*सप्रेम जय महाराष्ट्र*🚩🔥
*पुणे शहरातील भवानी पेठ भागात राहत असलेले परवेज इब्राहीम मेमन* यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी हृदयरोग (ब्लॉकेज) आजाराचे निदान झाले.त्यांना तात्काळ अँजिओप्लास्टी करायला सांगितले आणि या उपचारासाठी पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये 3.50 लाख रू. खर्च सांगितला. *"शिवसेना युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क कार्यालय पौड* या ठिकाणी संपर्क साधून वैद्यकीय मदतची विचारणा केली असता पुणे येथील नामांकीत हॉस्पिटलमध्ये शस्रक्रिया संपूर्णपणे मोफत करण्यात आपल्याला यश आले.आज हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.आत्ता त्यांची तब्बेत उत्तम आहे. तात्काळ वैद्यकीय मदत केल्याबद्दल मेमन कुटुंबानी शिवसेना संघटनेचे आभार मानले...
*आरोग्य तुमचे जबाबदारी आमची* 🚩
-:*आपला जनसेवक* :-
*अविनाश बलकवडे*
(युवासेना विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र)
सप्रेम जय महाराष्ट्र🚩
पौड येथील माझ्या शिवसेना युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने मोफत शस्रक्रियांसाठी २०पेशंटची गाडी नारळ वाढवून आणि भगवा ध्वज दाखवून शस्रक्रियांसाठी हॉस्पिटलला रवाना करण्यात आली होती. या सर्व रुग्णांवर मोफत शस्रक्रिया करण्यात आल्या.
गणेश उत्सवानिमित्त माले व कोंढावळे खोऱ्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या यामध्ये माले, माले मधील ४ वाड्या वस्ती, जामगांव, दिसली, शेरे, अकोले, कळमशेत, कोंढावळे, बेलावडे,खेचरे या गावोगावी जाऊन मनोभावे बाप्पाचे दर्शन घेतले.
|| गणपती बाप्पा मोरया ||
गणेश चतुर्थी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गणरायाचं आगमन आपल्या घराघरात
सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो!
- अविनाश नानासाहेब बलकवडे
(युवासेना विभागीय सचिव – पश्चिम महाराष्ट्र)
#गणेशचतुर्थी#गणेशोत्सव#GaneshChaturthi2025#मुळशी#शिवसेना
पश्चिम महाराष्ट्रात युवा सेनेची ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार !
मारुंजी (हिंजवडी) येथे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना तथा युवासेना सचिव मा. आ. श्री. वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीत भ्रष्ट महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार, लाडकी बहीण योजनेतून महिलांची नावे वगळल्याबाबत जनतेचा जाब विचारण्याची भूमिका, नवमतदारांशी संपर्क वाढवणे, मतदार नोंदणीवर भर देणे आणि संघटनात्मक ताकद वाढवणे यावर चर्चा झाली.
या वेळी जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य योगेश निमसे, विस्तारक डॉ. सतीश नरसिंह, नीलेश बडदे, अजिंक्य धात्रक, सुशील हांडे, विशाल सातव, आदित्य बोरगे, अनिकेत घुले, संदीप शिंदे, गणेश इंगळे, माऊली पिसाळ, अवधुत पाटील, मंजित माने, शिवाजी पाटील, विनायक गोंदिल, राम थरकुडे, सनी गवते, चेतन पवार, युवती सेनेच्या रेणुका साबळे, विपुल टेहरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिक्त पदांवर लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल आणि जिल्हानिहाय युवा सेनेचे मेळावे आयोजित केले जातील, असा निर्धार या बैठकीत व्यक्त झाला.
एकजूट, संघटन आणि जनतेच्या हक्कासाठी लढा हाच आपला मार्ग!
- अविनाश नानासाहेब बलकवडे
(युवासेना विभागीय सचिव – पश्चिम महाराष्ट्र)
@ShivSenaUBT_@the_yuvasena@AUThackeray@rautsanjay61@AhirsachinAhir@isurajchavan
#YuvaSena #ShivsenaUBT #VarunSardesai #PashchimMaharashtra #YuvaShakti #ShivSainik #मुळशी #शिवसेना
सप्रेम जय महाराष्ट्र🚩
शिवसेना पक्षप्रमुख,मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील शालेय विद्यार्थ्यांना #6000_छत्री वाटप करण्यात आल्या.
चौथ्या टप्प्यात विठ्ठलवाडी,पौड,करमोळी,सावरगाव,चाले,मूगावडे,दखणे,कुळे,नाणेगाव इत्यादी गावांमध्ये जिल्हा परिषद तसेच माध्यमिक विद्यालयात शालेय मुलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
#मुळशी #शिवसेना
@ShivsenaUBTComm@ShivSenaUBT_@yuvasenacomms
सप्रेम जय महाराष्ट्र🚩
शिवसेना पक्षप्रमुख,मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील शालेय विद्यार्थ्यांना #6000_छत्री वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या टप्यात वांद्रे ,निवे/मोहरी/आदरवाडी,ताम्हिणी/चाचिवली,वारक/ढोकळवाडी,पळसे/चाचिवली,मुळशी खुर्द /गोणवडी ,
माले इत्यादी गावांमध्ये जिल्हा परिषद तसेच माध्यमिक विद्यालयात शालेय मुलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@AUThackeray@OfficeofUT@yuvasenacomms@SardesaiVarun@AhirsachinAhir
तुमच्या आरोग्याची काळजी.. ही आमची जबाबदारी !
युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत १८०० पेक्षा जास्त नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया केली आहे. आपल्या कार्यातून असंख्य नागरिकांना सृष्टी पाहण्याची नवीन दृष्टी मिळतेय ही बाब आम्हाला समाधान देणारी आहे.
हा सेवायज्ञ यापुढेही अखंडपणे सुरूच राहणार आहे. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी आम्हाला संपर्क साधावा व सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती.
-अविनाश नानासाहेब बलकवडे
(युवासेना विभागीय सचिव, पश्चिम महाराष्ट्र)
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@the_yuvasena@AUThackeray@AhirsachinAhir@SardesaiVarun
महाराष्ट्रातील आघाडीचे माध्यम असलेल्या दैनिक पुण्यनगरीच्या वतीने माझ्या समाजकार्याची दखल घेत "समाज मित्र" या मानाच्या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले ही बाब माझ्यासाठी आनंदाची व अभिमानाची आहेच, पण त्यासोबतच मला प्रेरणा देणारी व पुढील जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख मा.श्री. आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने मी निस्वार्थपणे स्वतःला समाजकार्यात झोकून दिले आहे. या कार्याची आवर्जून दखल घेतली, या कार्यासाठी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली याबद्दल दैनिक पुण्यनगरीचे मनापासून आभार.
@ShivsenaUBTComm@the_yuvasena
समतेचे पुरस्कर्ते, आरक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक
छत्रपती
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त
विनम्र अभिवादन !
#ChhatrapatiShahuMaharaj#maharashtra
आपल्या प्रेमाने भारावलो... 🙏
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार!
आपली ही साथ आणि सदिच्छा अशीच सदैव लाभो, हीच प्रार्थना...
जय महाराष्ट्र!
@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@the_yuvasena