जय हिंद...🇮🇳 | जय महाराष्ट्र...🚩
🔥 फेरीवाल्यांच्या हक्कासाठी आता निर्णायक लढा! पनवेल महापालिकेच्या मनमानी कारभाराचा पंचनामा! 🔥
केंद्र सरकारने पथविक्रेत्यांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये विशेष कायदा केला असतानाही, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात या कायद्याची सर्रास पायमल्ली होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून 'शहर विक्रेता समिती' (TVC) केवळ कागदावरच असून, हजारो फेरीवाल्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
🚨 आमचे प्रमुख सवाल आणि हरकती:
समिती का रखडली? जून २०२३ मध्ये निवडणूक होऊनही अद्याप समिती अधिसूचित का केली नाही? ही लोकशाहीची चेष्टा नाही का?
बेकायदेशीर जप्ती: सामान जप्त करताना पंचनामा का केला जात नाही? फेरीवाल्यांच्या मालाची यादी त्यांना का दिली जात नाही? केवळ दंड वसूल करणे हेच प्रशासनाचे ध्येय आहे का?
अन्याय सहन करणार नाही: कोरोना काळात ज्यांनी जिवाची पर्वा न करता सेवा दिली, आज त्यांच्यावरच अन्याय होत आहे.
"प्रशासनाने तात्काळ सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर लोकशक्ती कल्याणकारी पथविक्रेता संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल!" 📢🔥
- आपला नम्र,
अबरार मास्टर-कच्छी (समाजसेवक)
🚩 पनवेल तालुका अध्यक्ष – लोकशक्ती कल्याणकारी पथविक्रेता संघटना
🚩 राष्ट्रीय कार्याध्यक्ष – मानवी हक्क संरक्षण फेडरेशन
#PanvelMunicipalCorporation #JusticeForHawkers #StreetVendorsAct #AbrarMasterKachchi #hanzalamukhri #SocialJustice #LoksaktiSanghatana #PanvelDiaries #MaharashtraGovernment #Protest 🏛️🤝🚩📢
@CMOMaharashtra@mieknathshinde@MPShrirangBarne@ithakurprashant@ivikrantpatil@iNitinPatil@abrarmaster8@BN24Officially@KetanBhagat@DrMunirTamboli@PanvelCorp