It was wonderful interacting with First Deputy Prime Minister of Czech Republic Karel Havlíček and the Czech delegation in Mumbai! Beyond the formal exchange, it was great connecting on our shared vision for growth. Looking forward to strengthening Maharashtra-Czech ties and turning these conversations into concrete opportunities.
#Maharashtra #Mumbai #IndiaCzech
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी भेट घेतली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश तसेच वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ₹11,00,000 देणगीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री ॲड. आशिष शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis@ShelarAshish
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Empowering Tribal Communities Through Integrated Development!
Glad to attend the ‘Janjatiya Sankul Vikas Pariyojana, Maharashtra’ programme, in Mumbai today.
The Janjatiya Sankul Vikas Pariyojana is an important step towards taking integrated development to our tribal villages through convergence of government schemes, creating livelihood opportunities and reducing migration.
Maharashtra has allocated ₹25,000 crore for tribal development. The focus is on ensuring that these resources reach genuine beneficiaries and that implementation is properly monitored. Education, healthcare and employment are key to meaningful social transformation. Creating village-level employment can curb migration while ensuring continuity in children’s education and access to healthcare.
The approach to tribal development must expand from individual villages to focus on clusters of villages, improving livelihoods, generating sustainable employment and preventing migration. By better aligning Central and State resources, development efforts translate into deep, lasting impact on the ground. The recent agricultural successes in Nandurbar prove that this project is working well.
The Maharashtra Government will stand firmly behind the action plan prepared for this initiative.
BJP Rashtriya Sanghatak and Rashtriya Sanghatak of Sansadiya Sankul Vikas Pariyojana V. Satish ji, BJP State President MLA Ravindra Chavan, Minister Dr. Ashok Uike, BJP National Vice President Bharatitai Pawar, MLA Yogesh Sagar, Founder and President of 'YOJAK Center for Research and Strategic Planning for Sustainable Development', Dr. Gajanan Dange and other dignitaries were present.
@v_shrivsatish@RaviDadaChavan@drashokuike_mla@Yogeshsagar09
#Maharashtra #Mumbai #TribalDevelopment
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे कृषी उत्पन्न बाजार समिती खामगांवच्या वतीने मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis@advakash
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे झुंजार नेतृत्व आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याची सुरुवातीची मशाल पेटवणारे क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांचा संघर्ष, त्यांचा स्वाभिमान आणि समाजासाठीचे समर्पण यांना शतशः नमन! 🚩
@NarendraMathadi@Shivsenaofc
#क्रांतिसूर्यअण्णासाहेबपाटील #मराठाआरक्षण #माथाडीकामगार #dattavghangale #ashwinidattaghangale
स्व अण्णासाहेब पाटील,
संस्थापक अखिल भारतीय मराठा महासंघ, माथाडी कामगार चळवळीचे जनक, कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे नेते
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻
#AnnasahebPatil
#माथाडीकामगार
#मराठामहासंघ
#विनम्रअभिवादन
🔸CM Devendra Fadnavis at the launch of the Wadala Mathadi Housing Project, the distribution ceremony of Gunwant Kamgar Awards and Bhavya Melava of Mathadi Workers organised on the occasion of the 93rd birth anniversary of great leader Late Anna Saheb Patil.
Minister Ganesh Naik, Minister Jaykumar Rawal, MLC Niranjan Davkhare, MLA Manda Mhatre, President of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Narendra Patil, Navi Mumbai Mayor Sujata Patil and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वडाळा माथाडी घरकुल प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा, गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ व माथाडी कामगारांचा भव्य मेळावा.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील इनकी 93वीं जयंती के अवसर पर वडाला माथाडी आवास परियोजना के शुभारंभ की घोषणा, गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारोह एवं माथाडी कामगारों का भव्य सम्मेलन।
इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, विधायक निरंजन डावखरे, विधायक मंदा म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडल के अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबई की महापौर सुजाता पाटील एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕙10am | 25-9-2026📍Navi Mumbai | स. १० वा. | २५-९-२०२६📍नवी मुंबई.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@JaykumarRawal@niranjandtweets@MlaMandaMhatre@NarendraMathadi@SujataP88512
#Maharashtra #DevendraFadnavis #MathadiKamgar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त गुणवंत माथाडी कामगारांना 'माथाडी भूषण' पुरस्काराने सन्मानित केले.
सन्मानित कामगार :-
🏆गणपत पार्टे
🏆किसन बोबडे
🏆शोभा परुळेकर
🏆लालबहादूर यादव
🏆मारुती काळे
🏆बाळू पानसरे
🏆विठोबा जाधव
🏆तुकाराम हसबे
🏆धनाजी यादव
🏆अर्जुन कोर
🏆निलेश इप्पर
🏆उत्तम आव्हाड
🏆बाळू हिरगुडे
🏆भगवान जरे
🏆बाबासो चव्हाण
🏆अमोल पाटील
🏆अण्णाराव बोनवळे
🏆तुकाराम पाटील
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@JaykumarRawal@niranjandtweets@MlaMandaMhatre@NarendraMathadi@SujataP88512
#Maharashtra #DevendraFadnavis #MathadiKamgar
माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी सरकार कटिबद्ध!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यास प्रमुख उपस्थिती दर्शवली, यावेळी त्यांनी वडाळा माथाडी घरकुल प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा केली, तसेच गुणवंत कामगारांना पुरस्कार वितरित केले.
माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे 3000 माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारी अंत्योदयाची भूमिका पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडली. तीच भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम स्व. अण्णासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या कष्टकरी, असंघटित कामगारांना संघटित करून त्यांनी माथाडी कायदा अस्तित्वात आणला आणि कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज माथाडी कामगार ताठ मानेने समाजात उभा आहे, त्याचे संपूर्ण श्रेय स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या त्यागाला जाते.
माथाडी कायद्याच्या संरक्षणाचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा कायदा कामगारांचे सुरक्षा कवच आहे. हा कायदा संपवला जाईल, असा संभ्रम काही घटकांकडून निर्माण केला जात असला तरी सरकार हा कायदा अधिक मजबूत करेल, तो संपू देणार नाही. मात्र, या पवित्र कामगार चळवळीच्या नावावर काही खोट्या टोळ्या तयार झाल्या असून त्या कामगारांचे नुकसान करत आहेत. या अनधिकृत प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आणि खऱ्या कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील.
कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या असून, 2850 ते 3000 माथाडी कामगारांना आधुनिक व हक्काची घरे दिली जातील. तसेच कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.
वाशी एपीएमसी मार्केटच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मार्केट त्या काळी आशियातील मोठे केंद्र होते. आता बदलत्या व्यापार पद्धतींचा आणि वाढत्या उलाढालीचा विचार करून वाशी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल. यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक तो सर्व एफएसआय सरकार उपलब्ध करून देईल. या आधुनिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांना अधिक प्रमाणात शाश्वत रोजगार मिळेल.
माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि 'सारथी'च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील, ज्यास राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@JaykumarRawal@niranjandtweets@MlaMandaMhatre@NarendraMathadi@SujataP88512
#Maharashtra #DevendraFadnavis #MathadiKamgar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वडाळा माथाडी घरकुल प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@JaykumarRawal@niranjandtweets@MlaMandaMhatre@NarendraMathadi@SujataP88512
#Maharashtra #DevendraFadnavis #MathadiKamgar
Empowering our Mathadi Workers
Delighted to be present at the launch of the Wadala Mathadi Housing Project, the distribution ceremony of Gunwant Kamgar Awards and Bhavya Melava of Mathadi Workers, organised on the occasion of the 93rd birth anniversary of the visionary founder of the Akhil Bharatiya Maratha Mahasangh & prominent Mathadi Leader Late Anna Saheb Patil, in Navi Mumbai today.
Heartfelt tribute to Late Annasaheb Patil, whose lifelong service to the underprivileged and working class strengthened the Mathadi movement and led to the historic Mathadi Act, bringing dignity, safety and social security to thousands of workers.
The Wadala Mathadi Housing Project launched today will provide modern homes to around 3000 workers, while the Vashi APMC Market will be redeveloped to global standards, creating sustainable opportunities for Mathadi workers. Dedicated schemes for higher education and skill development through the Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal and SARTHI will further empower workers’ children, with dedicated support from the Maharashtra Government.
Minister Ganesh Naik ji, Minister Jaykumar Rawal, MLC Niranjan Davkhare, MLA Mandatai Mhatre, President of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Narendra Patil, Navi Mumbai Mayor Sujatatai Patil and other dignitaries were present.
@NaikSpeaks@JaykumarRawal@niranjandtweets@MlaMandaMhatre@NarendraMathadi@SujataP88512
#Maharashtra #NaviMumbai #MathadiKamgar
१३ जुलै रोजी होणाऱ्या प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण व पालकमंत्री मा. श्री. छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या दौऱ्याच्या तसेच २२ जुलै रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमांचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच SIR संदर्भात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेऊन ते अधिक वेगाने व प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने BLA-2 पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि संघटित कार्याच्या बळावर आगामी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
#BJPMaharashtra #RavindraChavan #DevendraFadnavis #ShivendraRajeBhosale #abhimanyupawar #Janseva #ViksitMaharashtra
मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही,
गुमराह तो वो हैं जो घर से निकले ही नहीं!
(विधानसभा, मुंबई | दि. 8 जुलै 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
📍नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि चार राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत #नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत वीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. या पाण्यापैकी ५ टीएमसी पाणी #उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह आणि जलशक्ती मंत्री पाटील यांचे आभार मानले. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती अशी 👇🏾
राज्यासाठी देय निधीसह इतरही अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय झाले. महाराष्ट्राला आता केवळ २७ कोटी देय.
पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावूनही प्रकल्प पूर्ण झाल्यापासून महाराष्ट्राला थोडेही पाणी मिळाले नव्हते. आजच्या बैठकीत या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्राच्या हिश्श्याच्या १० टीएमसी पाण्यापैकी नर्मदा-तापी डायव्हर्जन स्कीममधून ५ टीएमसी आणि उकाई प्रकल्पातून ५ टीएमसी पाण्याची मागणी महाराष्ट्राने केली होती, त्याही संदर्भात अनुकूल निर्णय झाला.
पावसाच्या कालावधीत उकाई धरणात पाणी असतानाच्या काळात हे पाणी उचलण्यास गुजरातकडून अनुकूलता.
उकाई धरणातून पाणी उचलण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून सुव्यवस्थित आराखडा तयार करण्याचे काम सुरु. या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ.
@AmitShah@CRPaatil@Dev_Fadnavis@DrMohanYadav51@BhajanlalBjp@Bhupendrapbjp
माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. श्री. राहुलजी नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
#RahulNarvekar#birthdayspecial#gratitude #abimanyupawar
@rahulnarwekar