मुख्यमंत्री महोदयांनी शब्द पाळला!
महाराष्ट्रातील MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक आणि आशादायी निर्णय!
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भरती प्रक्रियेत पदसंख्या वाढविण्याबाबत दिलेला शब्द पाळत, उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार अतिरिक्त ११ हजारांहून अधिक पदांचा समावेश करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी हा निर्णय हजारो तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.
धन्यवाद देवाभाऊ🙏🏻
@DevendraFadnavis
@mpsc_office@CMOMaharashtra@BJPGaneshBidkar@mohol_murlidhar@RaviDadaChavan@ChDadaPatil@AbhiPawarBJP
आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी माझी सदिच्छा भेट घेऊन आपल्या विविध अडचणी व मागण्या मांडल्या. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा पद्धती ‘ऑब्जेक्टिव्ह’ स्वरूपाचीच व्हावी, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना, प्रशासकीय अधिकारी बनून देशाची व राज्याची सेवा करण्याची त्यांची जिद्द आणि तळमळ प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने आधीच ‘व्ही. राधा समिती’ गठीत करण्यात आली असून सकारात्मक निर्णय घेण्याचे काम सुरू आहे.
आज विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन, विद्यार्थ्यांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री महोदयांची लवकरच भेट घेणार असून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन!
#MPSC #Maharashtra #Studentswelfare #StudentsFirst #MPSCReforms
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@ChDadaPatil@BJP4Maharashtra
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील..✊
एमपीएससी परीक्षा पद्धतीत २०२७ पासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्याच्या मागणीसंदर्भात काल विद्यार्थ्यांनी भेट घेऊन विविध मागण्या व समस्या मांडल्या.
विद्यार्थ्यांची भूमिका मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचवून शासन स्तरावर या विषयाचा पाठपुरावा चालु आहे.
विद्यार्थ्यांचा आवाज योग्य व्यासपीठापर्यंत पोहोचवणे हीच आपली जबाबदारी!
#MPSC
#objective2027
#MPSCStudents #स्पर्धापरीक्षा #विद्यार्थीहित #Maharashtra #चेतनवाघ
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@GaneshBidkarBJP@AbhiPawarBJP@GopichandP_MLA@mpsc_office
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे.
नानांच्या घरी गणपतीला हक्काने जाणं असो किंवा सहज गप्पांसाठी त्यांच्या घरी जाणं असो, अनेक आठवणी आज माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
नाना, तुमच्या आठवणी कायम मनात राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
ॐ शांती!
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत चर्चा केली आणि त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. या चर्चेअंती ठरलेल्या बाबी पुढीलप्रमाणे:
1) एमपीएससी अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्यांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकार, मा. राज्यपाल यांना नाही. मा. राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने तो अधिकार आहे. एमपीएससीचे पूर्व आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्य यांच्याबाबत संविधानाच्या कलम 317 प्रमाणे हटवण्याची कारवाई व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुषंगाने 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर पुढची कारवाई करण्यात येईल.
2) एमपीएससी सचिवांची बदली तत्काळ करण्यात येईल.
3) एमपीएससी परीक्षा ऑफलाईनच होणार. सर्व विद्यार्थी घटकांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही.
4) आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील, इतक्या जागा भरणार. राज्य सरकारमध्ये 30 ते 40 हजार पदोन्नती झालेल्या नव्हत्या. भरती नियमात 1960 पासून नवीन सुधारणा झालेल्या नव्हत्या. त्यामुळे विभागात साधारणतः 30-40% जागा भरण्याची परवानगी दिली जायची. आता 60% विभागांचे ते नियम तयार झाले आहेत, उर्वरित विभागांचे सुद्धा होत आहेत. त्यामुळे पूर्ण जागा भरण्याची तयारी सुरू आहे. 3 जानेवारीच्या गट ‘क’ च्या परीक्षेच्या अनुषंगाने जागावाढीची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली. गट क मध्ये ही वाढ विक्रमी असेल.
5) सिंगल कार्डवर सर्व परीक्षा देता याव्या, अशी यंत्रणा उभारणार. माफक दरात हे कार्ड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिवाय सर्व कागदपत्रे वारंवार द्यावी लागणार नाही, अशी व्यवस्था विकसित करणार
6) आता 3 वर्षांच्या जागा एकदम जाहीर करणार. सेवानिवृत्त होणार्या जागांवर एक वर्ष आधीच भरती प्रक्रियेला सुरुवात करणार. विक्रमी संख्येने जागा भरणार, 1 महिन्यात याचा संपूर्ण कार्यक्रम ठरवणार
7) यानंतर 2 ऑक्टोबरचे आंदोलन विद्यार्थ्यांनी तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा केली.
#MPSC
अजितदादा…
तुमचं असं अकाली जाणं स्वीकारणं अजूनही कठीण आहे.
तुमची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी कायम प्रेरणादायी राहील.
महाराष्ट्राला अजूनही तुमची गरज होती.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ॐ शांती!
भारताची स्टार क्रिकेटपटू,(DSP)रिचा घोष भेट आणि मस्त गप्पा हा खरोखरच अविस्मरणीय क्षण!🏏
खेळातील जिद्द,आत्मविश्वास आणि देशासाठीची जाज्वल्य भावना..
प्रेरणादायी आहे!🙏🇮🇳
स्टार खेळाडू असूनही,मनाने खूप साधी,
देशासाठीची तिची निष्ठा पाहून तिच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला 🇮🇳
@13richaghosh
मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!💐
आपली राष्ट्रसेवा व समर्पणाची वाटचाल जनतेसाठी मार्गदर्शक ठरो.
@CPRGuv@VPIndia#Maharashtra#CPRadhakrishnan#NDA
परवा झालेला माझा वाढदिवस आयुष्यातील एक अविस्मरणीय ठरला.भाजप राष्ट्रीय नेते आणि माझे गुरु आदरणीय श्री.सुनील देवधर जी यांच्या हस्ते वाढदिवस साजरा होणं,हे माझ्यासाठी गौरवाचे आणि भावनिक क्षण होते.
यावेळी साथ लाभली मोठे भाऊ विनय पांडेजी, संतलाल जी आणि संपूर्ण @MyHomeIndia परिवाराची.
भाजपाचे राज्यसभा खासदार, फायरब्रँड प्रवक्ते,प्रभावी वक्ते आणि विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा तार्किक पद्धतीने भांडाफोड करणारे हिंदुत्वनिष्ठ सुधांशू त्रिवेदी यांची सुनील देवधर जी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्वागत केले.आणि विविध विषयांवर चर्चा केली.
@SudhanshuTrived
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त व्याख्यान
*विषय:डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनकार्य आणि प्रेरणा*
*प्रबोधनकर्त्या* :
*कु.रेणुकाताई वाघ*
वेळ: सकाळी ८:०० वाजता
स्थळ: डांगर बु. (महादेव मंदिराजवळ)
"आज शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी माथा टेकत भाजपाचे वरिष्ठ नेते सुनिलजी देवधर यांच्यासोबत दर्शनाचा लाभ घेतला. साईबाबांना मनोभावे प्रार्थना केली की येणारे वर्ष सर्वांसाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. 🙏 #SaiBaba#Shirdi"
शिवनेरीवर उगवलेला 'शिवसूर्य' आम्हांला स्वाभिमान, स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांच्या संरक्षणाची हिंदवी शिकवण देऊन रायगडावर मावळला.असे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन!🙏🚩