुरू करत आहोत.
सर्व सहकाऱ्यांना हेच सांगतो की, आता प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये जा, घरोघरी पोहोचा आणि महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मनविसेचं ध्येय पोहोचवा.
आजपासूनच पूर्ण ताकदीने कामाला लागू या... खूप काम बाकी आहे!
माझ्या सर्व सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!
आपला सहकारी,
अमित राजसाहेब ठाकरे
Heartiest congratulations to all the young guys and girls. It is because of your determination that this high-handed government finally backed down.
What you and your parents have endured for the last 36 days is difficult to even imagine. The Maharashtra Navnirman Sena stood firmly by your side throughout this struggle and will continue to do so.
To celebrate this hard-earned victory, let us gather tomorrow, as planned, at 10:00 a.m. at Veer Savarkar Marg, Shivaji Park. Bring your families along and join us in celebrating this historic achievement.
This victory belongs to you.
Raj Thackeray |
जंतर मंतर वर ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे..पण राजीनामा काय आला नाही…
मग ठाकरेंनी पुकारलेल्या मुंबईतल्या मोर्च्याच्या नेमका एक दिवस आधी का राजीनामा आला असेल….
बघा…नीट विचार करा…
आणि ठाकरेंची राजकीय पॉवर का कमी करायच्या मागे असते याचं उत्तर सापडेल.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना
सस्नेह जय महाराष्ट्र,
येत्या २६ जुलैला NEET परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरु असलेला प्रयत्न याविरोधात आपण 'तिरंगा मार्च' काढत आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, मध्यवर्ती कार्यालयांकडून सूचित करण्यात आलं असेलच.
हा 'तिरंगा मार्च' हा दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवत आहेत याचा निषेध करण्यासाठी आहे. तसंच हा मोर्चा जे विद्यार्थी सरकारला अजिबात न जुमानता ठामपणे उभे आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईला येऊन निषेध व्यक्त करू शकत नाहीत त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी आहे.
हा 'तिरंगा मार्च' आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्च्याचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावाने कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचं आहे आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही.
बाकी मोर्च्याला गालबोट लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, कारण आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. पण तरीही काही उत्साही असतात. ते आले आणि काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला, काही चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला किंवा तिथे आलेल्या पालकांना
( खासकरून महिलांना आणि मुलींना ) जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना, जवळ जे कोण पोलीस असतील त्यांच्या ताब्यात ‘समारंभपूर्वक’ द्या. ते कसं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण पोलीस जिथे नसतील, तिथे अशांचा 'पाहुणचार' कसा करायचा याचा अनुभव आणि मनगटातील शक्ती दोन्ही आपल्याकडे आहेच.
बाकी महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या हे सांगायची गरजच नाही. ते तुम्ही येणारच. पण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पण घेऊन या, त्यांची मोर्च्यात काळजी घ्या आणि ते पुन्हा सुखरूप घरी जातील हे पहा. बाकी सरकारचं माहित नाही पण महाराष्ट्रातील पोलीस हे आपल्यासोबत आहेत कारण त्यांच्यासमोर पण मुलाबाळांच्या आयुष्याचा पण प्रश्न आ वासून उभा आहे.
बाकी कुठे भेटायचं किती वाजता भेटायचं याचा तपशील तुमच्याकडे आहेच. तेंव्हा २६ जुलैला 'तिरंगा मार्च' ला भेटूया. सर्वांनी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्या जवळ जमायचं आहे ! आम्ही आपली , विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची वाट बघतोय ! जनतेच्या मनातील संताप काय आहे हे या शांततापूर्ण मोर्चाने दिल्लीश्वरांना दाखवून देऊया !
आपला नम्र
राज ठाकरे ।
केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे .
मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं.
काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला !
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती 'परीक्षा पे चर्चा' इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे.
आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा.
लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे !
या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !