बांग्लादेशात मागील काही काळापासून हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहेत. अनेक हिंदू मंदिरांना टार्गेट केलं जात आहे. धर्माच्या आधारावर नागरीकासोबत दुजाभाव करणे अतिशय निंदनीय आहे. या घटनांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
केंद्र सरकारने यासाठी लवकरात लवकर कठोर पाऊलं उचलायला हवीत
नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून भारतीय नौदलाचे कार्य आणि शौर्य निरंतर सुरू आहे. आज राष्ट्रीय नौदल दिन! भारतीय नौदल दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!
दर्यापुर मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार गजानन लवटे यांनी कुरळपुर्णा येथे भेट घेतली. शेतकरी कष्टकरी मजूर दिव्यांगा करिता काम करत रहा ! आ. गजानन लवटे यांना हार्दिक शुभेच्छा!
जय शिवराय जय ज्योती जय भिम !
आपल्या विचारांतून जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु #गुरु_नानक_देव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
अचलपुर परतवाडा येथील व्यापारी वर्गासोबत गुलाबबाग येथे बैठक आयोजित करण्यात आली. दरवेळी प्रमाणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या पाठिशी राहण्याचा शब्द दिला.
बळ दे झुंजायाला कृपेची ढाल दे
जनतेच्या सेवेसाठी आशीर्वाद विशाल दे...
मुळ गाव बेलोरा येथे कुटूंबीय व गावकऱ्यांचे आशिर्वाद घेऊन नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी रवाना…
निवडणूक नामांकन प्रत्येक वेळेस आईचा आशिर्वाद घेऊन दाखल करायचो. यावेळी आई सोबत नाही परंतु आई बाबाने दिलेली शिकवण सदैव ध्यानी मनी आहे. याच शिकवणीतुन मी व लाखो प्रहार कार्यकर्ते घडले व घडत आहे. अचलपुर चांदुरबाजार मतदारसंघ माझ्या पाठिशी खंबीरपणे सदैव उभा राहणार यात तिळमात्र शंका नाही