छपरी, टपोरी आणि इतर रिकामटेकड्या लोकांचं ॲप म्हणून हे ॲप प्रसिद्ध आहे. त्यामुळे खरं तर या ॲपला नावं ठेवायला इतर निमित्तं शोधायला नको.
तरी काही ठळक कारणं इथे मांडायचा प्रयत्न केलाय.
https://t.co/SI3w1zf93r
#अब_चीनी_बंद
एव्हाना टिकटॉक ॲप चीनमधून उगवलंय हे सर्वश्रुत झालं असलं, तरीही नेमका या ॲपपासून धोका आहे तरी काय, हे एकदा समजून घ्या.
इतर कुठे वाचायचा कंटाळा केला असेल, तर इथे वाचा.
#अब_चीनी_बंद
तत्पूर्वी, नेमका चीनचा माल कोणता, हे तरी आपण ओळखायला हवं ना!
खाली एक यादी देतोय, त्यात दिलेलं प्रत्येक ॲप चीनमध्ये जन्माला आलंय, आणि अजूनही चीनच्याच मालकीचं आहे. या यादीत सतत भर पडत राहील, कारण चीनी ॲप्स अगणित आहेत.
https://t.co/1VpYjjiiIY
#अब_चीनी_बंद
भारतीयांनी उत्पादनासकट इतर अनेक क्षेत्रांमध्ये आता आत्मनिर्भर व्हायला हवं.
केवळ भारतच नव्हे, तर उर्वरित जगसुद्धा अनेक गोष्टींसाठी आजही चीनवर अवलंबून आहे.
चीनच्या मक्तेदारीला आव्हान देणं सोपं नव्हे.
चीनी मालाला भारतीय पर्याय उपलब्ध व्हायलाच हवेत. #अब_चीनी_बंद