🎯प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तीन पुरुष निर्व्यसनी असणं खूप महत्वाचं आहे.
1. वडील निर्व्यसनी असेल तर बालपण आनंदात जात.
2. दुसरं म्हणजे नवरा निर्व्यसनी असेल. तर तारुण्य कौतुकात जाते...
3. आणि तिसरं म्हणजे मुलगा निर्व्यसनी असेल तर म्हातारपण सुखात जाते...👈
#वाचलेलं
एक गोष्ट मान्य करावीच लागेल,
आधीच्या काळात अध्यात्माचा योग्य वापर करून समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी आणि आताच्या काळात शिक्षणाचा योग्य वापर करून समाजातील भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी या महाराष्ट्राला "तुकोबाचीच" गरज पडली आहे!!!
विधानपरिषद निवडणूक म्हणजे "मूर्खांचा बाजार"
आपल्याकडे विधानपरिषदेत ७ शिक्षक आमदार आहेत आणि ७ पदवीधर आमदार आहेत
पेपरफुटी झाली, आत्महत्या झाल्या, नोकर भरतीत रोज घोटाळे होतात. बेरोजगारी वाढलीये
आणि हे आमदार डोळ्याला पट्टी आणि थोबाडाला कुलूप लावून बसले आहेत.
जगाच्या नियमात सुख कधी मिळत नसतं,
मनाचं पाखरू तर आपल्याच धुंदीत उडत असतं...
शोधून काढायची असते ती एकच आवडती व्यक्ती,
जिच्या कुशीत संपूर्ण आयुष्य हसत-खेळत सरत असतं.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील तीन गुळ निर्मिती कारखान्यावर छापे टाकले. त्यात गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे आढळून आले आहे. तिन्ही ठिकाणी तब्बल दहा लाख 66 हजार रुपयांची किंमतीच्या गुळाचा 15 हजार किलो साठा जप्त करण्यात आला आहे. 👇
नागपूरमधील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे.
एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने प्रचंड उष्णतेत जगण्यासाठी
कूलरसारखी मूलभूत सुविधा मागितली… एवढीच तिची चूक होती का?
विद्यार्थिनीने आपली समस्या थेट मुख्यमंत्री स्तरापर्यंत पोहोचवली आणि
त्यानंतर तिलाच वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली,
ही बाब केवळ अन्यायकारक नाही तर लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह
निर्माण करणारी आहे.
लोकशाहीमध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या नाहीत का?
विद्यार्थ्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवायचा नाही का?
की फक्त शांत राहून त्रास सहन करायचा?
शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षित,
सन्मानजनक आणि मूलभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहे.
कूलरची मागणी ही कोणतीही चैनीची गोष्ट नसून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर
एक आवश्यक गरज आहे.
आज प्रश्न फक्त एका विद्यार्थिनीचा नाही…
प्रश्न आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, विद्यार्थ्यांच्या हक्कांचा आणि सत्तेला
प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचा.
जर समस्या मांडणाऱ्यांनाच शिक्षा दिली जाणार असेल, तर उद्या
कुणीही अन्यायाविरोधात बोलण्याचं धाडस करणार नाही. ही प्रवृत्ती
धोकादायक आहे.
विद्यार्थिनीला न्याय मिळालाच पाहिजे आणि या प्रकरणाची निष्पक्ष
चौकशी झाली पाहिजे. कारण लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नसतो.
तामिळनाडूच्या जनमतावर आपल्याकडे व्हेटो पॉवर असल्याप्रमाणे राज्यपाल महोदय वागतायत.
दोन दिवसांत दोनवेळा विजय हे राजभवनावर जाऊन आल्यानंतरही सरकार स्थापनेचं आमंत्रण नाही.
बहुमत सिद्ध करण्याची जागा राजभवन नव्हे केवळ आणि केवळ विधानसभा सभागृहच आहे.
घोडेबाजार नको म्हणून आधी आकडे दाखवा हा निकष महाराष्ट्र, गोवा, मणिपूरमधे राज्यपालांनी लावला होता?
एकदा सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण दिले की तो पक्ष सत्ता स्थापन करू शकतो हे दिसल्यावर छोट्या पक्षांची पण भूमिका ठरू शकते.
पण अप्रत्यक्षपणे लोकमताला प्रभावित करण्याचं काम राज्यपाल करतायत.
The Governor's Office was never meant to be an unelected Veto Over People's Verdict.
पत्रकार:- खून केल्यानंतर तुम्ही पळून गेलात फरारी राहिलात त्यामुळे मग तुम्ही पळून गेल्यानंतर तुमच्या घरच्यांना कुटुंबीयांना कसा त्रास झाला??
बापू:- आव पुष्कळ झाला की! बायकोला अटक, आईला अटक, भावाला अटक. सगळ्यांना अटक केली. आमचं घर जप्त केलं.आमची जमीन जप्त केली ! करू दे म्हणलं काय, वडलाचंच हाई, आता जमिनीसाठी काय आमी काय मरायचं हाई का? आम्ही जगलो तर आणिक जमीन घेता यील, आम्ही जगलो तर आणिक घर बांधता यील.
गावच्या पोरींनी कृष्णा कोयना संगमा मध्ये मध्ये उडी घेण्याच्या अगोदर बापू बिरू वाटेगावकरांची भेट घेऊन सांगितलं होतं" जशी गावची पोरगी हाल हाल करून मारली तशी आमची जर हालत झाली त्याच्या अगोदर आम्ही कृष्णा कोयना संगमात जीव सोडतो" पण पुढे त्यांनी काही पाऊल उचलायच्या अगोदर बापूंनी बाईचा बलात्कार करून खून करणाऱ्या रंग्याचा हाल हाल करून काटा काढला.
ज्याच्याबरोबर आपला काही संबंध नव्हता. कोणी आपल्या घरचा नव्हता दारचा नव्हता, नातेवाईक नव्हता पण गावातल्या पोरी बाळी आपल्याही कुणीतरी पोरीबाळी लागतात याच भावनेतून त्यांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बदला घ्यायचा, 12 12 वर्षे फरार राहायचं आणि घरदार ,जमिनी, कुटुंबीयांची होळी करायची याला वाघाचं काळीज लागतं!!🪷🙏🏿 ते काळीज आमच्या आप्पाकडे होतं!
मिसिंग लिंक चे उद्घाटन करून बायकांबद्दल आणि गोरगरीब लोकांबद्दल कीर्तनातून शेरेबाजी करणाऱ्या कीर्तनकाराच्या घरच्या राजेशाही लग्नाला उपस्थित राहणारे उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री हे गृहमंत्री म्हणून चार वर्षीय मुलीच्या निर्घृण बलात्कार आणि खून प्रकरणामध्ये प्रभावी यंत्रणा राबवण्यासाठी मिसिंग राहत असेल तर उद्या लोकांनी कायदा हातात घेऊन जेल तोडून आरोपीची खांडोळी केली तर आश्चर्य वाटायला नको! लोकशाहीची मिजास भाषणामध्ये ऐकायला चांगली वाटते. ती मिजास जर गरीब, दुर्बळ लोकांवर आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करू शकत नसेल तर असली पोकळ मिजास काही कामाची नाही.
- @advanjalispeaks
अब्रूची बोली लावून इथे, न्याय विकला जातो,
गुन्हेगाराच्या पायाशी, कायद्याचा बळी दिला जातो!
प्रेम म्हणजे केवळ हव्यास, हेच मनावर ठसवलंय,
नकाराच्या त्या रागापोटी, घरं उध्वस्त केलंय!
जिथे सुरक्षितता नावाची, गोष्टच उरली नाही,
तिथे नात्यांच्या नावाखाली, माणुसकीही उरली नाही!
नाही उरला आता कोणताच, सुरक्षित असा कोपरा,
कारण माणसाच्या रूपात, इथे सैतानच आहे पोरा...
मी काल मंगळवारी सांगली मध्ये चहा घेण्यासाठी चहाच्या दुकानात एकटाच बसलेलो सकाळी आठ वाजल्या होत्या गर्दी वगैरे काहीच न्हवती त्यात आसपासची दुकाने ही बंद होती
अचानक तिथे आसूड बडवत एक व्यक्ती आला
त्याने मला पैसे मागितले
त्याला ही माहिती होते ईथे धान्य किंवा पिठ मिळणार नाही
मी त्याला २० रूपये दिले
आणि
* मी विचारले...बंधू का म्हणून असे हाल करून घेतोस
रहातोस कुठे तुझं शिक्षण किती झाले लग्न वगैरे काही झाले का नाही
* तो म्हणाला... मी ईथेच खालच्या वस्तीत दगडाच्या खाणी जवळ रहातो
शिक्षण फक्त ३ री झाले आहे
* मी म्हटलं तुझं वय किती लग्न झाले का नाही
* तो म्हणाला माझं वय सत्तावीस अठ्ठावीस असलं
आणि लग्न झालंय दोन पोरं आहेत
* मी म्हटले पोरं शाळेत जातात का
* तो म्हणाला शिक्षणात काय आहे भाऊ
कोठे पोरं कलेक्टर होणार हायती
तसं जर असतं तर मी पण कलेक्टरच झालो असतो की
यातच मैदाळा पैसा मिळतो धान्य मिळतं
लोकं पाहिजे ते देत्यात
आणखी काय पाहिजे
* मला खुप वाईट वाटलं नंतर मी त्याला विचारले अरे शिक्षणात सवलत आहे १० वी पर्यत सरसकट समधं फ्रि मध्ये मिळतंय सर्व जातीतील पोरांना कपडे पुस्तकं सरकार देतयं तरिही पोरांना शाळेत का लावना तू
*तो म्हणाला आजकाल कोठे काय मिळतंय..
आता म्हणत्यात अबकड का काय चालू आहे ते झालं की मिळल बघा समधं
* त्याला म्हटलं हे अबकड म्हणजे काय रं
* तर तो म्हणाला सगळीकडं गाजावाजा चालू आहे आमच्या वाट्याचं कोणतरी सवलती खात्यात त्या साठी अबकड चालू आहे 😊
* मी त्यासंदर्भात त्याला काहीच बोललो नाही
त्याला दोष देण्यापेक्षा त्याच्या हातात आणखी ३० रूपये दिले आणि अलविदा केला 🙏
.
टिप- यातूनही हेच स्पष्ट झाले की.. कोणच कोणाचे आरक्षण खात नाही फक्त समाजातील काही लालची पूढारी नेत्यांमुळे संभ्रम निर्माण होतो..
म्हणूनच विचार बदला नशिब बदलेल- वामनदादा पै
#FB_POST
नवरा गेल्यावर तिसऱ्या दिवशी अजिबात संवैधानिक नसलेल्या पदाची शपथ घेणं लाजीरवाणं नाहीये.
आपला टुकार मुलगा राज्यसभेवर घुसवून त्या सभागृहाचं अवमूल्यन करणं लाजीरवाणे नाहीये.
नवऱ्याची बेनामी संपत्ती आणि साम्राज्य जपण्यासाठी गुजरात आणि नागपूरच्या माफियांच्या दरबारात मांडलिक होणं लाजीरवाणे नाहीये.
आपण लिहून दिलेली असंबद्ध भाषणं वाचतो आणि त्यातले विचार रानोमाळ हरवलेले असतात हे लाजीरवाणे नाहीये.
भाजपने शिट्टी मारली की समाजमाध्यमावर लाळ गाळणाऱ्या पोस्ट टाकणं लाजीरवाणं नाहीये.
बिनविरोध निवडून येण्यासाठी भावनेचं दुकान मांडणं लाजीरवाणं नाहीये.
महिला आरक्षणाच्या माध्यमातून गुजरातचे माफिया देशाची संघराज्य चौकट मोडीत काढताहेत हे कळण्याइतपत समज आपल्याला नाही आणि म्हणून किमान तोंड बंद ठेवावं हे आपल्याला कळत नाहीये हे लाजीरवाणे नाहीये.
आणि तुम्ही महाराष्ट्राच्या स्वयंघोषित पहिल्या कुटुंबाच्या वारस आहात.
सगळ्यात लाजीरवाणं हे आहे.
लवकरात लवकर तुमचं कौटुंबिक संस्थान बारामतीपासूनच खालसा व्हावं या महाराष्ट्राला शुभेच्छा.
नाशिक येथे एका कंपनीमध्ये घडलेल्या अपराधी घटनेला भाजपा आदी मंडळी "कॉर्पोरेट जिहाद" असे नाव देत आहेत. पण त्या कॉर्पोरेट कंपनीला मात्र वाचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सदर कंपनीचे नाव ही बाहेर येऊ नये याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत मात्र या प्रकरणातील इतर बाबी मात्र माध्यमांत सोडल्या जात आहेत. तपास चालू असताना कंपनीला क्लीन चिट कशी दिली? किती कंपनी अधिकाऱ्यांना याची माहिती होती?
ही घटना आगंतूक आहे, का सांगितले जाते त्याप्रमाणे रॅकेट आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. जर रॅकेट असेल तर या अगोदर किती महिलांचे धर्मांतर झाले, किती लोक यात सामील होते? कोणते मौलवी सामिल होते? Modus Operandi काय? हे समोर यावे. भाजपा शासित राज्यात हे कसं झालं, इतका काळ कसं चालू राहीलं? हे प्रकरण भाजपा - संघाच्या अजेंड्यासाठी न वापरले जाता या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याची आवश्यकता आहे. पुन्हा असा प्रकार महाराष्ट्रात होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.
ज्या #Delimitation च्या मुद्द्यावर आपण एम के स्टॅलिन च कौतुक करतोय त्याआधी तमिळनाडूच्या मतदारांचे देखील कौतुक केले पाहिजे ज्यांनी स्टॅलिनला लढण्यासाठी २४ लोकसभा खासदार, १३३ विधानसभा आमदार आणि त्यातून १० राज्यसभा खासदार दिले.
महाराष्ट्रात ही ताकद #मराठी माणसाने कोणाला दिली आहे ?
लोकसभा खासदारांची संख्या राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केली जाण्याच्या वेळी अमेरिकेचा दाखला !
अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेसेन्टेटिव्ह मध्ये ५४५ लोकप्रतिनिधी जातात. ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्यातून लोकसंख्येच्या प्रमाणात..
पण अमेरिकेतील वरिष्ठ सभागृह सिनेट मध्ये एकूण १०० सिनेटर्स असतात जे प्रत्येक राज्यातून दोन याप्रमाणे त्या देशातील ५० राज्ये निवडून देतात. ( दर दोन वर्षांनी एक तृतीयांश या पद्धतीने). मोठ्या लोकसंख्येचा राज्यांना दोन आणि सर्वात कमी लोकसंख्येच्या राज्यांना देखील दोनच.
मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांनी कनिष्ठ सभागृहात बहुमताच्या जोरावर पास केलेली, पण आपल्या हिताला बाधा आणू शकणारी विधेयके लहान राज्ये सेनेट मध्ये अडकवू शकतात.
भारताची आर्थिक धोरणे कशी बाजाराधीष्टीत असली पाहिजेत हे पटवून देताना नेहमी अमेरिकेचे दाखले देणारे अमेरिकेतील गैरसोयीच्या असणाऱ्या राजकीय प्रणालीचा दाखला कधीच देणार नाहीत
संजीव चांदोरकर (१६ एप्रिल २०२६)
सांगा बर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एखादं वाक्य ज्यामुळे डोळ्यात पाणी येते.
माझे👇
"रामु तुझ्या आजारासाठी असंख्य डॉक्टर मिळतील पण माझ्या समाजाला लागलेल्या आजाराचा मी एकटाच डॉक्टर आहे गं"🥺❤️
#ThankyouBabasaheb#भिमजयंती#एप्रिल१४
कोव्हिड काळात या दुकानदार पिता पुत्राने दुकान थोडे जास्त वेळ चालू ठेवले म्हणून यांना मदुराई जिल्हा पोलिसांनी पोलिस स्टेशन मध्ये इतके मारले की त्यांचा मृत्यू झाला.
काल कोर्टाने नऊ पोलिस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे..
ही पहिलीच वेळ आहे की नऊ पोलिस फासावर दिले जाणार आहेत...
"जय भीम" चित्रपटाची आठवण झाली.