📍 #नवी_दिल्ली |
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथील निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. यावेळी सार्वजनिक जीवनात २५ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करून पुष्पगुच्छ आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केले.
यावेळी राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर आमच्यात साकल्याने चर्चा झाली. राज्यातील पाण्याची आणि चाऱ्याची उपलब्धता, दुष्काळ निवारणासाठी केलेल्या विविध उपाययोजना याबाबत माननीय पंतप्रधानांनी सविस्तर जाणून घेतले. तसेच राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच केंद्राची पथके राज्याचा दौरा करतील असेही त्यांनी याप्रसंगी आश्वासित केले. शेतकऱ्यांना भरीव मदत करून त्यांना दिलासा देण्यासाठी शक्य आहे ते सारे करू असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
#NewDelhi #NarendraModi #EknathShinde #Maharashtra
@narendramodi
दुष्काळी दौऱ्यादरम्यान आज यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही तलाव क्रमांक २ येथे प्रत्यक्ष भेट देऊन तलावाची पाहणी केली तसेच उपस्थित मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तलाव व जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम मत्स्यव्यवसायावर होत असून मत्स्यव्यवसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती गांभीर्याने लक्षात घेऊन मच्छीमार बांधवांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे जलाशयांमधील गाळ काढण्याच्या कामासंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी नागरिकांकडून विविध निवेदने स्वीकारून त्यांच्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत उपलब्ध विविध योजनांचा मच्छीमार बांधवांनी प्रभावीपणे लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी केले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आरतीताई फुफाटे, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fisheriesgom
🌙 Good Night ✨
“Every sunset is a reminder that you survived another day. Rest tonight, rise tomorrow, and keep moving closer to your dreams. Believe in yourself—the best is yet to come. 🌟”
Sleep peacefully & wake up stronger. 🤍❤️
https://t.co/9q7XLAXqCE
मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती एस. टी. सावंत यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. सामाजिक, शैक्षणिक तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. परमेश्वराने दिवंगत एस. टी. सावंत यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करावी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ द्यावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏
आज पुण्यातील शास्त्री पेठ येथे #MPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या मागण्या, अडचणी आणि प्रश्न जाणून घेतले.
यावेळी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध मागण्या, परीक्षा पद्धतीतील अडचणी तसेच MPSC च्या कारभाराबाबत त्यांच्या मनातील प्रश्नांची सविस्तर माहिती घेतली.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेईल. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून देऊन त्या मान्य करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
#MPSC #Pune
आज पुणे येथील शास्त्री पेठ येथे #MPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत, राज्य सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे, असा विश्वास यावेळी दिला.
@Dev_Fadnavis#MPSC#Pune
आज पुणे शास्त्री पेठ येथे #MPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या, प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्या. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांवर योग्य तो मार्ग काढण्यासाठी शासन संवेदनशीलतेने विचार करत आहे.
राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
@Dev_Fadnavis
#MPSC #Pune