निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी...🌺
आज वर्षा निवासस्थानी कुटुंबीयांसोबत लाडक्या गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले.
गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या भक्तीत रमलेले मन आज निरोपाच्या क्षणी भरून आले. पण बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग नाही, तर नव्या आशा, नव्या संकल्पांसह पुढे जाण्याचा एक नवा आरंभ आहे.
बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहोत, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर होवोत, हीच मनोभावे प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏
#Maharashtra #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya
Empowering our Mathadi Workers
Delighted to be present at the launch of the Wadala Mathadi Housing Project, the distribution ceremony of Gunwant Kamgar Awards and Bhavya Melava of Mathadi Workers, organised on the occasion of the 93rd birth anniversary of the visionary founder of the Akhil Bharatiya Maratha Mahasangh & prominent Mathadi Leader Late Anna Saheb Patil, in Navi Mumbai today.
Heartfelt tribute to Late Annasaheb Patil, whose lifelong service to the underprivileged and working class strengthened the Mathadi movement and led to the historic Mathadi Act, bringing dignity, safety and social security to thousands of workers.
The Wadala Mathadi Housing Project launched today will provide modern homes to around 3000 workers, while the Vashi APMC Market will be redeveloped to global standards, creating sustainable opportunities for Mathadi workers. Dedicated schemes for higher education and skill development through the Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal and SARTHI will further empower workers’ children, with dedicated support from the Maharashtra Government.
Minister Ganesh Naik ji, Minister Jaykumar Rawal, MLC Niranjan Davkhare, MLA Mandatai Mhatre, President of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Narendra Patil, Navi Mumbai Mayor Sujatatai Patil and other dignitaries were present.
@NaikSpeaks@JaykumarRawal@niranjandtweets@MlaMandaMhatre@NarendraMathadi@SujataP88512
#Maharashtra #NaviMumbai #MathadiKamgar
🔸CM Devendra Fadnavis at the launch of the Wadala Mathadi Housing Project, the distribution ceremony of Gunwant Kamgar Awards and Bhavya Melava of Mathadi Workers organised on the occasion of the 93rd birth anniversary of great leader Late Anna Saheb Patil.
Minister Ganesh Naik, Minister Jaykumar Rawal, MLC Niranjan Davkhare, MLA Manda Mhatre, President of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Narendra Patil, Navi Mumbai Mayor Sujata Patil and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वडाळा माथाडी घरकुल प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा, गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ व माथाडी कामगारांचा भव्य मेळावा.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील इनकी 93वीं जयंती के अवसर पर वडाला माथाडी आवास परियोजना के शुभारंभ की घोषणा, गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारोह एवं माथाडी कामगारों का भव्य सम्मेलन।
इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, विधायक निरंजन डावखरे, विधायक मंदा म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडल के अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबई की महापौर सुजाता पाटील एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕙10am | 25-9-2026📍Navi Mumbai | स. १० वा. | २५-९-२०२६📍नवी मुंबई.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@JaykumarRawal@niranjandtweets@MlaMandaMhatre@NarendraMathadi@SujataP88512
#Maharashtra #DevendraFadnavis #MathadiKamgar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई येथे आमदार निरंजन डावखरे यांनी अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis@niranjandtweets#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई येथे नगरसेवक भरत चव्हाण यांनी अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis#Maharashtra#DevendraFadnavis #CMReliefFund
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धिताय।
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥🌺
दिवस १२वा अनंत चतुर्दशीचा...
वर्षा निवासस्थानी आज सहकुटुंब श्री गणरायाची आरती केली. बाप्पांच्या सानिध्यात गेलेले हे अकरा दिवस आनंद, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले होते. हे दिवस कसे सरले, ते कळलेच नाही. यावेळी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर व्हावीत, प्रत्येकाच्या घरात सुख, समाधान आणि आनंद नांदावा आणि पुढील वर्षी बाप्पांनी आनंदमय वातावरणात लवकर यावे अशी प्रार्थना केली.
#Maharashtra #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya
🌺 Hon Union Minister Piyush Goyal ji took darshan and sought blessings of Bhagwan Shri Ganesha at our official residence 'Varsha' in Mumbai. Offered prayers for the happiness and prosperity of our people.
🌺 मा. केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांनी आज आमच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थान 'वर्षा' येथे भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आरती केली आणि आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी श्री गजाननाकडे सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🌺 मा. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी इन्होंने आज हमारे मुंबई स्थित सरकारी आवास ‘वर्षा’ पर भेंट देकर गणपति बाप्पा के भक्तिभाव से दर्शन कर आरती की एवं आशीर्वाद प्राप्त किए। इस अवसर पर श्री गजानन से सभी के सुख, शांति और समृद्धि की कामना की।
@PiyushGoyal
#Maharashtra #GanpatiBappaMorya #Ganeshotsav
वडाळा येथे माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळणार...
वडाला में माथाडी मज़दूरों को उनके हक के घर मिलेंगे...
(माथाडी कामगारांचा भव्य मेळावा | नवी मुंबई | 25-9-2026)
#Maharashtra#NaviMumbai#MathadiKamgar
LIVE | मराठा क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त आयोजित 'गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ व माथाडी कामगारांचा भव्य मेळावा'
🕚 स. १०.५६ वा. | २५-९-२०२६ 📍नवी मुंबई.
#Maharashtra#NaviMumbai#MathadiKamgar https://t.co/iTw4U1TsNa
स्व. अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने राज्य सरकार सातत्याने काम करत आहे.
स्व. अण्णासाहेब पाटील इनके सपने को साकार करने की दिशा में राज्य सरकार निरंतर कार्य कर रही है।
(माथाडी कामगारांचा भव्य मेळावा | नवी मुंबई | 25-9-2026)
#Maharashtra#NaviMumbai #MathadiKamgar
माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी सरकार कटिबद्ध!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यास प्रमुख उपस्थिती दर्शवली, यावेळी त्यांनी वडाळा माथाडी घरकुल प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा केली, तसेच गुणवंत कामगारांना पुरस्कार वितरित केले.
माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे 3000 माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारी अंत्योदयाची भूमिका पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडली. तीच भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम स्व. अण्णासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या कष्टकरी, असंघटित कामगारांना संघटित करून त्यांनी माथाडी कायदा अस्तित्वात आणला आणि कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज माथाडी कामगार ताठ मानेने समाजात उभा आहे, त्याचे संपूर्ण श्रेय स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या त्यागाला जाते.
माथाडी कायद्याच्या संरक्षणाचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा कायदा कामगारांचे सुरक्षा कवच आहे. हा कायदा संपवला जाईल, असा संभ्रम काही घटकांकडून निर्माण केला जात असला तरी सरकार हा कायदा अधिक मजबूत करेल, तो संपू देणार नाही. मात्र, या पवित्र कामगार चळवळीच्या नावावर काही खोट्या टोळ्या तयार झाल्या असून त्या कामगारांचे नुकसान करत आहेत. या अनधिकृत प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आणि खऱ्या कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील.
कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या असून, 2850 ते 3000 माथाडी कामगारांना आधुनिक व हक्काची घरे दिली जातील. तसेच कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.
वाशी एपीएमसी मार्केटच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मार्केट त्या काळी आशियातील मोठे केंद्र होते. आता बदलत्या व्यापार पद्धतींचा आणि वाढत्या उलाढालीचा विचार करून वाशी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल. यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक तो सर्व एफएसआय सरकार उपलब्ध करून देईल. या आधुनिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांना अधिक प्रमाणात शाश्वत रोजगार मिळेल.
माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि 'सारथी'च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील, ज्यास राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@JaykumarRawal@niranjandtweets@MlaMandaMhatre@NarendraMathadi@SujataP88512
#Maharashtra #DevendraFadnavis #MathadiKamgar
India isn't just consuming anymore! We are CREATING, MANUFACTURING and EXPORTING to the world. 🇮🇳
Over the past 12 years of Make in India and under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, we have built 99.2% of our mobile phones locally, witnessed a massive surge in defence exports and unlocked incredible economic growth through key industrial schemes. This is Atmanirbhar Bharat, redefining its manufacturing strength.
@narendramodi@makeinindia
#12YearsOfMakeInIndia #AtmanirbharBharat #MakeInIndia
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, the Make in India initiative has transformed the nation into a global manufacturing powerhouse. From scaling world-class industries to building an Atmanirbhar Bharat, the lion continues to roar louder.
@narendramodi@makeinindia
#12YearsOfMakeInIndia #MakeInIndia
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त गुणवंत माथाडी कामगारांना 'माथाडी भूषण' पुरस्काराने सन्मानित केले.
सन्मानित कामगार :-
🏆गणपत पार्टे
🏆किसन बोबडे
🏆शोभा परुळेकर
🏆लालबहादूर यादव
🏆मारुती काळे
🏆बाळू पानसरे
🏆विठोबा जाधव
🏆तुकाराम हसबे
🏆धनाजी यादव
🏆अर्जुन कोर
🏆निलेश इप्पर
🏆उत्तम आव्हाड
🏆बाळू हिरगुडे
🏆भगवान जरे
🏆बाबासो चव्हाण
🏆अमोल पाटील
🏆अण्णाराव बोनवळे
🏆तुकाराम पाटील