@NANA_PATOLE कृषि अभियांत्रिकी शाखेवर होणारा अन्याय थांबवा..
आधी कृषि सेवेचा अभ्यासक्रम रद्द करून तत्काळ बदलणे आवश्यक आहे.
नंतर 258 जागांची जाहिरात टाका..
तुम्ही अभियांत्रिकीला डावलं तर याचा अर्थ असा की तुम्ही यांत्रिकीकरणाला डावलत आहे. आधुनिक शेतीला डावलत आहे हे लक्षात घ्या.
थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
@mieknathshinde मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारावा लागत असेल तर खरच किती लक्ष आहे आपल विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हे महाराष्ट्र पाहतोय विद्यार्थी गेले 33दिवस झाल आंदोलन करतायत आपल्या कडुन साधी विचारपुस नाही या विद्यार्थ्याचे आंदोलन जनआंदोलन होईल
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
#JusticeForAgrilEngg कृषी अभियांत्रिकी साठी स्वतंत्र संचलनालय स्थापन करावे यासाठी आज आंदोलनकर्त्यांनी @icarindia चे ADG Dr.R.K.Singh यांची भेट घेऊन मागणीपत्र दिले...ADG सरांनी सर्व समजावून घेऊन उच्चस्तरीय अधिकार्यांना व महाराष्ट्र शासनाला पत्राद्वारे कळविणार, असा शब्द दिला.