आठवडा २ | दिवस २
📍विधान भवन
वसईच्या प्रत्येक प्रश्नासाठी माझा आवाज सभागृहात ठामपणे घुमत राहील.
Week 2 | Day 2
Every day in the House is another opportunity to raise the voice of Vasai.
📚 शाळा हस्तांतरित झाल्या… पण निधीचा प्रश्न अजूनही कायम!
११६ शाळांचे भवितव्य आणि हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण अनिश्चित राहू नये, हीच आमची भूमिका.
Education cannot be compromised. This issue deserves immediate attention and action.
#education#school#nocompromise#vasai #snehadubepandit
विकासाची आश्वासने भरपूर… पण प्रत्यक्षात प्रश्न अजूनही कायम!
✅ वसईची ओळख असलेल्या बावखळांच्या संरक्षण आणि पुनर्स्थापनेसाठी निधी नाही.
✅ एमएमआरडीएकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध असूनही भूसंपादनातील दिरंगाईमुळे रस्ते आणि पुलांची कामे रखडली आहेत.
वसईकरांना कारणं नाहीत, तर ठोस कृती हवी आहे.
Promises are plenty, but where is the action?
✅ No funds are being allocated to protect and restore Vasai’s iconic salt pans and wetlands.
✅ Even with thousands of crores available from MMRDA, delays in land acquisition are stalling road and bridge projects.
The people of Vasai deserve solutions, not excuses.
Vasai Development Infrastructure Environment Action
#vasai #environment #mmrda #infra #snehadubepandit
निधी होता… पण काम थांबवलं गेलं!
🏥 आचोळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाकडून ₹२५० कोटींचा निधी मंजूर झाला, तरीही अनावश्यक विलंब आणि चुकीच्या प्रक्रियांमुळे नागरिकांना आजही दर्जेदार आरोग्यसेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
वसईकरांचा हक्काचा रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच ठाम मागणी! ✊
Funds were sanctioned. So why the delay?
🏥 Even after the Government sanctioned ₹250 crore for the Achole Multispeciality Hospital, unnecessary delays and flawed execution of the process have held back the project.
The people of Vasai deserve timely, quality healthcare not endless waiting. Raising this issue and demanding accountability until the hospital becomes a reality.
#Vasai #hospital #healthcareforall #publichealth #snehadubepandit
आरोग्यसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टर बांधव-भगिनींना राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले समर्पण, सेवाभाव आणि मानवतेप्रती असलेली निष्ठा समाजासाठी प्रेरणादायी आहे. निरोगी आणि सशक्त भारताच्या निर्मितीत आपले योगदान अमूल्य आहे.
#doctorsday #care #vasai #SnehaDubePandit
भारताचे माजी उपराष्ट्रपती, ज्येष्ठ राजकारणी मा. श्री. व्यंकय्या नायडू जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपण निरोगी, दीर्घायुषी राहून राष्ट्रसेवेचे कार्य असेच अखंडपणे करत राहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@MVenkaiahNaidu#VenkaiahNaidu#happybirthday#snehadubepandit
देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा असलेल्या आणि आर्थिक शिस्त राखणाऱ्या सर्व चार्टर्ड अकाउंटंट्सना 'चार्टर्ड अकाउंटंट दिना'निमित्त हार्दिक शुभेच्छा!
#CADay#CharteredAccountantsDay#चार्टर्ड_अकाउंटंट
तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. या विशेष प्रसंगी त्यांच्या दीर्घ प्रशासकीय सेवेचा, अमूल्य मार्गदर्शनाचा गौरव करत त्यांचा सस्नेह सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ. मोहितकर यांनी आपल्या कार्यकाळात तंत्रशिक्षण विभागात अनेक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बदल घडवून आणले. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामांमधील पारदर्शकता व गतिमानता आणि तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. त्यांनी दिलेले योगदान विभागाच्या प्रगतीमध्ये अतिशय उपयुक्त ठरेल.
याप्रसंगी डॉ. विनोद मोहितकर यांच्या संपूर्ण परिवारातील सदस्य उपस्थित होते.
📍३० जून २०२६, मुंबई
#DTE #TechnicalEducation #Maharashtra
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
यूपीआय ते डिजीलॉकर; डिजिटल क्रांतीची यशस्वी ११ वर्षे!
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने भारताला एका नव्या डिजिटल युगात नेले आहे. यूपीआय (UPI), डिजीलॉकर, आधार आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) यांसारख्या डिजिटल माध्यमांमुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचे जीवन सुलभ, सुरक्षित आणि सशक्त झाले आहे. भारताची ही डिजिटल यशोगाथा आज संपूर्ण जगासाठी एक आदर्श बनली आहे.
#11yearofdigitalndia #DigitalIndia #NarendraModi #TransformingIndia #MyGov
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार सचिनजी अहिर यांनी विधान भवन, मुंबई येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, मंत्री संजयजी शिरसाट व इतर मान्यवरांसोबत उपस्थित होतो.
📍३० जून २०२६, मुंबई
#Mahayuti #VidhanParishad #VidhanBhavan #उपसभापती #महायुती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@SanjayShirsat77@AhirsachinAhir