"निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं शहाणपण ठेवा."
हे वाक्य दिसायला तसं खूप छोटं आहे, पण त्यात संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे.
भगवान श्रीकृष्णाकडे अपार शक्ती होती. त्यांना हवं असतं, तर ते प्रत्येक अपमानाला उत्तर देऊ शकले असते.
पण त्यांनी प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिली नाही.
कारण त्यांना माहीत होतं की काही लोकांना उत्तर दिलं, तर त्यांची किंमत वाढते. काही लोकं तुमच्या वेळेसाठी पात्र नसतात.
पूर्वी गावात एखादा मूर्ख माणूस असेल, तर त्याला फक्त ते गावच ओळखायचं.
आज सोशल मीडियामुळे संपूर्ण जग त्याला ओळखतं.
कुणी काही���ी लिहितो. कुणी काहीही बोलतो. कुणी अफवा पसरवतो आणि अनेक सुशिक्षित लोकं त्याला उत्तर देण्यात आपला अमूल्य वेळ घालवतात.
आज सोशल मीडियावर अनेक ट्रोल गँग्स दिसतात. त्यांचं उद्दिष्ट सत्य शोधणं नसतं.
त्यांचं उद्दिष्ट असतं:
तुम्हाला चिडवणं
तुमचं लक्ष विचलित करणं
तुमचा वेळ वाया घालवणं
तुम्हाला भाव��िक बनवणं.
ते इतरांच्या यशामुळे अस्वस्थ असतात.
तुम्ही शांत असाल, तर त्यांना त्रास होतो.
तुम्ही प्रगती करत असाल, तर त्यांना जास्त त्रास होतो.
म्हणून ते प्रतिक्रिया मिळवण्यासाठी काहीही बोलतात.
एका उद्योगपतीने मोठा व्यवसाय उभा केला.
त्याच्यावर सतत टीका होत होती.
एका पत्रकाराने विचारलं,
"तुम्ही प्रत्येक टीकेला उत्तर का देत नाही?"
त्याने उत्तर दिले,
"जर मी प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यामा���े धावू लागलो तर माझ्या गंतव्यस्थानी कधीच पोहोचणार नाही."
गरुड जेव्हा उंच उडतो, तेव्हा काही कावळे त्याला त्रास देतात.
ते त्याच्या पाठीवर बसतात. त्याला टोचतात.
पण गरुड त्यांच्याशी भांडत बसत नाही.
तो आणखी उंच उडतो.
ज्या उंचीवर ऑक्सिजन कमी होतो, तिथे कावळे आपोआप खाली पडतात.
जीवनातही असंच असतं.
काही लोकांशी वाद घालण्याऐवजी स्वतःची उंची वाढवा.
प्रत्येक टीका महत्त्वाची नसते.
डॉक्टर ऑपरेशन करत असताना, बाहेर बसलेल्या लोकांच्या मतांवर निर्णय घेत नाही.
कारण त्याला त्या विषयाचे ज्ञान असतं.
तसंच,
तुमच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला नसतो.
ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिलेला नाही, त्यांच्या मतांचं ओझं का वाहायचं?
एकदा भगवान बुद्ध एका गावात गेले.
लोकांनी त्यांचा अपमान केला.
शिवीगाळ केली.
बुद्ध शांत राहिले.
शिष्यांनी विचारले,
"गुर���जी, तुम्ही उत्तर का दिले नाही?"
बुद्ध म्हणाले,
"कोणी भेटवस्तू आणली आणि मी स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाकडे राहते?"
शिष्य म्हणाले, "ज्याने आणली त्याच्याकडे."
बुद्ध म्हणाले,
"तसेच त्यांचा राग-अपमान-शिवीगाळ मी स्वीकारला नाही."
आज अनेक लोकं सकाळी उठल्यावर देवाचे नाव घेण्याऐवजी कमेंट सेक्शन तपासतात.
कोण काय बोललं? कोणी लाईक केलं? कोणी कोणाला ट्रोल केलं?
हळूहळू दुसऱ्यांच्या मतांचे गुलाम बनत���त.
लक्षात ठेवा,
तुमचं मूल्य लाईक्स, फॉ��ोअर्स किंवा कमेंट्स ठरवत नाहीत.
अनेकांना वाटते की शांत राहणे म्हणजे हार मानणं.
चूक.
कधी कधी शांत राहण्यासाठी जास्त ताकद लागते. कारण प्रतिक्रिया देणं सोपे असते.
संयम ठेवणं कठीण असतं.
जंगलाचा राजा सिंह असतो.
तो प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्याला उत्तर देत नाही.
जर तो तसे करू लागला, तर त्याचं राजेपण संपेल.
आपल्या जीवनातही असंच आहे.
प्रत्येक वाद, प्रत्येक आरोप, प्रत्येक अफवा, प्रत्येक ट्रोल यांना उत्तर देणं आवश्यक नसतं.
आपल्याकडे मर्यादित वेळ आहे.
मर्यादित ऊर्जा आहे.
प्रश्न असा आहे की ती ऊर्जा आपण कुठे खर्च करतो?
स्वप्नांवर?
कुटुंबावर?
शिक्षणावर?
समाजकारणावर?
की
ट्रोल्सना उत्तर देण्यात?
निरर्थक वादात?
अफवांमध्ये?
एखादा मुलगा गरीब परिस्थितीतही अभ्यास करतो.
लोकं त्याच्यावर हसतात.
तो वाद घालत नाही.
तो अभ्यास करतो.
काही वर्षांनी अधिकारी बनतो.
तेव्हा त्याला काही बोलण्याची गरज राहत नाही.
त्याचं यशच लोकांना उत्तर देतं.
जीवनात तुम्हाला तीन प्रकारचे लोक भेटतील.
पहिला प���रकार: तुम्हाला खाली खेचणारे.
दुसरा प्रकार: तुमच्यासोबत चालणारे.
तिसरा प्रकार: तुम्हाला वर उचलणारे.
पहिल्या प्रकाराला दुर्लक्ष करा. दुसऱ्यांचा आदर करा. तिसऱ्यांचे ऋण माना.
सर्वात मोठे स्वातंत्र्य म्हणजे
"लोक काय म्हणतील" यापासून मुक्त होणे.
ज्या दिवशी तुम्ही हे साध्य कराल, त्या दिवशी तुमचे आयुष्य बदलून जाईल.
जीवन खूप मौल्यवान आहे.
ते प्रत्येक ट्रोल, प्रत्येक अफवा, प्रत्येक निरर्थक व��द यांच्यावर खर्च करण्यासाठी नाही.
लक्षात ठेवा:
काही लोक तुमचे लक्ष वळवून घेण्यासाठी तुम्हाला चिडवतात.
तुमची प्रतिक्रिया हेच त्यांचं बक्षीस असतं. म्हणून कधी कधी सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे, उत्तरच न देणं.
गरुडासारखं उंच उडा. सिंहासारखा आत्मविश्वास ठेवा. बुद्धांसारखे शांत राहा.
प्रत्येक आवाजाला उत्तर देणं आवश्यक नसतं, पण प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं आवश्यक असतं."
स्वातंत्र्य की स्वैराचार? संस्कार आणि मानसिकतेचा हा आरसा 🧠
आजच्या काळात फॅशन आणि स्वातंत्र्य या नावाखाली समाज कोणत्या दिशेला चालला आहे, हे सांगणारा हा फोटो खूप ��ाही बोलून जातो. ही केवळ कपड्यांची तुलना नाही, तर ती आहे लज्जा आणि जबाबदारी यांतील फरकाची!
सार्वजनिक ठिकाणी वावरताना जर एखाद्या पुरुषाची पॅन्टची चैन चुकून उघडी राहिली, तर त्याला होणारा पश्चाताप आणि दिवसभर वाटणारी लाज हे त्याच्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. ती चैन चुकून उघडी राहिलेली असते, तरीही त्याला स्वतःच्या नजरेत खाली बघितल्यासारखं वाटतं.
दुसरीकडे, आज काही ठिकाणी फॅशनच्या नावाखाली पाठ, मांड्या आणि नाभी सताड उघडी ठेवून वावरलं जातं. हे चुकून घडत नाही, तर ते जाणीवपूर्वक केलं जातं. गंमत म्हणजे, अशा प्रदर्शनानंतर जेव्हा लोकांच्या नजरा वळतात, तेव्हा सर्रास एकच वाक्य ऐकायला मिळतं आजकाल पुरुषांची मानसिकता खराब होत आहे!
मानसिकता शुद्ध असणे ही काळाची गरज आहेच, यात वाद नाही. पण स्वतःच्या मर्यादा सोडून वावरल्यानंतर केवळ दुसऱ्याच्या नजरेला दोष देणे कितपत योग्य आहे? टाळी कधीच ��का हाताने वाजत नाही. संस्कार, मर्यादा आणि शालीनता हीच समाजाची खरी ओळख असते.
कपड्यांचे स्वातंत्र्य जरूर असावे, पण ते इतरांच्या मानसिकतेची परीक्षा पाहणारे नसावे. स्वतःचा आदर करायला शिका, तरच समाज तुमचा आदर करेल!
विचार करायचा, शांत रहायचं, जे होईल ते होऊ द्यायचं, emotions वर control करायच, राग येऊ द्यायचा nahi, आला तरी react व्हायचं nahi.
.
.
.
.
.
.
.
एवढं सगळं करताना एकच गोहत डोक्यात ठेवायची ती म्हणजे जग ------ आहे, आणि आपल्याला इथे टीकायचं आहे, मग खड्यात गेली दुनिया..!!
अति विचारांचा चक्रव्यूह इतका खोल असतो,की माणूस स्वतःच्याच मनात कैद होऊन जातो…
विचारांची गर्दी वाढत जाते,पण उत्तर मात्र कुठेच सापडत नाही, मन प्रत्येक क्षणी काहीतरी शोधत राहतं आणि शांतता मात्र दूर निघून जाते ....
ज्या लेकीला आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिला एका क्षणात परक्याचं धन म्हणून दुसऱ्याच्या स्वाधीन करणं किती कठीण असतं, हे फक्त एका बापालाच माहीत असतं.
ती सासरी जाताना तिला त्रास होऊ नये, तिचं मन डळमळीत होऊ नये, म्हणून तो बाप काळजावर दगड ठेवून असतो. डोळ्यातून ओघळणारं पाणी जगापासून लपवत असतो, कारण त्याला माहीत असतं की जर तो रडला तर त्याच्या काळजाचा हा तुकडा कोसळून पडेल.
बाप असा असतो जो स्वतः तुटतो, पण आपल्या मुलीच्या सुखासाठी शेवटपर्यंत हसत निरोप देतो..❤️
हा फोटो म्हणजे केवळ एका प्रवासाची सुरुवात नाही, तर एका मध्यमवर्गीय स्वप्नाचा आणि संघर्षाचा जिवंत दस्तऐवज आहे. हातातील ती जुनी पेटी केवळ कपड्यां��ी भरलेली नाही, तर त्यात घराच्या हजारो जबाबदाऱ्या, आई-वडिलांच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि स्वतःच्या भविष्याची पुसटशी स्वप्नं ठासून भरलेली आहेत. ज्या मातीच्या भिंतींनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या छताखाली आपलं बालपण गेलं, ते सोडून परक्या शहराच्या झगमगाटात स्वतःला झिजवायला निघताना पाय किती जड होत असतील, हे केवळ तोच जाणू शकतो ज्याने कधीतरी पोटासाठी आपलं गाव सोडलंय.
दारात बसलेल्या त्या माऊलीच्या नजरेत प्रगतीची आशा तर आहेच, पण काळजाचा तुकडा दूर जाणार म्हणून एक अनामिक हुरहूरही दाटून आली आहे. शहरातल्या मोठमोठ्या काचेच्या इमारतींना कदाचित हे दुःख कधीच कळणार नाही, कारण त्या इमारती उभ्य��� राहण्यामागे अशा कितीतरी तरुणांनी आपलं गाव, आपली माणसं आणि आपलं निवांत सुख मागे सोडलेलं असतं. आपण शहरात कमावतो तो पगार हा फक्त आकड्यांमध्ये नसतो, तर ती त्या प्रत्येक सुखाची किंमत असते जे सुख आपण आपल्या लोकांपासून दूर राहून गमावतो.
हा फोटो प्रत्येक त्या तरुणाची गोष्ट सांगतो, जो आपल्या घराची चूल पेटती ठेवण्यासाठी आणि आपल्या माणसांच्या डोळ्यांत समाधानाचं पाणी पाहण्यासाठी स्वतःच्या घरा���ा उंब��ा ओलांडून संघर्षाच्या प्रवासाला निघतो. खरंच, घर सोडणं कधीच सोपं नसतं, पण घराला घरपण देण्यासाठी आणि कुटुंबाचं भविष्य सावरण्यासाठी कधी कधी घराबाहेर पडणंच नशिबी असतं. गाव सुटतं, माणसं मागे राहतात, पण ती जुनी पेटी आणि त्यातली आठवण मात्र शहराच्या गर्दीतही त्या माणसाला आपल्या मुळांशी जोडून ठेवते...
सिनेमाचे २ भाग सलग अनुभवणं हे वेबसिरिज पेक्षा भारी.
रक्तपात हेच ज्या दिग्दर्शकाचं आत्मचरित्र असू शकेल असा दिग्दर्शक एका अशा वळणावर एवढा मोठा सिनेमा अलगद प्रे��्षकांवर सोडून मोकळा होतो.♥️
जे आपण कायमचं जपायचं ठरवलं होतं तेच अचानक भूतकाळात बदललं की मन न बोलताच शांत होतं. आवाज, गर्दी, दिवस-रात्र सगळं चालू राहतं पण आत एक जागा कायमची रिकामी राहते..🙌
दुःखाचं मोजमाप सगळेचं करतात..कोणत्या शब्दांनी जखम केली, किती खोलवर, किती काळ टिकेल. पण आनंद? तो येतो आणि आपण थांबतच नाही. ना त्याची गणती, ना त्याची जपणूक म्हणून दुःख वाढतं आणि आनंद कमी वाटतो..खरं तर कमी काहीच नसतं..आपण फक्त आनंद मोजायला शिकलेले नसतो..🙌
आपण आपला मुळं स्वभाव आहे तसाच ठेवावा, एखादा व्यक्ती वाईट वागला म्हणून जग वाईट होतं नाही. आपण त्याच्याशी असलेलं नातं संपवून टाकावं. आपण आपला स्वभाव पूर्वीसारखाच ठेवावां, तीच आपली ओळख असते. उगाच ओढून ताणून बदलेलं वागणं आपल्याला पटत नाही आणि जवळच्या माणसांना रुचत नाही. त्यामुळं चांगलं ��ाहायचं आणि मजेत जगायचं.
जोपर्यंत ती तुझ्याकडे तुझा वेळ मागत भांडतेय,तोपर्यंत स्वतःला नशीबवान समज…कारण त्या भांडणामागे अपेक्षा असते,आणि अपेक्षांमागे अजूनही जपायची ओढ दडलेली असते.
वेळ मागणं म्हणजे केवळ तक्रार नसते,तर नातं जिवंत ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो.कोणीतरी अजूनही तुला आपल्या प्राधान्यात +