Well played #TeamIndia 👏
Formats, places, and dates may change, but the result of #IndvsPak remains consistent.
Congratulations to the entire team.
#T20WorldCup
मराठी भाषेसाठी मी काय काय करू शकतो?
१) मराठी भाषेसाठी काम करत असलेल्या एका तरी संस्थेबरोबर जोडून घेऊन तिथे कार्यकर्ता म्हणून काम करू शकतो, त्यांना फूल ना फूलाची पाकळी आर्थिक मदत देऊ शकतो. त्यांच्या कामात सहभागी होऊ शकतो.
२) महिन्यात एक तरी मराठी पुस्तक विकत घेऊन वाचायचंच असा निश्चय करू शकतो.
३) दरवर्षी भरत असलेल्या साहित्य, नाट्य संमेलनांना उपस्थित राहू शकतो. (जरी तिथली नाटकं, तिथल्या कविता, तिथली भाषणं वाईट असली तरी, कारण आपण जात राहिलो की गुणवत्ताही सुधारत जाईल !)
४) माझ्या घराजवळच्या एका तरी शाळेत जाऊन महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे ती शाळा कुठल्याही बोर्डाची असली तरी तिथे सर्व इयत्तांना मराठी शिकवतात की नाही ते पाहू शकतो आणि शिकवत नसतील तर एक लेखी पत्र देऊन त्याची एक प्रत शिक्षणमंत्र्यांना आणि एक प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देऊ शकतो. तिथल्या मराठी शिक्षणाची गुणवत्ताही तपासण्यासाठी जाणकारांना बरोबर नेऊ शकतो.
५) शाळेत किंवा महाविद्यालयात मराठी शिकवत असलेल्या शिक्षकांना भेटून त्यांचे आभार मानू शकतो, काही मदत लागली तर सांगा असं म्हणू शकतो आणि जमलं तर त्यांचा सत्कार करू शकतो.
६) जिथे सार्वजनिक आस्थापना आहे तिथे जर मराठी पाटी नसेल तर शांतपणे तिथल्या प्रमुखाला तिथली पाटी मराठीत असावी म्हणून एक लेखी पत्र देऊ शकतो आणि त्याच्या दोन प्रती काढून एक प्रत “दुकाने व आस्थापना” नियामक कार्यालयाला आणि एक प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक शाखेकडे देऊ शकतो.
७) बॅंक, विमा किंवा तत्सम कार्यालयात मराठीचा वापर होत नसेल तर तिथेही त्यांच्याशी एकदा तोंडी बोलून, तरीही सुधारणा झाली नाही तर मग लेखी पत्र देऊन त्याची प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे देऊ शकतो. (हे करताना “शासन निर्णय” जोडला तर उत्तम.)
८) माझ्या परिसरात मराठी पुस्तकांचं वाचनालय सुरू करू शकतो. त्या वाचनालयाला पुस्तकं भेट देऊ शकतो. मला सुरू करता येत नसेल तर निदान त्याचा सदस्य होऊ शकतो.
९) माझ्या परिसरात मराठी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकतो, त्यात मुला-मुलींची अस्खलित मराठी बोलण्याची स्पर्धा घेऊ शकतो.
१०) माझ्या भागातील लोकप्रतिनिधींना भेटून “तुम्ही जर मराठी भाषेचा मान ठेवला नाही तर तुम्हाला पुढच्या निवडणुकीत मत देणार नाही” असं सांगू शकतो. हे लेखीही देऊ शकतो. इतरांनीही तसं करावं असा प्रयत्न करू शकतो.
११) माझ्या भागातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना भेटून, किंवा पत्र लिहून तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरा अशी विनंती करू शकतो. सोबत आणखी १० जणांना घेऊन जाऊ शकतो.
१२) एक तरी मराठी वृत्तपत्रं घरात घेऊ शकतो. वृत्तपत्रांची गुणवत्ता खराब असली तरी आपण घेत आहोत म्हटल्यावर त्यांनाही प्रोत्साहन मिळेल.
१३) प्रत्येक ठिकाणी स्वाक्षरी आग्रहानं मराठीत करू शकतो. पूर्वी जर माझी सही बॅंकेत मराठी सोडून वेगळ्या भाषेत असेल तर ती बदलून घेऊ शकतो. धनादेश लिहिताना तो आग्रहानं मराठीतच लिहू शकतो.
१४) एखाद्या इमारतीत, किंवा कार्यालयात जाताना बाहेर नोंदवहीत नोंद करताना ती नोंद मराठीतच करू शकतो.
१५) माझ्या घरात लहान मुलं असतील तर रोज त्यांना मराठीत गोष्ट सांगू शकतो. त्यासाठी गोष्टींची पुस्तकं खरेदी करू शकतो.
१६) सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष त्यांचं भाषण इंग्रजीत वाचून करतात. तसं त्यांनी दोनदा केलं. त्यांना एक पोस्टकार्ड लिहून त्यांना “ह्यापुढे मराठीत भाषण करत चला” असा आग्रह करून ते विधानसभेच्या पत्त्यावर पाठवू शकतो.
१७) सध्या अनेक इमारतींवर किंवा घरांवर लोक स्वत:च्या नावाची पाटी इंग्रजीत लावतात. नाव, आडनाव अस्सल मराठी असतं पण पाटी इंग्रजी असते. ती सगळी आपलीच मराठी माणसं आहेत. त्यांना नम्रपणे विनंती, आवाहन करू शकतो. ते लगेच ऐकणार नाहीत. पण, हळूहळू त्यांच्याशी न भांडता तुमचा आग्रह करत राहू शकतो.
१८) महिन्यात एक तरी मराठी चित्रपट पहायचं ठरवू शकतो. त्या चित्रपटांची गुणवत्ता दर्जेदार नसली तरीही, कारण आपण चित्रपटगृहात मराठी माणसाचा पैसा मराठी चित्रपटामागे उभा करत राहिलो तरच गुणवत्ताही वाढत जाईल.
१९) उपहारगृहात गेलो आणि तिथलं माहितीपुस्तक आणि दरपत्रक मराठीत नसेल तर मराठीचा आग्रह धरू शकतो. नसेल तर कुणालातरी मराठीत भाषांतर करून सांगायला सांगू शकतो. पुढच्या वेळी मराठीत ही पुस्तिका किंवा दरपत्रक नसेल तर मी पुन्हा येणार नाही असं नम्रपणे, हसतमुखानं सांगू शकतो.
२०) सकाळी “गुड मॉर्निंग” किंवा सायंकाळी “गुड इव्हिनिंग” न म्हणता सुंदर आणि गोड मराठीत “सुप्रभात”, किंवा “शुभ-सकाळ” किंवा “शुभ-सायंकाळ” असं म्हणू शकतो.
मी मराठी साठी खूप काही करू शकतो..
जय मराठी ! जय महाराष्ट्र !!
#मराठी #मराठीभाषागौरवदिन #मराठी_भाषा_गौरव_दिन #मराठीदिन #मराठीभाषा #मराठी_भाषा_गौरव_दिवस #महाराष्ट्र
"व्होकल फाॅर लोकल"
आपल्या महाराष्ट्रात असे Hidden Gems भरपूर आहेत फक्त त्यांना प्रोत्साहन द्यायची गरज आहे..
ही कला जिवंत रहावी असे वाटत असेल व शक्य असेल तर वस्तू विकत घ्या.. महाराष्ट्रात कुठेही पोहोचवल्या जातील..
चव्हाण आर्ट्स & गिफ्ट गॅलरी, बीड
9325630314
@iamShantanu_D
Glossary of gender-appropriate terms in the newly-launched handbook by the Supreme Court on combating gender stereotypes
#SupremeCourt#SupremeCourtofIndia#Gender
अजित रानडे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू आहेत. त्यांनी विकसित देशाची तीन साधी, सोपी लक्षणं सांगितली आहेत. म्हटलं आहे :
१) महानगरपालिकेच्या नळाचं पाणी डोळे मिटून पिता येणे.
२) मुलांना घराजवळील महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणे, आणि
३) श्रीमंतांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे..
किती बरोबर आहे हे ! #विकास
बहुत दुःख की बात है की हमारे champions जिन्होंने देश का बड़ा नाम किया है , झंडा लहराया है , हम सबको इतनी ख़ुशियाँ दी हैं, उन्हें आज सड़क पर आना पड़ा है।
बड़ा संवेदनशील मामला है और इसकी निष्पक्ष जाँच होनी चाहिए। उम्मीद है खिलाड़ियों को न्याय मिलेगा।