22 Feb सुबह 5 बजे गणेश मूर्ति नगर पार्ट नंबर 3, गल्ली नंबर 4 में भयानक आग लग ने से 3 घर जल कर राख हो गए ईश्वर किरपा से किसी को कोई भी नुकसान नहीं हुआ । मगर सोचने की ये बात है कि रोड पर सब्जी ठेले के कारण फायर ब्रिगेड कि गाड़ी को आने में बहुत परेशानी का सामना करना पड़ा।
आज खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा यशस्वीरित्या पार पडला. या बैठकीत पक्ष वाढ आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती यावर विस्तृत चर्चा झाली.
याप्रसंगी श्री. शरद शिगवण, श्री. पांडुरंग पाष्टे, श्री. अनंत निकम, श्री. अवधूत म्हसकर, श्री. ईशान म्हापदी, श्री. महमद कारभारी, श्री. रजनीकांत धोत्रे, श्री. अजित जाधव, श्री. फराज नाडकर, श्री. काशिफ नाडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे पक्षाला मोठे बळ मिळाले.
आजच्या बैठकीत संघटनेच्या विविध स्तरांवर अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
श्री. प्रकाश शिगवान, जिल्हा उपाध्यक्ष
सौ. संजना बुरटे, खेड महिला कार्याध्यक्ष
श्री. अनिल सदरे, खेड शहरअध्यक्ष
श्री. रजनीकांत धोत्रे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष.
या बैठकीसाठी श्री. बाबाजीराव जाधव, सौ. साधनाताई बोत्रे , श्री. अजय बिरवटकर , श्री. सतू कदम, श्री. संजय जाधव, श्री. जयवंत जालगावकर, श्री. शोकात मुकादम व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज सुतारवाडी, जि. रायगड येथे दापोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष समद अलीमिया मांडलेकर, मुनिम मुकादम, अश्फाक अलिमिया मांडलेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष लुकमान कादिर चिखलकर उपस्थित होते.
१ वर्ष महिला सक्षमीकरणाचे..
१ वर्ष सामाजिक बदलाचे..
१ वर्ष लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे !
दिनांक २९ जून २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" जाहीर करून महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची ज्योत पेटवली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आजही या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू आहे, आज या योजनेची वर्षपूर्ती होत आहे.
या एक वर्षात मी महाराष्ट्रात गावोगावी गेले, अनेक लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला. त्या संवादातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने लाडक्या बहिणींना किती मोठा आधार दिला आहे याची जाणीव झाली. कोणी या रकमेतून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे, कोणी सन्माननिधीतून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे, तर अनेक ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येत मोठी आर्थिक ताकद उभी केली आहे. या सर्व यशोगाथा ऐकताना नेहमीच उर अभिमानाने भरून येतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची, महिला सक्षमीकरणाची ही ज्योत गावोगावी, घरोघरी नेण्याची संधी मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली ही आमच्यासाठी खरोखर अभिमानाची बाब आहे. ही यशोगाथा लिहिण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व या यशाच्या खऱ्या नायिका असलेल्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार !
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना #WomenEmpowerment #OneYearofMMLBYojana
आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासकीय कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला, तसेच जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, विविध विभागांचे अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान, स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध समस्या व प्रश्न मांडले. यातील काही समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात आला आणि अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. उर्वरित समस्या आणि प्रश्न समजून घेत, ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
आज अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीत 'राजू मगर चॅरिटेबल ट्रस्ट'च्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. हा उपक्रम केवळ एक सेवा नाही, तर ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी देणारे एक महत्वाचे पाऊल आहे. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून निश्चित करण्यात आलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आपल्या अन्न, नागरी पुरवठाव व ग्राहक संरक्षण विभागाची आज बैठक घेतली. या बैठकीत योजनांचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. बैठकीला विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंगल यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण प्रशासन व्यवस्थेत स्पर्धात्मक सुधारणेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या धोरणानुसार १०० दिवसांच्या यशस्वी प्रशासन सुधारणा मोहिमेनंतर, १५० दिवसांचा कार्यक्रम महायुती सरकारकडून हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत "विकसित महाराष्ट्र-२०४७" चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे, "ई गव्हर्नन्स सुधारणा" तसेच "सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने सेवाकर्मी कार्यक्रम" राबविला जात आहे. यामध्ये प्रत्येक शासकीय विभाग त्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कामगिरीवर आधारित मूल्यांकन होणार आहे.
या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमातून राज्याच्या प्रगतीसाठी उद्दिष्ट निर्धारित करण्यासंदर्भात सर्वंकष नियोजनासंदर्भात बैठक घेतली.
#Maharashtra2047 #DevendraFadnavis #GoodGovernance #DigitalIndia #EGovernance #PublicServiceReform #VisionDocument #TransformingMaharashtra #Mahagovernment #CitizenCentricGovernance #SmartAdministration #GovernanceGoals #ProgressiveMaharashtra #Mission150Days
उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!
राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा आज सविस्तर आढावा आयोजित बैठकीत घेतला. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये भाड्याच्या जागांवर न राहता स्वमालकीच्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी, यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून इमारतींच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात यावं. राज्यात ज्या ठिकाणी विकासकामं सुरु आहेत, त्याठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, त्यादृष्टीनं कामांचं, वाहतुकीचं नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीनं कामं पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत दिले. तसंच मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाची असणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वेच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या.
पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, पुणे मेट्रो १ व २ मार्गिकेच्या कामाचा आढावा घेतला. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी किनारा महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. याचबरोबर लोणावळा येथील स्कायवॉक आणि टायगर पॉईंट विकास, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचं बांधकाम, औंध-पुणे येथील नियोजित एम्स हॉस्पिटल, रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर विकास, मुंबई येथील रेडीओ क्लब जेट्टी, नेरळ-शिरुर-कर्जत रस्ता, सातारा सैनिक स्कूल, परळी (जि. बीड) येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय, पुरंदर विमानतळ, बारामती विमानतळ, बीड विमानतळ, पुणे येथील कृषीभवन, ऑलिम्पिक भवन, कामगार कल्याण भवन, नगररचना भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, पुणे येथील वीर लहूजी वस्ताद स्मारक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू आणि तुळापूर येथील स्मारक, फुलेवाडा स्मारक आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.
‘ई-मंत्रिमंडळ’ बैठकीद्वारे डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल!
आज राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ‘ई - मंत्रिमंडळ : कागदविरहित भविष्यासाठी एक पाऊल’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्याची पहिली पूर्णपणे डिजिटल मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सदस्यांसह या ऐतिहासिक ‘ई-मंत्रिमंडळ’ बैठकीला उपस्थित होतो.
या उपक्रमामुळे निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि गती येणार असून, हे डिजिटल परिवर्तन हरित आणि पेपरलेस गव्हर्नन्सच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘डिजिटल इंडिया’च्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेला ‘ई-मंत्रिमंडळ’ उपक्रम म्हणजे प्रशासनाला दिलेली आधुनिकतेची आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची जोड आहे.
अशा प्रकारच्या बैठकांमुळे हजारो कागदांची बचत, पर्यावरण संरक्षणात थेट सहभाग आणि निर्णय प्रक्रियेतील अचूकता यांची शाश्वती निर्माण होणार आहे. नियोजन, अंमलबजावणी आणि परीक्षण या सगळ्या टप्प्यांना एका सुसंगत डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणणारा हा उपक्रम म्हणजे भविष्यातील पर्यावरणपूरक व हरित महाराष्ट्राच्या स्वप्नाची पायाभरणी ठरणार आहे.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#DigitalGovernance #PaperlessCabinet
#GreenMaharashtra #DigitalIndia #Egovernance #SustainableFuture
राज्यात ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारणीच्या कामाचा आढावा आज आयोजित बैठकीत घेतला. राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशिक्षण मिळावं, यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ केंद्र उभारण्यात यावेत. त्या दृष्टीनं तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत दिले.
राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळावं, त्यांच्यामध्ये कौशल्यवृद्धी होऊन ते रोजगारक्षम व्हावेत, यासाठी कोणतीही तडजोड करु नये. त्याकरता राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारण्यात यावं. राज्यात सध्या दहा ठिकाणी ‘सीट्रीपलआयटी’ केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. राज्यातील उर्वरित २६ जिल्ह्यांमध्येही केंद्रे उभारण्यासाठी टाटा कंपनीशी आवश्यक तो समन्वय साधून कार्यवाही तातडीनं करण्यात यावी. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी हजारो युवकांना ‘एआय’, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मशीन लर्निंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण मिळणार आहे.
या प्रकल्पांमुळे राज्यात उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरणाची पायाभरणी होणार आहे. युवकांचे कौशल्यवर्धन, रोजगार व स्वयंरोजगारासाठी यामुळे मोठी चालना मिळणार आहे. या केंद्रांसाठी आवश्यक असणारी जागा ‘एमआयडीसी’नं द्यावी, त्याचप्रमाणे केंद्राची जागा निवडताना ती शहराच्या जवळ असावी, प्रशिक्षार्थींना सोयीची असावी, याची काळजी घेण्यात यावी. या केंद्रासाठी आवश्यक असणारा १५ टक्के निधी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत देण्यात येईल. याचबरोबर रायगड जिल्ह्यातील ‘सीट्रिपलआयटी’ केंद्रासाठी ‘एमआयडीसी’मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी सूचना बैठकीत केली.
आज राहुरी, जि. अहिल्यानगर येथील डॉ. बाबुराव बापूजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अरुण तनपुरे व युवा नेते मा. श्री. हर्ष अरुण तनपुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी मा.अजितदादांनी या नवीन सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मा.आ.श्री. काशिनाथ दाते तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
📍उंदीरवाडी, ता. येवला । सवित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल सदिच्छा भेट
आज प्रवासादरम्यान उंदीरवाडी येथील सवित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल या विद्यालयाला सदिच्छा भेट देण्याचा योग आला. याप्रसंगी या शिक्षणसंस्थेचे संचालक व ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर यांनी सपत्नीक अतिशय आपुलकीने स्वागत केले. तसेच शाळेतील विद्यार्थी मित्र-मैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
#yeola #maharashtra #chhaganbhujbal
आज जे.पी नगर प्राथमिक व खडकवासला पुणे महानगरपालिका शाळा या दोन्ही शाळांना भेटी देत तेथील व्यवस्थापनाची महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पवार यांच्या समवेत पाहणी केली.
यावेळी शाळेतील अपुरी शिक्षक संख्या, शाळेच्या विद्युत विषयक कामांची दुरुस्ती प्रलंबित असणे, शाळेचे विज बिल न भरल्यामुळे शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, शाळेत शौचालय व्यवस्थित नसणे, संरक्षण भिंत नसणे यांसारख्या गंभीर बाबी या पाहणीमध्ये निदर्शनास आल्या आहेत.याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन या कामांना प्राथमिकता देत शाळेची ही सर्व कामे तात्काळ करण्यास सांगितले.
आपल्या देशाचे भवितव्य असणाऱ्या या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठलीही कमी राहता कामा नये, या शाळांचा गुणवत्ता, व्यवस्थापन व सुरक्षेच्या बाबतीत कुठलाही निष्काळजीपणा होऊ नये ,याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी असे यावेळी सूचित केले.
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री,तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे जिल्हा संपर्क मंत्री आदितीताई तटकरे,मुख्य प्रवक्ते श्री.आनंद परांजपे साहेब यांच्या उपस्थितीत काल नेरूळ, नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सचिव मा. श्री. अश्विन अभय अघमकर यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
तसेच रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री. मकरंद कांबळे, रिपब्लिकन सेना मुंबई अध्यक्ष मा. श्रीमती सुनिता डोळस, नवी मुंबई काँग्रेसचे सचिव मा. श्री. फहाद अन्सारी, उलवे भाजप शहराध्यक्ष मा. श्री. आदेशकुमार सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनेचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
संवादातून समाधानाकडे!
मंचर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारामध्ये नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेतल्या. काही तातडीच्या समस्या संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्वरित मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
मंचरसह आंबेगाव शिरूरकरांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असणार आहे.
आज NSDC इंटरनॅशनल स्किल सेंटर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथे Femina Flaunt Academy या आधुनिक प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिले.
ही संस्था युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देत, त्यांना करिअरच्या नव्या संधीकडे मार्गदर्शन करणार आहे. हा उपक्रम निश्चितच भविष्य घडवणारा ठरेल.
युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी अशा संस्थांची आवश्यकता आहे आणि Femina Flaunt Academy हे काम नक्कीच प्रेरणादायक ठरेल. या संधीसाठी यशस्वी ग्रुप आणि NSDC चे मन:पूर्वक आभार! हे पाऊल निश्चितच युवकांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व खासदार व आमदार यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी लाभली.
या प्रसंगी पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते मा. आदित्यसाहेब ठाकरे, तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थिती होते. पक्षाच्या एकतेचा, संवादाचा व ऊर्जा वाढवणारा हा प्रसंग प्रेरणादायी ठरला.
#ShivsenaUBT
आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या (@ybchavancentre) वतीने आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्याला उपस्थित राहिले. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. श्यामल गरुड यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', गडचिरोली येथील मनिषा सजनपवार यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', रायगड येथील उल्काताई महाजन यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान', मुंबई येथील अलका धुपकर यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान', धाराशिव येथील कमल कुंभार यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान' तर अहिल्यानगर येथील डाॅ. शबनम शेख यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान' या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व उपस्थितांशी संवाद साधला.
National IVF Summit & Awards Ceremony | A Celebration of Science, Hope & Parenthood
IVF technology has truly been a blessing for humanity bringing the joy of motherhood to countless women and breathing new life into families. The efforts of Voice of Healthcare and the Indian Fertility Society in advancing this life-changing technology are both commendable and invaluable.
It was an honour to attend the 2nd National IVF Summit & Awards held in Mumbai and to extend heartfelt gratitude to the many medical experts dedicated to this cause.
During the event, I emphasized the need to extend IVF awareness beyond urban and semi-urban regions into rural areas, where knowledge and access remain limited. IVF must not remain confined to science alone it must become a tool of hope for aspiring parents.
#IVFSummit #VoiceofHealthcare
क्रिकेट खेळणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मुला-मुलींना @MahaCricket च्या वतीने हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आम्ही ॲपेक्स बॉडीने प्रयत्न केलाय… त्यानुसार @mpltournament चं यंदा सलग तिसरं सत्र यशस्वी झालं असून आज सायंकाळी ५.३० वा. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर #फायनल मॅच होत आहे. या मॅचची संपूर्ण तयारी झाली असून आज साक्षात सूर्यनारायणही आशीर्वाद द्यायला उपस्थित राहिले आहेत..
त्यामुळं मंडळी यावंच लागतंय बरं का!
शिवाय हेलियम शो, लाईट शो आणि इतरही मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घ्या..!
#Free_Entry
#MPL
#MahaCricket
#महाराष्ट्राचामहासंग्राम