🥈 गुलवीर सिंगची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी! 🇮🇳🏃♂️
पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकत गुलवीर सिंगने नवा इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत लांब अंतराच्या ट्रॅक प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय पुरुष ॲथलीट ठरला आहे! 🔥
🏃 वेळ: २७:४९.७८
🥈 भारतासाठी रौप्य पदक! 🇮🇳
सर्वेश अनिल कुशारेची राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी! 🔥
२.२५ मीटरच्या उंच उडीत दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर, शेवटच्या आणि अंतिम प्रयत्नात अप्रतिम उडी मारत त्याने रौप्य पदक आपल्या नावे केले.
'ग्लासगो २०२६' मधील भारताचे ॲथलेटिक्समधील हे पहिलेच पदक!
साजन प्रकाशचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात फायनलमध्ये प्रवेश! 🏊♂️🇮🇳
⏱️ वेळ: १:५८.५९ (१९ पोहणाऱ्यांपैकी एकंदरीत ६ वा क्रमांक)
🏆 राष्ट्रीय विक्रम: १:५६.३८
🏁 अंतिम सामना: आज मध्यरात्री १:४४ वाजता (IST)
ईशा सिंगने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ईशाने ५० पैकी ४० गुण मिळवले.🥇🇮🇳
🥉 याच स्पर्धेत मनू भाकरने एका थरारक 'डबल शूट-ऑफ'मध्ये उत्तर कोरियाच्या ह्यॉन ग्योंग पाकचा पराभव करत कांस्यपदक जिंकले. 🇮🇳🥉
मीराबाई चानूने भारतासाठी सुवर्ण उचलले.🥇 🇮🇳
🏋️ स्नॅच: ८५ किग्रॅ
🏋️ क्लीन अँड जर्क: १०५ किग्रॅ
💪 एकूण: १९० किग्रॅ
आणखी एक सुवर्ण. आणखी एक विक्रम. भारताच्या एका महान वेटलिफ्टरची आणखी एक अविस्मरणीय कामगिरी!
राष्ट्रगान सुरू असताना भावनांना आवर घालणं अवघड झालं होतं.
#Mirabaichanu
यास्तिका भाटिया ऐतिहासिक शतक झळकावून (११३) बाद. 👏
लॉर्ड्स मैदानावर शतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू. 🇮🇳
काल क्रांती गौडने honours board वर नाव कोरले तर आज यास्तिका भाटियाने. यास्तिका ची ही खेळी भारतीय संघाला सामना जिंकून देणारी ठरावी ही सदिच्छा.
#YastikaBhatia#EngvInd
क्रांती गौडने घेतलेल्या ऐतिहासिक पाच बळींमुळे भारताने इंग्लंडला १७० धावात गुंडाळले. आणि पहिल्या डावात ११५ धावांची मोठी आघाडी घेतली.
३७ धावात ५ बळी घेत क्रांतीने लॉर्ड्स मैदानावरील मानाच्या honours board वर आपले नाव कोरले. ही कामगिरी करणारी क्रांती पहिलीच महिला खेळाडू बनली.
आळंदीचा प्रीतम केंद्रे ठरला ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन! 🏆
नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये १६ वर्षीय प्रीतमने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे! 🥇🇮🇳
अभिमानास्पद कामगिरी! खूप खूप अभिनंदन चॅम्प! 👏✨
योगभूमी भारताकडून संपूर्ण जगाला नवा संदेश! 🧘♂️✨
अहमदाबाद मध्ये पार पडलेल्या पहिल्या-वहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे! 🏆🇮🇳
भारताने एकूण ११४ पदकांची लयलूट केली:
🥇 १०२ सुवर्ण
🥈 ९ रौप्य
🥉 ३ कांस्य
अभिमान! 🇮🇳❤️
अहमदाबाद येथे चालू असलेल्या पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत मिरजेच्या शैलेश कदम यांनी सुवर्णपदक पटकावले.🥇🇮🇳
अंबाबाई तालीम संस्थेच्या या खेळाडूने पुरुषांच्या बॅकबेंड प्रकारात अव्वल स्थान मिळवले.
पहिल्या दिवशी भारताने पाच सुवर्णपदके मिळविली आहेत.
#worldyogasanChampionship
शांघाय तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिला संघाचा सुवर्णवेध! 🏹🇮🇳
अंकिता भकत, दीपिका कुमारी आणि कुमकुम मोहोद या त्रिकुटाने अंतिम फेरीत यजमान चीनचा शूटआऊटमध्ये पराभव करून सुवर्ण जिंकले.🥇
ऑलिम्पिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणे ही एक मोठी कामगिरी आहे! 🇮🇳
#Archery#TeamIndia
Fed up of pathetic service given by internet service provider #SupersonicBroadband#1and1Broadband Thane, Mh. Frequent service breakdowns. Dont allow customers to talk to sr managers. Dont listen to customer problems. Follow their own timings to resolve issues. @TRAI@GoI_MeitY
बॅडमिंटन विश्वातून एक मोठी बातमी! 🤯
BWF कडून सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी २१x३ ऐवजी १५x३ फॉरमॅटला मंजुरी!
आधीचे २१ गुणांचे ३ गेम बदलून आता १५ गुणांचे बेस्ट ऑफ थ्री गेम्स होणार.
हा नवीन नियम २०२७ पासून लागू होणार आहे! 🏸
#Badminton#BWF#BadmintonNews#Marathi#SportsNews
♟️इतिहास घडला! 🇮🇳
वैशाली रमेशबाबू बनली #FIDE महिला कॅन्डिडेट्स चॅम्पियन २०२६ 🏆
तिने एकूण ८.५/१४ गुण मिळवले.
➡️ ५ विजय | ७ ड्रॉ | केवळ २ पराभव
अंतिम फेरीत प्रचंड दडपणाखाली वैशालीने 'कॅटरिना लॅग्नो'चा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली.
आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी वैशाली विरुद्ध जू वेनजुन असा महामुकाबला रंगणार.
कोनेरू हम्पी (२०११) नंतर या टप्प्यापर्यंत पोहोचणारी वैशाली दुसरी भारतीय महिला ठरली आहे.
अभिनंदन वैशाली! 🇮🇳👏
@chessvaishali
#Vaishali #IndianChess #FIDE #Candidates2026 #Chess #IndiaSport #Marathi #ChessIndia
२१ वर्षीय वैष्णवी आडकर हिने ITF W35 कलबुर्गी स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी केली. अनुभवी अंकिता रैना हिच्यासोबत खेळताना वैष्णवीने प्रथम दुहेरीचे विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर एकेरीच्या अंतिम फेरीत अंकिताचाच पराभव करून दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले. 🎾🔥
या विजयामुळे वैष्णवीने आता WTA एकेरी क्रमवारीत टॉप ४०० मध्ये झेप घेतली आहे. आणि भारतीय महिला एकेरी मधील अव्वल क्रमांकाची खेळाडू बनली आहे. 🇮🇳✨
#Tennis #IndianTennis #VaishnaviAdkar #WTA #Kalaburagi #PrideOfIndia