माढा शहराच्या विकासाला प्राधान्य देत शहरातील विकास कामांसाठी ३२ कोटींचा निधी !
चिंकहिल, तडवळे (त.म.) ते वडशिंगे तसेच वडशिंगे - निमगाव, दारफळ ते अंजनगाव (उमाटे) या सात गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी ३२ कोटींचा निधी !
सामाजिक न्याय आणि समतेच्या प्रस्थापनेसाठी लढा देणारे बहुजन उद्धारक, कला व खेळांचे आश्रयदाते, लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..!
#शाहू_महाराज#जयंती#अभिवादन#ShahuMaharaj
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी; उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांना निवेदनाद्वारे मागणी !
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन माढ्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी !
दूध अनुदान डाटा फिडिंग कामासाठी मुदतवाढ द्यावी; पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी.!
@mahancpspeaks@RVikhePatil
रयतेचे हित लक्षात घेऊन शासन करण्याचा आदर्श परिपाठ महाराजांचे चरित्र आपल्याला देते.राज्याभिषेक दिनानिमित्त हाच आदर्श डोळ्यांपुढे ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी वाटचाल सुरू ठेवूया.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांच्या चरणी वंदन आणि सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी अहिंसा आणि मानवतेचा संदेश देत विश्वाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे माणसाला जगण्याची नवी दिशा व प्रेरणा मिळाली.
विश्ववंदनीय, महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्धांना त्रिवार वंदन! सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा…!!
#बुद्धपौर्णिमा
अभिनंदन.!
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावी ब���र्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, सर्व यशस्वितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा !
#Congratulations
अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त...!
ही अक्षय्य तृतीया आपल्या जीवनात अक्षय्य असे सुख, समाधान आणि शांती घेऊन येवो, ही प्रार्थना !
अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#अक्षय्य#तृतीय#अक्षय्यतृतीया२०२४#शुभेच्छा
बहुजनांच्या शैक्षणिक क्रांती��े महानायक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
#कर्मवीर #भाऊराव #पाटील #पुण्यतिथी #अभिवादन
लोकशाही जपू या !
लोकशाही अधिक समृद्ध करण्यासाठी आणि राष्ट्रउन्नती साठी माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी निमगाव टें. ता. माढा येथील जिल्हा परिषद शाळा येथे सपत्नीक मतदान केले. आपणही लोकशाहीने दिलेला हक्क बजावून मतदान करा.
बहु असोत स���ंदर संपन्न की महा।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥
देशाला वैचारीक दिशा देणारा, संत-महात्म्यांचा, क्रांतिकारकांचा, शूर-वीरांचा हा माझा महाराष्ट्र!
आजच्या 'महाराष्ट्र दिना'च्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्र दिन चिरायू होवो!
श्री राम नवमी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी जीवन लाभो आणि विचारांमध्ये, कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो, हीच प्रार्थना.
#RamNavami#ShriRam#रामनवमी#श्रीरामनवमी
पालवी चैत्राची, अथांग स्नेहाची,
उंचच उंच जाऊ दे गुढी...
उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची!
आपणा सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#GudhiPadva#गुढीपाडवा#नववर्षाभिनंदन#शुभेच्छा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "द प्रॉब्लेम ऑफ रूपी" या ग्रंथांचा आधार घेऊन 1 एप्रिल 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. त्यामुळे 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते.
सर्व भारतीयांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
#RBI