धूळ पेरा करण्यासाठी बैल तिफण ओढतो
शेतकऱ्याच्या मनात, मेघ आकाशी दिसतो
भर तापल्या उन्हात, धूळ पेरणी करतो
येईल पाऊस म्हणून, बीज शेतात गाडतो...
फोटो : अशोक जाधव, चिंचोली.
‼️बळीराजा‼️
नांगरणी करताना
नाम देवाचेच ओठी
कष्ट भारी उपसतो
अवघ्या या जगासाठी...
सध्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात भातपेरणीसाठी रानं तयार करण्याची लगबग सुरू आहे.
फोटो : अशोक जाधव, चिंचोली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धांविषयी म्हणतात,जगाच्या इतिहासामध्ये समता,स्वतंत्रता बंधुता व न्याय तत्त्वांचा प्रचार,प्रसार करणारे तथागत बुद्ध हे पहिले व्यक्ती होते.त्याच विचारांना संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज,महात्मा फुले,शाहू महाराज यांनी पुढं नेले.
अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनाच माणसाला अनेकदा हरवतात, हे ज्यांना समजत नसते, त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर समजत नसते..
आमचे जिवलग मित्र राजर्षी शाहू प्राथमिक शिक्षक पतसंस्था व वरदायिनी गृहतारण संस्थेचे चेअरमन बबन केकरे सर यांच्या मातोश्री बाळाबाई बापू केकरे यांचे आकस्मिक दु:खद निधन झाले.ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना🙏
'चांगली माणसं मोजायला हजार बोटं असोत'असं म्हणून जीवनाचं एक वेगळं तत्वज्ञान जगासमोर मांडणारे,कोसला सारखं दर्जेदार साहित्य निर्माण करून मराठी साहित्यात एक नवा मापदंड उभा करणारे,ज्ञानपीठ विजेते साहित्यिक श्री. भालचंद्र नेमाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂📖✍🏻
तथागत-
ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले आहे,तो तथागत. यथा-तथा 'जसे आहे तसे'. तथा हा शब्द तथ्य सत्य व वस्तुनिष्ठता दर्शविणारा आहे.तथागत ची फोड
तथा- सत्या, तथ्यापर्यंत - गत - गेलेला. ज्याने तथ्य जसेच्या तसे जाणले आहे,तो तथागत होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पुन्हा ख-याखु-या बुद्धाची वाट दाखवली. प्रज्ञा,शील,करूणा आणि स्वातंत्र्य,समता,बंधुता सांगणारा- ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय‘ सांगणारा बुद्ध बाबासाहेबांना प्रकाशमान करणे अगदीच स्वाभाविक होते.बुद्ध म्हणजे असा प्रकाश आहे, जो अनुभवता येतो,भरून घेता येतो.
जगात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना(१.८ अब्ज)लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचेअनुयायित्व पत्करले आहे.या सर्व बुद्धअनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही२.३अब्जांवरआहे
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा💐🙏
संत तुकाराम महाराज, प्रबोधनकार ठाकरे, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे.. अनिष्ठ रुढी परंपरा यावर वायफळ खर्च करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण यावर खर्च करा. कोरोना मुळे हीच शिकवण ध्यानात घ्या आणि दक्षिणाबहाद्दरांना लोकांच्या नादाला न लागता वायफळ खर्च टाळा...
कोरोनामुळे आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत,त्यांचे ना पिंडदान होत आहे,ना तेरावे, ना गरूड पारायण,ना दान दक्षिणा, अस्थी विसर्जनालाआळंदी,गंगा, काशी,ओंकारेश्वर,पैठणला कुणीही जात नाहीत,तेथे कुणाला दान देत नाहीत,पणआत्मेबरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत
👇👇👇👇