शासकीय सेवा होणार अधिक सुलभ, वेगवान आणि लोकाभिमुख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग टप्प्याची आढावा बैठक पार पडली.
शासकीय सेवा सुलभ, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनीअरिंग - जीपीआर) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या प्रक्रियेला गती देऊन शासकीय सेवा व योजनांमधील अनावश्यक टप्पे, कागदपत्रे आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी सर्व विभागांनी आपल्या सेवांचे पुनरावलोकन करून त्या जीपीआर प्रक्रियेच्या कक्षेत आणाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शासकीय सेवांच्या संख्येऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 1222 सेवांचे पुनरावलोकन करून लोकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या 723 सेवा तयार करण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात संपूर्ण इंटिग्रेशन झाल्यानंतर अनेक सेवा एकत्रित होऊन ही संख्या आणखी कमी होईल. त्याअंतर्गत राज्यातील नागरिकांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी ‘आपले सरकार 2.0’ पोर्टलमधील सेवा पुनर्रचना प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ही प्रक्रिया 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून नागरिकांना या नव्या बदलांचा अनुभव 15 ऑगस्ट 2026 रोजी देण्याचा संकल्प असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बदलत्या काळानुसार सरकारी प्रक्रियांमध्ये अधिक कार्यक्षमता आणि सुलभता आणणे आवश्यक असून प्रक्रिया अधिक सोपी, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी ‘जीपीआर’द्वारे या प्रक्रियांची पुनर्रचना केल्यामुळे नागरिकांबरोबरच प्रशासनाच्या कामातही सुलभता निर्माण होणार आहे. यापूर्वी ‘स्वयंप्रमाणपत्रा’मुळे अनावश्यक प्रमाणपत्रे आणि शिक्कामोर्तबाच्या प्रक्रिया वगळल्याने नागरिकांचा वेळ वाचला असून जबाबदारीही थेट संबंधित व्यक्तीवर आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. प्रक्रिया सुलभ करताना विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून कामाचे परीक्षण करावे. आवश्यक तेथे टप्पे कमी करावेत आणि प्रक्रियांना अधिक गती द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
महसूल विभागाने त्यांच्या विविध सेवांचे सुलभीकरण करण्यात आघाडी घेतली आहे. लोकांशी थेट संपर्क असलेला विभाग म्हणून महसूल विभागाचे परिवर्तन म्हणजे शासनाच्या एकूण परिवर्तनाच्या 40 ते 50 टक्के कामाची पूर्तता होय. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा वितरण व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध प्रयोग सुरू असले तरी त्यासाठी एकसमान आणि मजबूत प्रणाली तयार करण्याची गरज आहे, त्यासाठी सक्षम रचना विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
‘पब्लिक ॲप’सारख्या हायपरलोकल डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या सकारात्मक कामांची प्रभावी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने या माध्यमांचा वापर करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
यावेळी गेट्स फाउंडेशनच्या इंडिया ऑफिस डायरेक्टर, अर्चना व्यास, गेट्स फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर - पॉलिसी, कम्युनिकेशन्स अँड फिलान्थ्रॉपिक पार्टनरशिप्स, अर्णव कपूर, 'समग्र'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, गौरव गोयल, ग्रुप प्रेसिडेंट (स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग ॲट इनशॉर्ट्स) जॉय बांदेकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@archnavyas@BMGFIndia@inshorts
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance #GPR
Sharing my full speech at the Medical Conclave-'PULSE 2026' Curtain Raiser, a dedicated health sector platform designed to bring together industry leaders, academia, on a unified forum to deliberate, collaborate, and develop innovative solutions for accessible, affordable, and modern healthcare.
(Mumbai | 4-3-2026)
#Maharashtra #Mumbai #Pulse2026
🔸CM Devendra Fadnavis at the Medical Conclave – ‘PULSE 2026’ Curtain Raiser. The website of the ‘PULSE Global Medical Conference’ was launched on the occasion.
MoS Madhuri Misal, actress Soha Ali Khan and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेडिकल कॉन्क्लेव्ह - 'पल्स 2026' कर्टन रेझर प्रसंगी प्रमुख उपस्थिती. यावेळी ‘PULSE Global Medical Conference’च्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अभिनेत्री सोहा अली खान व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी मेडिकल कॉन्क्लेव - 'पल्स 2026' के कर्टन रेझर में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर ‘PULSE Global Medical Conference’ की वेबसाईट का शुभारंभ किया।
इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल, अभिनेत्री सोहा अली खान एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕑 1.50pm | 4-3-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.५० वा. | ४-३-२०२६📍विधान भवन, मुंबई.
@Dev_Fadnavis@madhurimisal
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #Pulse2026
The Maharashtra Government is coordinating with the Central Government to ensure all necessary steps are taken to bring back Indians stranded in the war-like situation.
युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे.
(विधानपरिषद, मुंबई | दि.4 मार्च 2026)
#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026
महाराष्ट्र पर निवेशकों का बढ़ता भरोसा, मुंबई को सर्कुलर इकोनॉमी का मॉडल बनाना, 5 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी की ओर बढ़ते कदम समेत विभिन्न मुद्दों पर NDTV के साथ संवाद...
(दावोस, स्विट्ज़रलैंड | 21-1-2026)
@ndtvindia#WEF26#MahaAtDavos
Maharashtra @ Davos 2026
🤝 Strategic MoU Signed between Govt of Maharashtra (MMRDA) & University of California, Berkeley
This 5-year partnership fosters academic and research collaboration to strengthen metropolitan planning and urban transformation in the MMR.
Key focus areas include Data Analytics, Artificial Intelligence (AI), and Policy Innovation to support a sustainable, circular economy. The collaboration will drive innovation through joint research, hackathons, and accelerator programs.
@Dev_Fadnavis
#WEF26 #MahaAtDavos #UrbanTransformation #AI #Education
#अभिमानास्पद#छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश. महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश.
ऐतिहासिक !
अभिमानास्पद !!
गौरवशाली क्षण !!!
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना
महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा !!!!
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन...
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे.
हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले.
सर्वप्रथम मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.
॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी।।
देवशयनी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज पंढरपूर येथे हरिनामाच्या गजरात पत्नी अमृता व वारकरी बंधू भगिनींसमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला... यावेळी आमची कन्या दिवीजा ही देखील उपस्थित होती.
#Maharashtra#AashadhiEkadashi#Pandharpur
चला, #FakeNews विरोधातील लढा एकत्रितपणे जिंकूया!
माहिती जबाबदारीपूर्वक सामायिक करा, राष्ट्रीय सुरक्षेला सहकार्य करा. कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास #PIBFactCheck कडे तक्रार करा
अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क करा
WhatsApp: +91 8799711259
ईमेल: [email protected]
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर, उद्या दि. 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
उद्यासाठीच आणखी एक विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असून, त्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार होते आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार आहे.
@Dev_Fadnavis@mohol_murlidhar
#Pahalgam
हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी की डॉक्टरांचा गल्ला भरोसाठी!!!
सध्या डॉक्टर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा विसरले... कारण काहींची लायकी नसताना एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस होण्यासाठी एवढा पैसा ओततात की पुन्हा तो वसूल करण्यासाठी हे प्रकार डॉक्टरला करावे लागत असावेत. काही डॉक्टर अजूनही देवच आहेत
(काही डॉक्टर अपवाद) यावरही उपाय काढायला हवा.... प्रत्येक ठिकाणी सीझरला वेगळा दर कसा काय... गुंतागुंतीची, धोक्याची असेल तर ठीक आहे... मात्र 25, 35, 40, 50, 80, एक लाख, दीड लाख, तीन लाख, पाच लाखही घेतले जाते... अशा किमतीवर बंधन हवेच.