टंचाई निवारण उपाययोजना...
आगामी काळात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदारसंघात टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जतीन रहेमान, उपविभागीय अधिकारी श्री. शुभम पवार, तहसीलदार श्रीमती गितांजली गरड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विक्रम मांडुरके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. मधुकर बिलगे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ओमकार बीडकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🔸 मंजूर टँकरच्या खेपांची संख्या वाढविण्यासाठी नगर परिषदेच्या उद्भवावर आवश्यक यंत्रणा वाढविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसाठी २३ लक्ष रुपये खर्चास मंजुरी.
🔸 चकलांबा, बंगालीपिंपळा, मादळमोही, सैदापूर, तांदळा, खळेगाव, महारटाकळी व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून नवीन पाणीपुरवठा योजना करण्यासंदर्भात चर्चा केली.
🔸 आम्ला, सिरसदेवी, भेंडटाकळी, उमापूर, मालेगाव आदी योजनेसाठी एक्सप्रेस फीडरद्वारे अविरत व योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासंदर्भात चर्चा करून यासाठी लागणाऱ्या निधीच्या तरतुदीबाबत निर्णय झाला.
🔸 राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या गढी, पाडळसिंगी, खांडवी आदी पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या दुरुस्तीच्या संदर्भात चर्चा करून लागणाऱ्या निधीच्या तरतुदीबाबत निर्णय झाला.
🔸 मौजे तलवाडा नळ पाणीपुरवठा योजनेचा जलस्रोत कोरडा पडला आहे. त्यामुळे तलवाडा तलावात दोन सार्वजनिक विहिरींच्या कामांना मंजुरी देऊन त्यांची जोडणी नळ पाणीपुरवठा योजनेला करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा झाली.
🔸 मौजे मादळमोही नळ पाणीपुरवठा योजनेला शाश्वत जलस्रोत उपलब्ध करण्यासाठी जवाहरवाडी तलावात नवीन सार्वजनिक विहिरीच्या कामासह जुन्या विहिरीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याच्या कामाबाबत चर्चा झाली.
🔸 गोदावरी नदीपात्रातील खामगाव येथील जुन्या पाईपलाईनचे पुनर्जीवन करून बागपिंपळगाव परिसरात सर्व पाईपलाईनचे पाणी एकत्रित करणे, तेथे फिल्टर प्लांट उभारणे आणि त्या ठिकाणाहून दररोज १०० ते १५० टँकर्सद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था उभारण्यासंदर्भात चर्चा झाली.
🔸 मौजे बंगालीपिंपळा नळ योजनेचे काम शीघ्र गतीने पूर्ण करून गुळज बॅरेजमधील पाणी बंगालीपिंपळासह परिसरातील गावांना उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
🔸 बीड जिल्ह्यातील चारा आता संपत आला असून आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी चारा डेपो, छावणी सुरू करण्यासह इतर उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व तलावांच्या कार्यक्षेत्रात गाळपेरा करून चाऱ्यासाठी लागणाऱ्या गवताची पेरणी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना प्रशासकीय पातळीवर करण्यात येत आहेत.
दुष्काळ आणि टंचाई निवारणार्थ विविध विषयांवर यावेळी तपशीलवार चर्चा झाली. आज शासकीय सुट्टी असतानाही जिल्हाधिकारी महोदय व प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयांवर वेळ देऊन सकारात्मक चर्चा केली. या माध्यमातून अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लागले आहेत.
#भावपूर्ण_श्रद्धांजली
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व तथा संदीप उद्योग समूहाचे संस्थापक कै. भानुदास कोतकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
कोतकर आणि पंडित कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध राहिले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांसह विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी सामाजिक व सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पंडित परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कोतकर परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, ही प्रार्थना.
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्रावहिनी अजित पवार यांनी आज शपथ घेतली.
अजित दादांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष संघटित व मजबूत राहावा, यासाठी ही निवड भविष्यात पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरेल. सुनेत्रा वहिनींच्या रूपाने आम्हाला अजित दादांचेच नेतृत्व पाहायला मिळेल. आदरणीय सुनेत्रा ताईंच्या माध्यमातून स्व. अजित दादांचे विचार, मार्गदर्शन आणि कामांचा धडाका अखंडितपणे सुरू राहील, असा विश्वास आहे.
@SunetraA_Pawar@mahancpspeaks
ह.भ.प. १००८ गुरुवर्य गंगाभारतीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र मोरेश्वर संस्थान, कोळवाडी (ता. जि. बीड) येथे आयोजित 'काल्याच्या कीर्तनाला' भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोरेश्वर संस्थानच्या सर्वंकष विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले.
याप्रसंगी मोरेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. हरिहर भारती महाराज, श्री. क्षेत्र बंकटस्वामी संस्थान नेकनूरचे मठाधिपती ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. स्वप्निल गलधर, बीड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. विनोद मुळूक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष श्री. बळीराम गवते, श्री. रमेश पोकळे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष श्री. हनुमान मुळीक, आनंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
गेवराई मध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संघर्ष योद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांना ऊर्जा व प्रेरणा मिळते. आज तालुक्यातील ११ प्रगतशील शेतकऱ्यांना किसान कृषीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या निमित्ताने कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी देऊन माहिती घेतली. श्री. महेश बेदरे यांच्या पुढाकारातून मागील अनेक वर्षापासून या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जाते.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून त्यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या...!
बीड नगर परिषद निवडणुकीत शहरातील मतदार बंधु - भगिनींनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेऊन शहरात काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राजकीय टिका - टिप्पणी टाळून आजवर काय झाले ? यावर चर्चा करण्यापेक्षा शहरातील नागरीकांना शाश्वत विकासाची हमी देऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करूयात, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला. शहरातील नागरीकांना रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, विज या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याच्या सूचना यानिमित्ताने दिल्या.
शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम यांसह मित्रपक्षाच्या निवडणुकपूर्व युतीला आता एमआयएम व काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पाठिंबा देऊन शिव, शाहु, फुले, आंबेडकर व मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीमध्ये सहभाग नोंदविला आहे, त्यांचे याप्रसंगी स्वागत करून आभार व्यक्त केले.
याप्रसंगी महायुतीचे शहरातील सर्व पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक, मुख्याधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे कार्यकर्ते आणि शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks@mahancpspeaks
बीड जिल्ह्याचे विकासभिमुख पालकमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांनी नुतन वर्षाच्या प्रथमदिनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ८.१९७० कोटी रुपये निधी मंजुर करून बीडकरांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. कलाकारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह भविष्यात नाट्य चळवळीचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
आज नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी, पत्रकार व इतरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला भेट दिली इमारतीची अतिशय दुरावस्था झालेली आहे. मोडलेल्या खुर्च्या, तुटलेल्या काचा, मेकअप रुमची दुरावस्था, अपुरी विद्युत व्यवस्था, स्वच्छता गृहाची दुरावस्था यांसह अनेक बाबी निदर्शनास आल्या.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्री. शैलेश फडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. बोराडे यांच्यासह प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांनी नुतणीकरणाच्या कामासाठी मंजुर केलेल्या ८.१९ कोटी रुपयांच्या निधीमधून करावयाच्या कामाचे सादरीकरण यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. बीड शहराचा सांस्कृतिक वारसा सक्षमपणे जोपासण्यासाठी नव्याने ही वास्तु दिमाखात उभारण्याची जबाबदारी आदरणीय दादांच्या नेतृत्वात आम्ही घेतली आहे. त्यामुळे भविष्यात पुर्ननिर्माणाचे काम अतिशय दर्जेदार होईल, या कामी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची लवकरच समिती तयार करून त्यांच्या सूचनांचा स्विकार करून त्याप्रमाणे नाट्यगृहाच्या पुर्ननिर्मितीचे काम होईल असा विश्वास बीडकरांना देतो.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. अनिलदादा जगताप, स्वप्निल गलधर, सायं.दै. सिटीजनचे संपादक श्री. शेख मुजीबभाई, नगरसेवक श्री. शेख निजाम, नगरसेवक श्री. विनोदभैय्या मुळूक, नगरसेवक ॲड.महेश धांडे, माजी नगराध्यक्ष श्री. दिलीप गोरे, प्रभाग क्र.१५ चे डॉ.अजिंक्य पांडव, श्री. प्रकाश काळे, श्री. भिमराव वाघचौरे, शिवसंग्रामचे मनोज जाधव, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, शिवसंग्रामचे अनिल घुमरे, शिवसेनेचे सुनिल सुरवसे यांच्यासह आजी - माजी नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, नाट्यप्रेमी, पत्रकार व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks@mahancpspeaks
फारुखभाईंची गटनेते पदी निवड..!
आज पक्षप्रमूख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा )पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाची " शिव शाहू फुले आंबेडकर आघाडी " स्थापन केली व गटनेते म्हणून ज्येष्ठ नगरसेवक फारूकभाई पटेल यांची निवड सर्वांनूमते करण्यात आली. बीड मधील ऐतिहासिक विजयानंतर शहरातील नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास हा आपला मानक असून यासाठी जबाबदारी देताना सामाजिक अभिसरण व ज्येष्ठ व नव्या प्रतिनिधीची सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याच अभिसरण व समीकरणात माझे मित्र व पक्ष सहकारी फारूकभाई पटेल यांची निवड गटनेता म्हणून करण्यात आली. यावेळी सर्व विजयी नगरसेवक, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वरआबा चव्हाण, निरीक्षक माजी आमदार संजयभाऊ दौंड यांच्यासह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks@mahancpspeaks
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना शिंदे गट व शिवसंग्राम मित्रपक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता दादासाहेब पारवे यांच्यासह प्रभागातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी ,
🔶 सायं ०५::३० वा. - जाहीर सभा
स्थळ - बशीरगंज, बीड
याप्रसंगी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.!
@AjitPawarSpeaks@mahancpspeaks
गेवराई नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे यांच्यासह प्रभागातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक आ. सना मलिक शेख यांच्या प्रमुखउपस्थितीत गेवराई येथे संपन्न झालेल्या अल्पसंख्यांक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांनी फुले - शाहु - अंबेडकरांची विचारधारा सोडली नाही म्हणुन आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. अल्पसंख्यांक समाजाच्या संकट काळात दादा भक्कमपणे समाजाच्या पाठिशी उभे राहतात, त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना निवडुण देण्याचे आवाहन त्यांनी केले. ना. श्री. अजितदादा पवार साहेब बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, दादांच्या व्हिजन मधुन गेवराई शहराचा विकास साधायचा असेल तर घड्याळा समोरील बटन दाबुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विधानसभा निवडणुतील यशानंतर अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत गेवराई शहरात सुमारे पस्तीस कोटी रुपयांची विकास कामे सुरु झाली आहेत. मुस्लीम समाजासाठी दोन कोटी रुपये किंमतीच्या भव्य शादीखाना इमारतीचे काम सुरु झाले आहे. अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला पीटीआर चा प्रश्न मार्गी लागला आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी शहरात उर्दु माध्यमाचे ज्युनिअर कॉलेज सुरु करण्याचा मुद्दा जाहिरनाम्यात घेवुन समाजाचे विविध प्रश्न समजावुन सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या निमित्ताने आश्वासित केले. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.
यावेळी व्यासपीठावर नविद उज्जमा, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी सभापती मुजीब पठाण, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई दाभाडे, भाऊसाहेब नाटकर, भवानी बँकेचे उपाध्यक्ष अब्दुल हन्नान, खालेद कुरेशी, मुक्ताताई आर्दड, उमेदवार सौ. गंगासागर पवार, भास्कर काकडे, विश्वजित शिंदे, संध्याताई येवले, विलास गुंजाळ, नजमा बेगम निजाम शेख, संगिताताई घोडके, शहारुखपठाण, अशोक गायकवाड, अंजश्रीताई मोटे, वैशालीताई कांडेकर, जाकेरा बेगम इस्माईल शरीफ, पुजाताई सुतार, मनोज धापसे, अंजुताई सुतार, विनोद उर्फ किरण निकम, मंगलताई हजारे, श्रीकृष्ण मुळे, डॉ. रेणुकाताई संभाहरे, शेख खाजा कटुमियॉ, दुरदाना बेगम सलिमोद्दीन फारोकी आणि माधव बेदरे सह मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित हाते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.
@sanamalikshaikh@mahancpspeaks
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. विजयसिंह पंडित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@VijaysinhPandit
बीड नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम व स.पा. युतीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलता दादासाहेब पारवे व प्रभाग क्रमांक १ (अ) नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री.धनंजय बाळासाहेब काळे व १ (ब) नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सविता भास्कर जाधव, प्रभाग क्रमांक १२ (अ) नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सीता भैय्यासाहेब मोरे व १२(ब) नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार रसिका सचिन जवकर आणि प्रभाग क्रमांक १३ (अ) नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती मीना भिमराव वाघमारे व १३ (ब) नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती जयश्री विलास विधाते यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधला व येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी घड्याळ ⏰👈या चिन्हा समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवहान केले.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी बीड शहरात आज समाज बांधवांनी विराट मोर्चा काढला. बंजारा समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होऊन त्यांच्या मागणीला जाहिर पाठिंबा दिला.
बंजारा समाजाच्या भावना लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने हैद्राबाद गॅझेटियरमधील नोंदींच्या आधारे बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा अशी विनंती या माध्यमातून करत आहे.
#बंजारा_आरक्षण
बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी बीड शहरात आज समाज बांधवांनी विराट मोर्चा काढला. बंजारा समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होऊन त्यांच्या मागणीला जाहिर पाठिंबा दिला.
बंजारा समाजाच्या मागणीसाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले. व्यासपीठावर माजी मंत्री आ. श्री. धनंजय मुंडे ( @dhananjay_munde ) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
#बंजारा_आरक्षण
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मोठ्या प्रमाणावर राज्यभर अंदोलने झालेली आहेत, संघर्षयोद्धा श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाला सामारे जातांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरे व हैद्राबाद गॅझेट लागु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची अद्याप पुर्तता झालेली नाही.
राज्यातील कोट्यावधी मराठा समाज बांधवांच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा श्री. मनोजदादा जरांगे पाटील दि. २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे अंदोलन करणार आहेत. या अंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मागण्यांपैकी न्यायमुर्ती संदिप शिंदे समितीला शासनाने मुदतवाढ दिली आहे, त्याबद्दल शासनाचे अभिनंदन.
मराठा समाजाच्या इतर मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करुन मराठा आरक्षण लढ्यात बलीदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांना शासन नोकरीसह आर्थिक मदत करावी, मराठा अंदोलकांवरील गुन्हे मागे घेवुन कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुलभ प्रणाली उपलब्ध करण्याची मागणी आज विधानसभेत केली.