सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा कमी वेळात आपल्या कर्तृत्वावर प्रवास करणारे माझे मित्र श्री.सुनिल गव्हाणे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐
@sunil_gavhane
निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार @_prashantkadam यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉💐
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎊
सुसंस्कृत राजकारणाची ओळख, अभ्यासपूर्ण मांडणी आणि लोकाभिमुख कार्यशैली यामुळे जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे तासगाव–कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित (आर. आर.) पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपणास निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्य लाभो आणि भविष्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वातही आपल्या कार्याचा ठसा अधिकाधिक उमटत राहो, हीच सदिच्छा! 🎉
@rohitrrpatilncp
पाऊस सुरू आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी करू नका! 💧
सध्या पाऊस चांगला पडत असला तरी धरणे १००% भरण्यासाठी अजून किमान दोन ते अडीच महिने सातत्याने पाऊस पडणे आवश्यक आहे.
आज पाऊस आहे म्हणून पाण्याचा वापर वाढवू नका. प्रत्येक थेंब जपून वापरणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
पाणी वाचवा... कारण पाण्याला पर्याय नाही! 💙
#SaveWater #WaterConservation #पाणी_वाचवा
पुणे शहरातील सामाजिक प्रश्न आणि चुकीच्या धोरणांवर पुणेकरांची भूमिका ठामपणे मांडणारे श्री. विजयराव कुंभार साहेब यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले सातत्यपूर्ण कार्य आम्हाला प्रेरणा देत आहे. दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो! 💐🎂🎊 @VijayKumbhar62
औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, अभ्यासू आमदार मा.श्री.अभिमन्यू पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा !
#HappyBirthday#abhimanyupawar
संघर्ष करणारे नेतृत्वच इतिहास घडवते…
सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेची समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक नेते सत्तेसाठी पक्षांतर करत आहेत, तर काही नेते प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या विचारांशी आणि पक्षाशी निष्ठावान राहून संघर्षाचा मार्ग स्वीकारत आहेत.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण विचारांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे.
अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सतेज (बंटी) पाटील यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसह विविध राजकीय प्रश्नांवर त्यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका आणि प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष सुरू ठेवण्याची त्यांची तयारी अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या भूमीतून शाहू–फुले–आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत संघर्ष करणारे नेतृत्व आजही महाराष्ट्राच्या राजकारणात उभे आहे, ही लोकशाहीसाठी सकारात्मक बाब आहे. विरोधी पक्ष मजबूत असणे हे लोकशाहीच्या सुदृढतेचे लक्षण असते.
आज विचार, निष्ठा आणि संघर्ष यांची किंमत कमी झाल्याची चर्चा होत असताना, अशा नेतृत्वाकडे केवळ पक्षीय राजकारणाच्या चौकटीत न पाहता लोकशाहीतील संघर्षाचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाऊ शकते.
"सत्ता येते-जाते, पण विचारांसाठी लढणारे नेतेच काळाच्या कसोटीवर टिकतात. संघर्षाची वाट कठीण असली तरी इतिहासाची पाने त्यांच्याच नावाने लिहिली जातात."
#संघर्ष #लोकशाही #सतेजपाटील #बंटीपाटील #महाराष्ट्रराजकारण #ShahuPhuleAmbedkar #Leadership #MaharashtraPolitics
🎉 Happy Birthday, IAS Pavneet Kaur Ma’am! 🎂💐
Wishing you good health, happiness, and continued success. Have a wonderful year ahead!
#HappyBirthday#PavneetKaur#IAS@PMCPune
आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे.
त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजही कोल्हापूर हिरवंगार आहे.
राधानगरी धरण हे राजर्षी शाहूंची मोठी देण आहे. २०१९ ला पावसाने ओढ दिली होती, तेव्हा राधानगरी धरणाचा इतिहास टिपून ठेवला होता. थोडा वेळ असेल तर नक्की पाहा..
राजा लक्षात राहतो तो शाळा, कॉलेज, रुग्णालय, उद्योग, शेती आणि समाजाला दिशा देणाऱ्या दूरदर्शी निर्माणामधून…!
राजर्षी शाहूंना विनम्र अभिवादन 🙏
#RajarshiShahuMaharaj #Maharashtra
ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीत दुर्दैवाने पराभव झाला असता तर आज त्यांच्यासाठी अशा पायघड्या अंथरल्या असत्या काय?हातकणंगलेमधून शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर पराभूत झाले त्यांना एवढं महत्व देतात काय?कीर्ती मिळवणे सोपे पण टिकवणे अवघड. @OmRajenimbalkr