आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:-
एक Ahmedabad… दुसरं Kolhapur.
कोल्हापूर अंतराने जवळ.
अहमदाबाद लांब.
पण connectivity?
उलट.
अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन.
कोल्हापूरला?
फक्त ३…
म्हणजे प्रश्न अंतराचा नाही:
सुविधा आणि प्राधान्यांचा आहे.
तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते.
इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा.
तिकडे business corridor तयार.
इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…!
मग लोक काय करणार?
ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..?
मुंबई त�� कोल्हापूर:
१०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं.
आणि हे सगळं का?
कारण पर्यायच नाही.
अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो:
कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत.
कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो:
खाजगी गाडीने जाऊ का बसने?
तिकडे विकास होतोय…
आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….
थोडं स्वतःसाठी ही जग मित्रा...
महिन्याच्या पहिल्या तारखेला SMS येतो- Salary credited.
क्षणभर छाती भरून येते…
आणि लगेच दुसरा विचार येतो
“चला, आता सुरू होईल गणितं.”
घरभाडं.
लाईट बिल.
पाणी.
EMI.
शाळेची फी.
उधारी.
कोणाचं ��री आजारपण.
कोणाचं तरी लग्न.
आणि शेवटी हातात काय उरतं?
एक सुप्त आशा “ठीक आहे, या महिन्यात नाही… पुढच्या महिन्यात स्वतःसाठी काहीतरी घेईन.”
जगात खूप जणांचं हे फक्त आर्थिक वास्तवच नाहीये, तर ते आयुष्याचं वास्तवदेखील आहे.
कुणी आपल्याला शिकवलंच नाही स्वतःसाठी जगायला.
लहानपणापासून शिकवलं गेलं,
“आधी घर.”
“आधी कुटुंब.”
“आधी जबाबदाऱ्या.”
कोणी कधीच शिकवलं नाही,
“आधी तू.”
हळूहळू आपण इतके जबाबदार होतो की स्वतःची इच्छा असणं हे ही अपराध वाटायला लागतं.
नवीन कपडे दुकानात दिसतात…
हात पुढे जातो…आणि लगेच मन मागे ओढतं,
“नको… गरज नाही.”
आपण सगळे जबाबदार आहोत.
आपण कुटुंबासाठी उभं राहतो, जबाबदाऱ्या पेलतो, तडजोडी करतो.
पण हळूहळू आपण आपल्या स्वतःला ‘पुढच्या महिन्यावर’ ढकलत राहतो.
स्वतःचे शौक – पुढच्या महिन्य��त.
स्वतःची विश्रांती – पुढच्या महिन्यात.
स्वतःची स्वप्नं – पुढच्या महिन्यात.
आणि तो “पुढचा महिना” कधीच येत नाही.
“या महिन्यात नाही… पुढच्या महिन्यात.” हे वाक्य भले आपल्याला आशा देतं-आपल्याला जिवंत ठेवतं, पण आयुष्य हळूहळू चोरून नेतं. आपण जगतो, पण आपल्याला जिवंत असल्यासारखं वाटत नाही.
कारण पुढच्या महिन्यातही
तेच बिल्स असतात.
तेच EMI असतात.
तेच ताण असतात.
जेव्हा माणूस स्वतःला विसरतो, तेव��हा तो हळूहळू आतून थकायला लागतो. मानसिक थकवा ही एक न बोललेली वेदना असते. पैसे कमी असले तरी माणूस जगतो. पण आशा कमी झाल्या, तर जगणं अवघड होतं.
एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस घ्या. सकाळी उठतो, धावपळ, ऑफिस, ट्रॅफिक, बॉसचा ताण, कामाचा प्रेशर.
महिन्याच्या शेवटी पगार येतो… पण तो खात्यात जास्त वेळ थांबतच नाही. जसं पाणी गळक्या भांड्यातून निघून जातं, तसाच पगार जबाबदाऱ्यांमधून निघून जातो.
आणि आपण स्वतःला समजावत राहतो, “अजून थोडं कष्ट करूया… नंतर बघू.”
प�� नंतरचं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांचं मोठं व्हर्जन असतं.
खरी समस्या पैशांची नाही.
समस्या कमी पगाराची नाही,
समस्या खर्चांचीही नाही.
समस्या आहे – स्वतःला कायम शेवटी ठेवण्याची.
आपण सगळ्यांना प्राधान्य देतो, आई-वडील, मुलं, जोडीदार, समाज, लोक काय म्हणतील…
पण “मी” हा शब्द आपल्या यादीत शेवटचा असतो, कधी कधी तर यादीतच नसतो.
स्वतःला विसरणं म्हणजे बलिदान नाही, ती हळूहळू केलेली आत्महत्या आहे. हे कटू आहे, पण खरं आहे.
दर महिन्याला स्वतःची इच्छा मारणं,
दर वर्षी स्वतःचं स्वप्न पुढे ढकलणं,
दर दिवस स्वतःला शेवटी ठेवणं,
हा त्याग नाही, हे हळूहळू स्वतःला मिटवणं आहे.
एक बाप.
मुलांसाठी सगळं करतो. स्वतः २-४ जोडी कपडे वर्षानुवर्षं वापरतो. तीच-तीच चप्पल-बूट वापरतो. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो.
एक दिवस त्याचा जीव जातो. मुलं रडतात, घर कोसळतं,
आणि बापाच्या पश्चात बापाचे फाटके कपडे, तुटलेली चप्पल बघून सगळ्यांना जाणवतं,
“हा माणूस स्वतःसाठी कधीच जगलाच नाही.”
तो हिरो होता. पण स्वतःच्या आयुष्यात तो फक्त नोकर राहिला.
तुम्ही स्वतःसाठी जगलात,
तर तुम्ही कुटुंबावर प्रेम कमी करत नाही. उलट, आनंदी माणूसच इतरांना आनंद देऊ शकतो.
रिकाम्या माणसाकडून
कुणालाच भरभरून काही मिळत नाही.
रिकाम्या बॅटरीची पॉवरबँक कोणतंही उपकरण चार्ज करू शकत नाही.
तस��च थकलेला, तुटलेला माणूस
कुणालाही पूर्णपणे आनंद देऊ शकत नाही.
स्वतःसाठी काही करणं म्हणजे काही स्वार्थ नाहीय.
आपल्या समाजात एक गैरसमज आहे,
“स्वतःसाठी विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा.”
नाही.
स्वतःसाठी विचार करणं म्हणजे स्वतःला जपणं.
पगार आला की थोडा खर्च स्वतःवर करायला शिका. तो खर्च भौतिक असायलाच हवा असं नाही.
कधी स्वतःला वेळ द्या. कधी विश्रांती. कधी फक्त स्वतःशी प्रामाणिक रहा.
पण स्वतःला स���ंगा.
“मी ही महत्त्वाचा आहे.”
स्वतःचा आनंद पुढे ढकलू नका
नवं फोन, कपडे, सहल…
सगळं लगेच शक्य नसेल.
पण आनंदाला कायम ‘नंतर’वर ठेवू नका. स्वप्नं जिवंत ठेवा. स्वप्नं म्हणजे लक्झरी नाही. ती मानसिक गरज आहे.
लक्षात ठेवा…
जर आयुष्य सतत “पुढच्या महिन्यावर” ढकलत राहाल,
तर एक दिवस असा येईल
की आयुष्यच मागे वळून बोलेल,
“आता तुझा इथला वेळ संपला, इतकी वर्षं कुणासाठी जगलास…
आणि स्वतःसाठी किती जगलास?”
हे प्रश्न येण्याआधी थांबा.
तो दिवस येऊ देऊ नका.
जबाबदाऱ्या नक्की सांभाळा.
नक्की कष्ट करा.
पण स्वतःला विसरू नका.
कारण… घर चालवणारा माणूसही
कधी कधी स्वतःच्या आयुष्याचा मालक असायला हवा.
कारण,
पगार संपला तरी चालेल,
पण तुम्ही आतून संपता कामा नये.
सावडण्या माझी राख कुठे त्यांना वेळ होता..!
कमाईचा, सत्तेचा माझ्या त्यांना हिस्सा वाटून घ्यायचा होता.!!
गावाची वेस ओलांडायची नाही, सुतक आहे, नवीन गोष्ट करायची नाही. हे फक्त सामान्य लोकांसाठी असते राव.....😔😢
#सत्तापिसासू#गिधाड
NCERT ने मराठा इतिहासकारांचा सल्ला न घेता, तक्रार करणाऱ्या राजपूत व त्यांच्या तथाकथित राजघराण्यांच्या दबावाला बळी पडून NCERT ने १८व्या शतकातील मराठा साम्राज्याचा अटक ते क��कपर्यंतचा नकाशा काढून टाकला आहे.
या लोकांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली व RTI दाखल केली आणि राजकीय दबाव टाकला.
ही बाब मी
@YuvrajSambhaji @Mudhojiraje @Chh_Udayanraje
यांच्या निदर्शनास आणू इच्छितो.यावर आवाज उठवा आणि मराठा -महाराष्ट्रच्या इतिहासावर होत असलेला अन्याय थांबवा.
#SaveMarathaHistory
बातमीमध्ये कुठल्याही आरोपीची नावे यामध्ये नाहीत. पुस्तकाच्या प्रकाशकांनी कुठल्याही प्रकारची पडताळणी केली नाही असे नमूद केले आहे. ही स्वच्छ फसवणूक आहे.
आरोपींची ��ावे शासनाने जाहीर करावीत. महाराष्ट्रभर त्यांचे नाव आणि फोटो असलेले बॅनर झळकू द्या.