Official handle of Mahavitaran Kalyan zone.
Jurisdiction area - KDMC, ULHASNAGAR, BADLAPUR, AMBARNATH,VASAI,PALGHAR.
Operating time - 10.00AM to 01.00PM
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून २०२३-२०२४ या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
#MSEDCL#गौरव_कर्मचाऱ्यांचा
कुरुक्षेत्र येथे सुरू असलेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत नियंत्रण मंडळ स्पर्धा - २०२४ मध्ये महावितरणच्या महिला बॅडमिंटन संघातील वीणा सगदेव, रितिका नायडू, वैष्णवी गांगरकर आणि चैत्रा पै यांनी यशस्वीरित्या बाजी मारून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
#MSEDCL#ProudMoment
एप्रिल फूल करूया हॅकर्सचा!
वीज ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर हॅकर्सपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरण करत आहे.
#MSEDCL#CoolTipsForCyberSafety
महावितरणचे ग्राहकांना आवाहन!
देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री - सूर्यघर मोफत वीज योजने’त तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. १/२
कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद व वीजचोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे.
#MSEDCL#लोक_अदालत
कल्याण परिमंडलाच्या टिटवाळा उपविभागातील मंद व खडवली परिसरातील ६३ वीज चोरांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी १५ लाख ६८ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
#MSEDCL#SayNoToPowerTheft
वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे कोणत्याही उद्योगांना फटका बसू नये, ही महावितरणची प्राथमिकता असून उद्योजकांसह सर्व ग्राहकांच्या सुलभ सेवांसाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे वक्तव्य संचालक(संचलन) श्री. संजय ताकसांडे यांनी कल्याण परिमंडलाच्या आढावा बैठकीत केले.
#MSEDCL#ForConsumers
जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील अमूलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआय) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. १/६
जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील अमूलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआय) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. १/६
कोकण प्रादेशिक विभाग व कल्याण परिमंडल कार्यालयांतर्गत कार्यरत कर्मचारी व कुटुंबियांसाठी उंबर्डे येथील क्रीडांगणात कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात कर्मचारी व कुटुंबियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
#MSEDCL#स्नेहमेळावा-२०२४
अकोला परिमंडलातील ३ लाख ९० हजार ७७५ वीज ग्राहकांनी जानेवारी महिन्यात ७४ कोटी ७१ लाख रुपयांचा ऑनलाईन वीजबिलाचा भरणा केला आहे. ऑनलाईन सुविधेचा वीज ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
#MSEDCL#PayYourBillOnline
कल्याण परिमंडलातील वाडा उपविभागात ७९ वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या वीजचोरांनी ३२ लाख ५८ हजार रुपयांची विज चोरी केल्याचे उघड झाले आहे.
#MSEDCL#SayNoToPowerTheft
राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी व इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येणार आहे.
#MSEDCL#Electricity
कृषीपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत विजयंत्रणाचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे.
#MSEDCL#NewYearGift
महावितरणमध्ये 'विद्युत सहाय्यक' या पदासाठी ५,३४७ जागांवर भरती होणार आहे. इच्छुकांनी अधिक व अधिकृत माहितीकरिता https://t.co/nnOKNbGJC8 या संकेतस्थळास भेट द्यावी.
#MSEDCL#CareerwithMSEDCL
राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी व इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येणार आहे.
#MSEDCL#Electricity
राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी व इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येणार आहे.
#MSEDCL#Electricity
पालघर जिल्ह्यात मखोडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला विद्युतपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीच्या खांबावर ट्रॅक्टर आदळल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यावर महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी समयसूचकता दाखवून तातडीने नवीन विजेचा खांब उपलब्ध करून दिला.
#ForConsumer