प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलीटेक्निकच्या) केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 22-06-2026 ही शेवटची तारीख होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकपर्यंत 1,45,708 उमेदवारांनी नोंदणी केली आहे तर त्यापैकी 1,15,053 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता, तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन, अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अर्ज सादर करण्यासाठी, सुधारित अंतिम तारीख 02-07-2026 निर्धारित करण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील जाणून घेण्यासाठी तसेच अर्ज भरण्यासाठी https://t.co/UobpllZ2U1 या वेबसाइटला भेट द्यावी आणि सुधारित अंतिम तारखेचा लाभ घ्यावा.
#PolytechnicAdmission2026 #StudentOpportunity #TechnicalEducation
#Maharashtra
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले.
कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये:
- जिल्हाधिकारी कार्यालय - जळगाव
- पोलिस अधीक्षक कार्यालय - ठाणे ग्रामीण
- महानगरपालिका - पनवेल
- पोलिस आयुक्त कार्यालय - नाशिक
- विभागीय आयुक्त कार्यालय - नागपूर
- पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय - नांदेड
- राज्यस्तरीय आयुक्तालय/संचालनालय - संचालक, तंत्र शिक्षण
- राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण - महाराष्ट्र सागरी मंडळ
- मंत्रालयीन विभाग - सार्वजनिक बांधकाम विभाग
उपरोक्त विविध संवर्गातील राज्यातील उत्कृष्ट कार्यालयांची नावे सोबत जोडली आहेत. (उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे दि. 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतील.)
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मागील तीन वर्षात मान्यता दिलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदविका संस्थांची तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकानुसार ७१ पदविका संस्थांमध्ये व १८ पदवी संस्थांमध्ये त्रुटी आढळून आल्या. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सदर संस्थांची मान्यता रद्द करण्याची शिफारस राज्य शासनाकडून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांचेकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने PCI ने दिनांक २६.९.२०२५ च्या परिपत्रकान्वये सदर संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिताच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रतिबंधित करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. सबब सदर संस्थाना शैक्षणिक वर्ष 2025-26 करिताच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रतिबंधित करण्यात येत आहे.
@CMOMaharashtra@ChDadaPatil
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत या पूर्वी देण्यात येणाऱ्या विद्यार्थीभिमुख सेवांमध्ये शासकीय संस्थामधून द्यावयाच्या १२ सेवा नव्याने अंतर्भूत केलेल्या आहेत. सदर सेवांबाबत अधिक माहिती करिता खालील संकेतस्थळास भेट द्यावी.
🔔@MahaDGIPR निर्मित #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात 'तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप व प्रवेश प्रक्रिया' विषयी राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांची मुलाखत.
🗒️दि. ११, १२, १३ व १४ जून २०२५
⏰सकाळी ७.२५ वा
📻 @newsonairॲपवरसुद्धा ही मुलाखत ऐकता येईल.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे....
- 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
- 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
- 5 जिल्हाधिकारी,
- 5 पोलिस अधीक्षक,
- 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
- 4 महापालिका आयुक्त,
- 3 पोलिस आयुक्त,
- 2 विभागीय आयुक्त आणि
- 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक
यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.
#महाराष्ट्रदिन #Maharashtra
*तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठी डॉ. विनोद मोहितकर यांचा ‘एआयसीटीई’कडून मानद फेलोशिपने सन्मान... या सन्मानाचे श्रेय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे - डॉ. मोहितकर*
https://t.co/yi9TejpkVD
Indian Society of Technical Education (ISTE) मार्फत मा. डॉ. विनोद म. मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना तंत्रशिक्षणातील विशेष योगदान आणि देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेवून 2024 सालाकरिता मानद फेलोशिप (Honorary Fellowship) आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी Lamrin Tech Skill University, Ropar (Panjab) येथे देश पातळीवरील वार्षिक अधिवेशनादरम्यान श्री हरपल सिंग चिमा, मा. वित्त मंत्री,, अर्थ मंत्रालय, पंजाब सरकार व प्रा. डॉ. टी जी सितारामन, चेअरमन, AICTE यांचे हस्ते प्रदान करण्यांत आला. याकरिता मा. डॉ. विनोद म. मोहितकर, संचालक, तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचे हार्दिक अभिनंदन.
💐💐💐
#aicte #iste #dte
मा. मंत्री महोदय,उच्च व तंत्र शिक्षण श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्व विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण यांच्यास्तरावरील डिसेंबर 2024 पर्यंतची सर्व प्रलंबित प्रकरणे सकारात्मक दृष्टीने निकाली काढण्याबाबत निर्देश दिले होते.
त्यानुषंगाने तंत्रशिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून सर्व विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण कार्यालयांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. विभागीय कार्यालये यांचे स्तरावर सेवाविषयक प्रलंबित प्रकरणे विषय निहाय वर्गीकरण करण्यात येऊन दि. 15.01.2025 पर्यंत निकाली काढण्यासाठी प्रलंबित प्रकरणांची झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोझल ही राज्यव्यापी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालये सुरू ठेऊन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. दि. 31/12/2024 अखेरपर्यंत विभागीय कार्यालयांच्या स्तरावर एकुण 1490 प्रकरणे प्रलंबित होती. सदरहु राज्यव्यापी मोहिमेमध्ये एकूण 1353 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून उर्वरीत 138 प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.सदरहु मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत मा. मंत्री महोदय विभागीय कार्यालयांना आकस्मिकपणे भेट देऊन तपासणी देखील करणार आहेत. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रकरणांसाठी तसेच जनता व सर्वसामान्यांच्या शिक्षण विषयक सर्व तक्रारिंचे निराकारण सकारात्मक दृष्ट्या करण्याचे या मोहिमेचे प्रयोजन आहे.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@naikindranil
महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांवर विद्यार्थी व पालकांसोबत
🌟मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, श्री. चंद्रकांतदादा पाटील (@chdadapatil) यांचा 🔴Webinar द्वारे थेट संवाद कार्यक्रम
🔗https://t.co/tOulankYAz
📅25 जुलै 2024
⏰सकाळी 10 वाजता
#Education#Scholarship
🌟उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे शिष्यवृत्ती योजनांवर चर्चेसाठी आयोजित संवाद कार्यक्रम
➡️विद्यार्थी, पालक तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण - श्री @ChDadaPatil, Webinar च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
#Education