मुंबईतील स्वस्तिक पार्क मुख्यद्वार, गावं रस्ता, भांडुप पश्चिम येथे भर रस्त्यात अतिक्रमण केले गेले आहे, याविरोधात स्थानिक नागरिकांनी जाब विचारला असता त्यांना धमकी दिली जात आहे, अरेरावी केली जात आहे, जर या लोकांनी उद्या कोणावर प्राणघातक हल्ला केला तर याला जबाबदार कोण असेल ? स्थानिक नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे.@DGPMaharashtra@MumbaiPolice
रस्त्यावर पडलेला राडा रोडा, कचरा, घाण, साचलेले पाणी यातून उद्या रोगराई वाढू शकते ज्याचा त्रास स्थानिकांना होणार याला जबाबदार कोण असेल? @mybmc@mybmcWardS@mybmcHealthDept
या अतिक्रमण मुळे स्थानिक नागरीकांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत आहे याला जबाबदार कोण आहे? @MTPHereToHelp
स्थानिक प्रशाससाने त्वरित कारवाई करावी.
@CMOMaharashtra@mnsadhikrut@Shirishmns@abpmajhatv@zee24taasnews@mumbaitak@TV9Marathi@SakalMediaNews@lokmat@LoksattaLive@LokmatMumbai
#Maharashtra #Mumbai
#MyBMC #BMC #MNS #Marathi
#बीड - मराठवाडा वाळवंट होण्याच्या दिशेने ?
बीड जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याच्या शहर व ग्रामीण भागात सुद्धा जा. तुम्ही तिथं बाईक वरून फिरा किंवा पायी चालत जा. तुमच्या नाका -डोळ्यात तोंडात धूळ जाऊन बेजार व्हाल.
ही इतकी धूळ कुठून आली ? याचा विचार कधी केलाय. मातीची धूप शाळेत तुम्ही शिकला असाल, तेच होतंय मृदा संवर्धन होत नाहीये. मातीची धूप रोखण्यासाठी सरकार कडून कोणताही कार्यक्रम दिला जात नाहीय.
सेंट्रल फॉर रुरल वेल्फेअरचे डॉ. सतीश चव्हाण यांनी 2019 साली सांगितले की ― सततच्या दुष्काळामुळे मराठवाडा होरपळतो आहे. निसर्गाचा कोप असतानाही मराठवाड्यासाठीच्या पाणी वाटपातही न्याय मिळालेला नाही. असे असताना जलसंवर्धनाचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास मराठवाड्याचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा ही बाब भाषणामधून ही भीती बोलून दाखवली आहे.
मृदा संवर्धन साठी शासकीय तज्ञ काय करताय कुणालाही माहीत नाही. जिल्ह्यातील एकही आमदार यावर बोलत नाही. खासदार तर स्वतः डॉ आहेत. विज्ञान शाखेतील व्यक्ती खासदार आहे. त्याना सुद्धा याच गांभीर्य नाहीये.
मी एक स्थापत्य अभियंता आहे. आम्हाला हायड्रूलिक्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंट, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, असे माती - जमीन संदर्भात विषय होते. याबद्दल मी मोठा अभ्यासक नसलो तरी याचा छोटासा जाणकार आहे. जमिन माती याबाबत मला कळवळा आहे. ही धूप रोखण्यासाठी काही उपाय आहेत हे सर्व आपण शिकलो शाळेतच आहोत फक्त विसर पडला आहे. तीच आठवण करून देतोय.
अव्यवस्थित शेती, पाण्याची कमतरता, भूजल पातळी खालावणे, झाडे न लावणे. आहे त्या झाडाची तोडमार. बदलते हवामान, बदलते पाऊसमान आदी बाबीचा जमिनीवर मातीवर परिणाम होतोय. अनेक पर्यावरण अभ्यासक, बुद्धिजीवी लोक बोलत आहेत. पण त्याकडे लक्ष कुणाचच नाही.
एक वेबसाईटवर वरून ते उपाय कॉपी केले आहेत. ते बीडकर सहित मराठवाडा मधिल लोकांना ते देतोय काळजीपूर्वक वाचा.
जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना
१) जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी शक्य तितक्या प्रमाणात जागेवरच मुरवावे.
२) पिकांची फेरपालट करावी. माती धरून ठेवणाऱ्या पिकांचा मिश्र पीक पद्धतीत अवलंब करावा.
३) शेतातील मशागत उताराच्या दिशेने करण्याऐवजी उताराला आडवी करावी.
४) शेतामध्ये समपातळी बांधबंदिस्ती सारख्या उपाययोजनांचा वापर करावा.
५) उताराच्या जमीन अथवा डोंगर उतारावर पायऱ्यांची मजगी म्हणजेच पायऱ्यांची शेती करावी.
६) नाला बंदिस्ती सारख्या योजना राबवाव्यात.
७) मोकळ्या जमिनीवर वृक्ष लागवड करणे. शक्य तिथे बांधावर व मोकळ्या जागेत गवताची लागवड करावी.
आपल्या खासदर व राज्य व केंद्र सरकारला याबद्दल काही पडलं नाही पण हे सर्व कामे लोकसहभागातून साधण्यासारखी आहेत.
मातीची धूप हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. पुढच्या पिढ्याना धोका काय, आताच आपल्याला हा धोका जाणवत आहे. एकीकडे मोठं मोठी शहर औद्योगिक विकासाच्या धुराने त्रस्त असताना बीड मराठवाडा मधील लोक मातीच्या धुळीने बेजार आहेत. आणि उद्या चालून इथे औद्योगिक कंपनी आल्या तर शहराची काय हाल होतील याचा विचार करा.
आज बीडच्या जनतेने विशेषतः शिकलेल्या तरूण तरुणींनी यावर बोललं पाहिजे. लगेच हे होणार नाही. पण किमान यावर बोलणं गरजेच आहे. आपलं शहर आपला ग्रामीण भाग मृदा संवर्धीत राहिला पाहिजे यासाठी सरकारला उपाययोजना करण्यासाठी काम करायला भाग पाडा. नवीन खासदारकीचा उमेदवार आहे त्याला हे आश्वासन लेखी मागा.
( विजय गिते -पाटील )