It’s been more than 2 days since I sent you my contact no to get in touch but there’s been no response from your end as well. I feel you don’t care about the customers enough.
@ChinmayRemane We’re sorry for causing you an unintended ordeal, Chinmay. We would request you to kindly share your registered contact number via DM so that we can assist you further. Thanks, Nida https://t.co/2G23qpK1Kp
महाराष्ट्रातील ५ राजकीय पक्षांच्या युट्यूब चॅनेलचे मी ॲनालिसीस केले. यातून मला काही गोष्टी समजल्या. त्या या थ्रेडच्या माध्यमातून मांडत आहे.
थ्रेड👇
#म#मराठी
युट्यूब थंबनेल हॅक- ❤️🫢🎈
ऑडियन्सला तुम्ही 'प्रोडक्ट काय देताय' यापेक्षा 'फायदे काय देताय' यात रस असतो. तुमचे युट्यूब थंबनेल जर मुल्य अर्थात Values वर बोलत असेल तर लोकांचा क्लिक करण्याचा रेट हा जास्त राहिल. परंतू समजा तुम्ही सतत काहीतरी माहिती देताय किंवा काही तुमचं थंबनेलमध्ये एंड प्रोडक्टबद्ल बोलतं असेल तर क्लिक नावाची गोष्ट काम करणार नाही.
उदाहरण १-
१. परदेशात एमबीए केलेला नचीकेत महिन्याला कमावतो १० लाख रुपये
२. परदेशात एमबीए केलेला नचीकेत कसं कमावतोय महिन्याला १० लाख
दोन वाक्य तुम्हाला जवळपास सारखी वाटतील. परंतू पहिलं वाक्य एकप्रकारे तुम्हाला प्रोडक्ट दिल्यासारखं करतंय, किंवा थेट एंड प्रोडक्ट किंवा आऊटुुट सांगतंय. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकं ते क्लिक करणार नाहीत. कारण हे त्यांच्यासाठी कॉमन आहे.
परंतू दुसरं वाक्य नीट पाहा. यात लोकांना क्लिक करण्यासाठी थंबनेल भाग पाडेल. कारण यात तुम्ही प्रोसेस सांगत आहात. १० लाख कमवा सांगणारी थंबनेल त्यांच्यासमोर रोज येतात. परंतू ते कसे कमवायचे हे सांगणारे थंबनेल फार कमी वेळा येतात. दुसऱ्या थंबनेलमध्ये तुम्ही लोकांना मुल्य सांगताय किंवा प्रोसेस सांगताय. याचा खूप चांगला परिणाम क्लिक्सवर होऊ शकतो. पुढचं उदाहरण देखील असंच काहीसं आहे.
उदाहण २-
१. XYZ, जगातील सर्वोत्तम मराठी पुस्तक
2. XYZ, मराठी माणसाला यशाची १००% हमी देणारं पुस्तक
#YouTube #Marathi #म #मराठी
@WhatsApp अनेक युझर्स गेली अनेक वर्ष या फिचरची मागणी करत होते. आता या फिचरमधून युझर मेसेज केल्यानंतर पहिल्या १५ मिनीटात तो एडिट करु शकतात. तसेच काही चुकिची माहिती गेली असेल तर ती करेक्ट करु शकतात. #मराठी#म#WhatsApp
इंस्टंट मेसेजिंग ॲप @WhatsApp ने मेसेज एडिट करण्याचे फिचर फायनली लॉंच केले आहे. आयओएस व ॲंड्राईड अशा दोनही ओएसवर युझर्स हे फिचर वापरु शकतात. #मराठी#म#WhatsApp
गेल्या २ महिन्यात मी ४-५ ट्विटर हॅंडल्सचे ट्विट नियमीतपणे पाहातो. या हॅंडलवरील कंटेंट मला पर्सनली आवडतो.
@RohanMagdum7- रोहनचे आयटी क्षेत्र व त्यातील जॉब यावरचे थ्रेड्स छान असतात.
@Atarangi_Kp- या हॅंडलवर सरकारी योजना आणि इतर माहिती देणारे मराठीतील भन्नाट थ्रेड्स असतात.
@nprashant- लेह-लडाख व हॉटेल इंडस्ट्री यावर अनेक थ्रेड्स या हॅंडलवर पाहायला मिळतात.
@SJanwale- या हॅंडलवर फिटनेस संबंधी व्हिडीओ पोस्ट केलेले असतात. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे व्यायाम जीममध्येही न जाताही करु शकतो.
#म #मराठी #fitness #ITjobs #ladakh #Marathi
युट्यूब🎈 व्हिडीओची साऊंड क्वॉलीटी वाढविण्यासाठी
ज्या जागेत कमी इको येतो अशा ठिकाणी शुट करा.
इलेक्टॉनिक्स गोष्टी बंद करा. जसं की फोन
शक्य असेल तर एक्टर्नल माईक वापरा.
#YT#YouTube#म#मराठी#Shorts
कोणत्याही युट्यूबर🎈 किंवा कंटेंट क्रेअटरने या ५ चुका टाळायला हव्यात...
१. यश मिळत नसाताना खूप लवकर आटोपतं घेणं
२. खूप ठिकठाक टायटल, थंबनेल देणे
३. लोकांचा इंटरेस्ट नसलेल्या विषयावर व्हिडीओ बनवणे
४. फक्त ॲड रेव्हेन्यू किंवा एकाच गोष्टीच्या इनकमवर अवलंबून राहाणे
५. गरजेच्या गोष्टींवर खर्च न करणे
रजिस्ट्रेशन लिंक- https://t.co/J81QcsII1Q
#मराठी #म #कंटेंट #युट्यूब #YouTube #YT #Shorts #Reels
इंस्टाग्रामवरुन देशातील १० टॉप टेन क्रेअटर्स काढून टाका. कुणाच्याही लवकर लक्षात येणार नाही.
युट्यूबवरुन देशातील १० टॉप टेन क्रेअटर्स काढून टाका. सगळ्यांना सहज नोटीस होईल.
हाच युट्यूब व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फरक आहे.
#म#मराठी#युट्यूब#YT#YouTube#Shorts
युट्यूब 🎈 प्लॅटफॉर्मबद्दलचे काही धक्कादाय आकडे...
-९० टक्के युट्यूब चॅनेल कधीही १० हजार सबस्क्राईबर्सचा टप्पाही गाठत नाहीत.
-केवळ १० टक्के युट्यूब चॅनेल हे युट्यूब पार्टनर प्रोग्रामला पात्र ठरतात.
-जगात केवळ ४ लाख चॅनेलला आजपर्यंत 'प्ले बटन' मिळालं आहे.
-२०२० सालापर्यंत युट्यूबवरील ८८ टक्के व्हिडीओला १ हजारपेक्षा कमी व्हुव्ज होते.
-२०२३ सालापर्यंत जगातील ४० हजारपेक्षा कमी चॅनेलला १ मिलीयन सबस्क्राईबर्स आहेत.
-जगातील फक्त १५०० चॅनेलला १० मिलीयनपेक्षा जास्त सबस्क्राईबर्स आहेत.
-युट्यूबवरील ६० टक्के कंटेंट हा इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केला जातो.
-युझर्स जो कंटेंट पाहातात, त्यातील ७० टक्के कंटेंट हा अल्गोरिदमने दाखविलेला असतो.
#म #मराठी #युट्यूब #YT #YouTube #Shorts
युट्यूबने🎈 त्यांचा रेव्हेन्यू टॅब रिस्ट्रक्चर केला आहे. यात तुम्ही कोणत्या प्रकारातून किती पैसे कमावले याचा तपशील येतो. अगदी काल-परवापर्यंत रेव्हेन्यू टॅबला फक्त एकूण रेव्हेन्यू दिसत होता. परंतू आता तुमचा रेव्हेन्यू लॉंग व्हिडीओ ॲड्स, शॉर्ट्स, मेंबरशीप, सुपर चॅट/थॅंक्स यापैकी कशातून किती आलाय हे देखील समजतंय.
नमस्कार युट्यूब कोर्स रजिस्ट्रेशन- https://t.co/9uvkq3BuM8
#म #मराठी #युट्यूब #Youtube #YT #Shorts #Reels