📍जर @mpsc_office ने बळजबरीने परीक्षा घेऊन शेतकऱ्यांच्या पोरांच्या दुःखावर मीठ चोळायचे काम केले तर आयोगाच्या कार्यालयाला सकल शेतकऱ्यांच्या पोरांद्वारे आयोगाच्या कार्यालयासमोर अन्नपाणी सोडून आमरण उपोषण करण्याचा इशारा आज देत आहे.
📍तात्काळ आयोगाने आपला हुकूमशाही पणा थांबवला नाही तर........
📍स्वायत्त संस्था आहे याचा अर्थ नैसर्गिक आपत्तीला सुद्धा फाट्यावर मारायचे असा अर्थ होत नाही
📍सहायक मोटार वाहन निरीक्षकाची शेकडो पदे रिक्त आहेत.परिवहन मंत्री @PratapSarnaik साहेबांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर रिक्त पदभरती बाबत कार्यवाही करावी अशी नम्र विनंती.🙏
#AMVI
📍नेहमी स्पर्धा परीक्षेच्या आंदोलनात राज्यासेवेचीच मागणी मान्य होते आणि कंबाईन च्या पोरांना वाऱ्यावर सोडून दिले जाते.
📍पोरांनो याचे नक्की कारण काय असेल बरं?
कमेंट करून सांगा, आणि जागावाढीसाठी काय करायला पाहिजे ते पण सांगा😡
#Combine_जागावाढ_2024
📍MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
📍एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office
📍लिपिक टंकलेखक 2023
जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण झाले आहेत. अजून निवड यादीचा पत्ता नाही.
आतापर्यंत उमेदवारांचे उमेदीची जेवढे दिवस वाया घालवले तेवढ्या दिवसाला 365 ने गुणून संबंधित जबाबदार असणाऱ्यांची वेतन कपात करावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठवायला हव.
#DeclareClerk2023result
📍प्रति मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
📍महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2024 मध्ये STI, ASO & SR/SI या पदांच्या संख्येत वाढ करण्यासाठी डिसेंबर 2025 रोजीच्या रिक्त पदांचा विचार करून अतिरिक्त मागणीपत्रक MPSC कडे पाठवावीत.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
कंबाईन पेपर फुटीमध्ये महिला अधिकारी सामील?
असले प्रकार जर एमपीएससी मध्ये घडत असतील तर महाराष्ट्र मध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे असे वाटत आहे.
सामान्यांच्या पोरांनी फक्त अभ्यासच करायचा का? आणि श्रीमंताच्या पोरांनी अधिकाऱ्यांना पैसे देऊन डायरेक्ट प्रश्नपत्रिका घ्यायच्या? असे जर असेल तर हाच सामान्यांचा पोरगा एक दिवस रस्त्यावर उतरेल.
सरकारला या सर्व गोष्टींची मोठी किंमत मोजावी लागेल.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@RRPSpeaks@AbhiPawarBJP@mpsc_office@MahebubShaikh20
MPSC मध्ये खळबळ !
रविवारी होणाऱ्या कंबाईन पुर्व परिक्षेची पत्रिका परीक्षेपूर्वीच देण्याबाबतचा विद्यार्थ्यांना फोन ४० लाख रुपयांची केली मागणी, फोन रेकॉर्डिंग सीविक मिररच्या हाती लागली आहे, अशी बातमी आज वाचली आहे.
बातमी एकूण धक्काच बसला आहे, @mpsc_office यावरती काही बोलणार आहे की नाही?
रविवारचा पेपर होण्याच्यापूर्वीच आयोगाने या बातमी वरती स्पष्टीकरण द्यावे
नक्की पेपर फुटला आहे की नाही? आणि जर पेपर फुटला असेल तर ही होणारी पूर्व परीक्षा काही काळ पुढे ढकलून नवीन पेपर सेट करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, कारण पेपर फुटला असल्यास प्रामाणिकपणे अभ्यास करणारे लोक याच्यात पास होण्याची शक्यता वाटत नाही.
त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर स्पष्टीकरण देऊन विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@RRPSpeaks@MahebubShaikh20
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे.
आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा.
#Combine_जागावाढ_2024
लिपीक टंकलेखक व कर सहायक 2023
MAT तारीख वर तारीख देत आहे.
कृपया आयोगाने गुणवत्ता यादीबाबत तोडगा काढावा आणि उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
लिपीक टंकलेखक व कर सहायक 2023
MAT तारीख वर तारीख देत आहे.
कृपया आयोगाने गुणवत्ता यादीबाबत तोडगा काढावा आणि उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल कधी जाहीर होणार ? लेखी परीक्षा होऊन 8 महिने झालेत. तात्काळ कार्यवाही करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.ही नम्र विनंती 🙏
@mpsc_office@Suvarnakharat4
@mybmc
प्रथम प्रयत्नांच्या अटींमुळे खूप उमेदवारांनी अजून अर्ज केले नाहीत.
कृपया अट रद्द करुन तारीख वाढवावी.
@Dev_Fadnavis साहेब आपण वैयक्तिक लक्ष घालावे.
मा सचिव @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
1) Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
3) Clerk/Tax asst 2023 निकाल लावावा.
ही विनंती.
#DeclareMPSCExamDates
@mpsc_office
परीक्षा पुढे ढकलली पण आता बरेच दिवस झालंय, परीक्षांच्या तारखा जाहीर करा.
राज्यसेवेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी आणि Combine ची जाहिरात पण लवकरात लवकर काढावी, जेणेकरून मुलांना पुढील दिशा ठरवायला सोपे जाईल.
@mieknathshinde@AbhiPawarBJP@RRPSpeaks