महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाची देशपातळीवर नाममुद्रा!
मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सने India Today च्या "Best Colleges of India 2026" सर्वेक्षणात 'Top 10 Colleges with Best Value for Money – Commerce' या श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे!
गुणवत्तापूर्ण शिक्षण, परवडणारी शुल्करचना आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन यामुळे मिळालेले हे यश महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रयत्नांना मिळालेली पोचपावती आहे.
या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध राहू.
सिडनहॅम कॉलेजला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#SydenhamCollege #MaharashtraEducation #HigherEducation #PrideOfMaharashtra #BestColleges2026
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी दरवर्षी सर्व स्नेही, आप्तेष्ट आणि कार्यकर्त्यांना एक आग्रहाची व हक्काची विनंती करतो. "हार-तुरे, पुष्पगुच्छ नकोत; त्याऐवजी सामाजिक कार्यासाठी आपले योगदान द्या!" तुमच्या अथांग प्रेमामुळे या आवाहनाला दरवर्षी भरभरून प्रतिसाद मिळतो, ज्याने माझा ऊर अभिमानाने भरून येतो.
यंदा या आवाहनाला अधिक व्यापक रूप देत आम्ही 'मानसी' आणि 'सुखदा' या समाजोपयोगी उपक्रमांसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले होते. या हाकेला नेहमीप्रमाणे माणुसकीच्या नात्याने 'रांजेकर ग्रुप'ने साद दिली! त्यांनी प्रशांत दामले प्रस्तुत आणि अष्टपैलू अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘कुटुंब कीर्तन’ या बहारदार नाट्यप्रयोगाचे कोथरूड येथे खास आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगातून संकलित होणारा संपूर्ण निधी माझ्या 'मानसी-प्रेरणा फाउंडेशन'ला देण्याचा एक अत्यंत कौतुकास्पद संकल्प रांजेकर ग्रुपने केला होता.
हा प्रयोग अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. या प्रयोगाच्या माध्यमातून जमा झालेला निधी 'मानसी-प्रेरणा फाउंडेशन'कडे सुपूर्द करण्यात आला. समाजाप्रती असलेली ही बांधिलकी पाहून मन खरोखर तृप्त झाले.
हा स्तुत्य उपक्रम यशस्वी केल्याबद्दल मी 'रांजेकर ग्रुप', प्रिय संकर्षण कऱ्हाडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अंतःकरणापासून आभार मानतो. तुम्ही केवळ नाटक सादर केले नाही, तर अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले आहेत. सामाजिक कार्याचा हा पवित्र यज्ञ असाच धगधगत ठेवण्यासाठी रांजेकर समूहाचे असेच मोलाचे सहकार्य आणि प्रेम सदैव पाठीशी राहील, हा सार्थ विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.
📍 कोथरूड
#कोथरुड #Kothrud #मानसीप्रेरणाफाउंडेशन #ManasiPrernaFoundation #सामाजिकबांधिलकी #SocialCause #SankalpForChange #कुटुंबकीर्तन
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
प्रकृति, पर्यावरण और समस्त सृष्टि का सम्मान हमारे अस्तित्व के मूल में है। आइए, हम इनके प्रति पूरी कृतज्ञता और सेवाभाव के साथ एक स्वस्थ, समृद्ध और सशक्त राष्ट्र के निर्माण में सहभागी बनें।
शं नो द्यावापृथिवी पूर्वहूतौ शमन्तरिक्षं दृशये नो अस्तु।
शं न ओषधीर्वनिनो भवन्तु शं नो रजसस्पतिरस्तु जिष्णुः॥
भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजोड व्यक्तिमत्त्व, थोर गायक पंडित वसंतराव देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे संगीत क्षेत्रातील अजरामर योगदान आणि सुरांचा वारसा पिढ्यानपिढ्या आठवणीत राहील.
#भारतीय_शास्त्रीय_संगीत#नाट्यसंगीत#वसंतरावदेशपांडे #पं_वसंतराव_देशपांडे #पुण्यतिथी
आज कोथरूड येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून 'सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशन'तर्फे नोंदणीकृत बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एका विशेष बचत योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत तब्बल २०० बालकांची नवीन बचत खाती उघडण्यात आली आहेत.या सामाजिक उपक्रमादरम्यान संस्थेच्या संचालिका सौ. स्मिता पाटील यांच्या शुभहस्ते सर्व लाभार्थी बालकांना त्यांच्या बचत खात्यांच्या पासबुकचे अधिकृतरित्या वितरण करण्यात आले.
बालकांमध्ये लहान वयापासूनच बचतीची सवय रुजावी आणि त्यांच्या भविष्यातील शिक्षणाला व प्रगतीला हातभार लागावा, या उद्देशाने राबवण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
📍२९ जुलै २०२६, कोथरूड
#Kothrud #GuruPurnima #SakhiSukhdaFoundation #ChildWelfare #SavingScheme #SocialService
@BJP4Maharashtra@BJP4PuneCity
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज कोथरूड येथील शास्त्रीनगर येथे 'श्री साई मित्र मंडळ' आणि 'साईज्योत प्रतिष्ठान' यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबांच्या भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
या भक्तिमय सोहळ्याला उपस्थित राहून साई बाबांच्या आरतीचा लाभ घेतला व उपस्थित सर्व भाविकांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी साईज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास मोहोळ, कार्याध्यक्ष सचिन पवार, नगरसेविका रुपाली पवार, विश्वास मुरकुटे, वैभव मुरकुटे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍२९ जुलै २०२६, कोथरूड
#GuruPurnima #SaiBaba #GuruVandana #Kothrud #Pune #ShastriNagar #SaiJyotPratishthan
@BJP4Maharashtra@BJP4PuneCity
आज कोथरुड येथे समर्थ युवा फाउंडेशनच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले.
समाजहित, युवक सक्षमीकरण आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समर्थ युवा फाउंडेशन करत असलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी अधिक व्यापक होत जावो, अशा शुभेच्छा यावेळी दिल्या.
या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास आहे.
📍२९ जुलै २०२६ | कोथरूड
#समर्थयुवा_फाउंडेशन #कोथरुड #Pune #BJP #YouthEmpowerment
@SidShirole@rajeshpandebjp@BJP4Maharashtra
आज पुण्यातील चिंचवड येथे सांस्कृतिक कार्य विभाग, समरसता साहित्य परिषद आणि आमदार उमाताई खापरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नारी शक्ती महोत्सव' अतिशय उत्साहात पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून समाजकारण, शिक्षण आणि संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्शाचा उल्लेख करत, मोफत व्यावसायिक शिक्षण व 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' यांमुळे महिला स्वावलंबी होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या महोत्सवाचे औचित्य साधून आमदार उमाताई खापरे व ॲड. मोरेश्वर शेडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमित गोरखे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, ॲड. वर्षाताई डहाळे, डॉ. संजीवनी पांडे, सदाशिव खाडे, जयदीप खापरे व प्रवीण तुपे यांच्यासह राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍२९ जुलै २०२६, चिंचवड
#NariShaktiMahotsav #Chinchwad #WomenEmpowerment #PimpriChinchwad #NariShakti
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@umakhaprebjp@ShankarJagtap@AmitGorkhe
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय!
लोकसभेत ‘पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स) सुधारणा विधेयक, २०२६’ मंजूर होणे हा देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणारा आणि परीक्षा व्यवस्थेला अधिक पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह बनविणारा ऐतिहासिक निर्णय आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, मेहनती विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पेपर लीक रॅकेट, परीक्षा माफिया आणि संघटित गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यासाठी हे विधेयक प्रभावी कायदेशीर चौकट निर्माण करते. दोषींवर कडक शिक्षा आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय, याच उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
ही केवळ कायद्यातील सुधारणा नाही, तर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेहनतीचा, गुणवत्तेचा आणि स्वप्नांचा सन्मान करणारे ठोस पाऊल आहे.
तरुणांच्या आकांक्षा, परिश्रम आणि उज्ज्वल भविष्याला सर्वोच्च प्राधान्य देणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
मेहनतीला न्याय, गैरप्रकारांना आळा हाच विकसित भारताचा संकल्प!
#ExamReform2026 #ModiWithYouth #ExamTransparency #YouthPower #ViksitBharat
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
गुरुपौर्णिमेच्या शुभ आणि मंगलमय दिनी आज पुणे येथील श्री लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टच्या मंदिरात जाऊन श्री दत्तात्रेयांचे मनोभावे दर्शन घेतले व पूजा-अर्चा केली.
विश्वगुरू श्री दत्तात्रेयांच्या पवित्र चरणी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी, समाजात सद्भावना, शांती, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली. श्री दत्तात्रेयांची कृपादृष्टी सर्व भक्तांवर अखंड राहो, हीच प्रार्थना!
📍२९ जुलै २०२६ | पुणे
#GuruPurnima #श्रीगुरुदेवदत्त #गुरुपौर्णिमा #Pune #ShriDattatreya
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@PunitBalan5
॥ सद्गुरु श्री शंकर महाराज की जय ॥
आज गुरुपौर्णिमेच्या मंगलमय दिनी पुण्यातील सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरु श्री शंकर महाराज मठात जाऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सद्बुद्धी नांदो, हीच सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पवित्र पालखी सोहळ्यात भोई होण्याचा मान मिळाला. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रसाद सेवेच्या माध्यमातून सेवा करण्याचे भाग्यही लाभले. गुरुकृपेची ही अनुभूती आयुष्यभर प्रेरणा देणारी आहे.
📍२९ जुलै २०२६ | पुणे
#गुरुपौर्णिमा
#GuruPurnima
#सद्गुरुश्रीशंकरमहाराज
#Pune
#पुणे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर 'मानसी-प्रेरणा फाऊंडेशन' एका नव्या रूपात, एका नव्या प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटत आहे.
महिलांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्यासमोरील अडचणी आणि आव्हानांवर मात करण्यासाठी तज्ज्ञांचे हक्काचे मार्गदर्शन मिळवून देणे, हाच या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे. याच हेतूने आपण 'मानसी संवाद' हा विशेष पॉडकास्ट सुरू करत आहोत. हा केवळ एक संवाद नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सक्षमीकरणाचा एक नवा मार्ग असेल!
या पॉडकास्टच्या पहिल्या भागात 'मानसी-प्रेरणा फाउंडेशन'च्या संचालिका आणि योगगुरू मुग्धाताई भागवत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. वस्ती पातळीवर फाउंडेशनने आजवर केलेला खडतर प्रवास आणि 'योगसाधने'मुळे युवती तसेच महिलांच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल, यावर त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे.
मला पूर्ण विश्वास आहे की, आपल्या सर्व माता-भगिनींना या उपक्रमाचा नक्कीच लाभ होईल आणि त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल.
ह्या पहिल्या भागाची लिंक…
https://t.co/Ez2AGnGs7w
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
भारतीय उद्योग क्षेत्राला चालना देणारे महान उद्योजक, भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांनी उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा समतोल साधत राष्ट्रनिर्मितीत दिलेले योगदान भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
#भारतरत्न #जेआरडीटाटा #JRDTata #BharatRatna #TataLegacy #IndianIndustry