Data for Census 2027 is collected digitally & self-enumeration is an option to citizens. Mumbaikars can click https://t.co/5HfuklXxj3 & compete self enumeration till May 15th. It’s an easy & secure process. I’ve completed my self enumeration & received SE ID. Have you done?
Enjoying the amazing connectivity provided by @MumbaiMetro3 between my two offices, one at CMO #Mantralaya and the other at #MMRCL office in #BKC. What a comfortable, swift, reliable and hassle-free travel which makes it easy for me to do justice to both responsibilities of mine.
A wonderfully evocative video shared by @Sahilinfra2
showing the seamless subway transfer from Mumbai’s iconic CMST station to the new Line 3 of the Mumbai Metro.
It’s a simple, unassuming clip, yet it tells a powerful story: it captures a journey from the past to the future, from heritage to modernity.
And a heartfelt thank you to @AshwiniBhide, whom I first met years ago when she was entrusted with the daunting task of building this line.
Your vision, commitment, and perseverance have gifted something truly transformational to all Mumbaikars.
You’re a role model in every sense. 👏🏽
Restoration work is in progress at #AcharyaAtreChowk station following disruption caused by seepage ingress. Our engineering and safety teams are working on a war footing to ensure all systems are fully secure before resumption of services.
#AquaLine#मुंबईमेट्रो#मेट्रोस्टेशन
#AcharyaAtreChowkUpdate
#MumbaiMetro #MumbaiRains
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आयोजित समता महोत्सव- २०२५ हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी उपस्थित होतो. या महोत्सवाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आज आपण जे काही आहोत ते आपल्या या सर्व महापुरुषांनी जो लढा उभारला त्यामुळे आहोत. फुले- शाहू- आंबेडकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेल्या कार्यामुळेच अनेक क्षेत्रात आपण सर्वच पुढे जाऊ शकलो, त्यामुळे ही सर्व आपल्या बहुजनांची दैवतं आहेत, असा विचार मांडला. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी केलेले कार्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९२० मध्ये दिलेले आरक्षण या सर्व विचारांची गुंफण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. संविधान मसुदा समितीवर एकूण ७ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे संविधान तयार करण्याचे काम फक्त एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच केले, असे मत मांडले.
यावेळी खा. सुनील तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक, माजी खासदार समीर भुजबळ, पुरस्कारार्थी नरेंद्र जाधव, मिलिंद शिंदे, भदंत आर. आनंद, आ. सना मलिक, माजी आमदार झिशान सिद्दिकी, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, नजीब मुल्ला, संतोष धुवाळी, गायक आदर्श शिंदे यांच्यासह आयोजक मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
#समतामहोत्सव #ncpmaharashtra
मी १९७२ पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी. आणि हि जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली. अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसंच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं याचं मला अत्यंतिक दु:ख होतंय.
आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय. त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव नायगाव (सातारा) येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सोहळा पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. तसेच उपस्थितांशी संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवते असून त्यांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या स्मारकांचा विकास करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या प्रेरणास्थळांचा प्राधान्याने विकास करण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळ विकास आराखडा आपण तयार केलेला आहे त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळ विकास आराखडा व श्री क्षेत्र अरणचा विकास आराखडा लवकरच मंजूर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणातून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!
या स्मारकाच्या कामात प्रा. हरी नरके यांचे योगदान महत्वाचे असून त्यांनीच मला या ठिकाणी आणले. त्यानंतर सर्वाधिक निधी या ठिकाणी खर्च करून आपण या स्मारकाचा विकास केला. मंत्रालयात फुले दाम्पत्याचे तैलचित्र, महाज्योतीसाठी ४५३ कोटी निधी, केंद्र सरकारचा ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा, स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना, पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्ताराचा प्रश्न अशा अनेक गोष्टी मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संत शिरोमणी सावता महाराजांचे गाव आरणला ‘अ’ वर्ग तीर्थस्थळ दर्जा देण्याची घोषणा झालेली आहे. त्याचा शासन निर्णय लवकर निर्गमित व्हावा, येथील विकासासाठीचा १४० कोटी रुपयांचा आराखडा लवकर मंजूर केला जावा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पुन्हा सुरु करण्यात यावा, फुले दाम्पत्याचे समग्र वाड्मय पुन्हा छापण्यात यावे, नायगांवच्या राष्ट्रीय स्मारकात पर्यटन निवास केंद्र विकसित करून येथे २०० मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरु करण्यासाठी जागा देऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी या देखील मागण्या मांडल्या.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार सचिन पाटील,अतूल भोसले, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, मदन भोसले, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे एमडी राजेश खवले, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे, बापु भुजबळ, दिलिप खैरे, ॲड.सुभाष राऊत, समता परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, प्रा.दिवाकर गमे, ईश्वर बाळबुद्धे, उपसरपंच गणेश नेवसे, माजी सरपंच साधना नेवसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
#SavitribaiPhule #SavitriBaiPhuleJayanti #Naygaon #BirthPlace #Reformer #Education
वांद्रे (पूर्व) बसस्थानक आणि बीकेसी मेट्रो स्थानक दरम्यान बीकेसी संकुल - वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक मार्गे मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२४ पासून नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र. ए - ३१४ कार्यान्वित करण्यात येणार आहे. @MumbaiMetro3#bestupdates
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी आमदार श्री. पंकज भुजबळ यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्याद्वारे नामनिर्देशित आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ही संधी दिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. प्रफुलजी पटेल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिलजी तटकरे यांचे देखील आभार मानतो.
आगामी काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व सर्वसामान्यांच्या हितासाठी ते झोकून देऊन काम करतील, असा विश्वास आहे.
त्यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
#PankajBhujbal #MaharashtraLegislativeCouncil #Maharashtra
प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनदर्शनातून जगाला सत्य, कर्तव्य, साहस या मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करणाऱ्या रामायण या महाकाव्याचे रचनाकार आदिकवी महर्षि वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त वंदन !
#आदिकवी_महर्षि_वाल्मिकी
आपल्या प्रयत्नांतून ममदापुर साठवण तलाव प्रकल्पास वनविभागाकडून टप्पा २ ची अंतिम परवानगी प्राप्त!
आपल्या येवला तालुक्यातील ममदापूर परिसरातील साठवण तलाव प्रकल्पाला वनविभागाकडून टप्पा-२ ची अंतिम परवानगी प्राप्त झाल्यामुळे ममदापुर साठवण तलावाच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सतत दुष्काळग्रस्त असलेल्या येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाची सिंचन क्षमता अधिक वाढविण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
ममदापूर साठवण तलाव प्रकल्पाबाबतच्या आपल्या प्रयत्नांचा प्रवास-
📌 ६ कोटी ४५ लक्ष रकमेच्या ममदापुर 'मेळाचा बंधारा' या साठवण तलावाच्या कामाला प्रशासकीय मान्यता
📌 मात्र प्रकल्प ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात
📌 वनविभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार
📌 त्यामुळे राज्य व केंद्रीय वने-पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्यांअभावी काम रखडलेले
📌 या परवानग्यांसाठी संबंधित प्रत्येक ठिकाणी आपला पाठपुरावा सुरू
📌 योजनेची वर्क ऑर्डर नोव्हेंबर २०१७ मधील असल्याने सुधारित किंमत १५ कोटी ७४ लक्ष झाली
📌 राज्य व राष्ट्रीय वन्यजीव मंडळ स्थायी समित्या, केंद्रीय वन व पर्यावरण विभागांसह विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू
📌 आपल्या सुचनेनुसार जलसंधारण विभागाकडून विविध अटींची पूर्तता
📌 नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव
📌 अखेर प्रकल्पास वनविभागाकडून टप्पा २ ची अंतिम परवानगी प्राप्त
मांजरपाडा प्रकल्पानंतर पाण्याच्या दृष्टीने हे नक्कीच खूप मोठं यश आहे. या तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फु इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे. बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील १७६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार असून साठवण तलावाचा ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.
टप्पा-२ ला परवानगी मिळाल्यामुळे आता लवकरच या कामाला सुरुवात होणार असून येवला तालुक्यातील जनतेला याचा नक्कीच फायदा होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जाईपर्यंत आपण पाठपुरावा करत राहणार आहोत.
#nashik #yeola #Maharashtra
खाशाबा जाधव यांच्यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरलेल्या स्वप्नीलचे मनापासून अभिनंदन!
महाराष्ट्राचा सुपुत्र, कोल्हापूर येथील स्वप्नील कुसाळे या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक- २०२४ मध्ये आपल्या उत्कृष्ट नेमबाजीच्या माध्यमातून भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. त्याने ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे. उभं राहून, गुडघ्यावर बसून आणि पोटावर झोपून अशा तीन प्रकारे शूटिंग केली जाणाऱ्या या प्रकारात पदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
स्वप्नीलने मिळवलेलं हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. आगामी काळातही त्याने अशीच उज्ज्वल कामगिरी करून देशाचे व महाराष्ट्राचे उंचवावे यासाठी, माझ्या मनापासून शुभेच्छा!
@KusaleSwapnil
#OlympicGames #Bronze #Olympics2024Paris #IndiaAtParis2024 #Paris2024 #ParisOlympics #OlympicGamesParis #IndianSports #IndianShooting #Cheer4India #TeamIndia
#कोल्हापूर_पुत्र
#Paris2024 #OlympicGames #Olympics2024Paris
आधुनिक भारताचा पाय रचणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रस्थानी असणारे व्यक्तिमत्व, टाटा उद्योगसमूहाला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे प्रख्यात उद्योगपती भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भारतातील पहिले वैमानिक असलेल्या जे. आर. डी. टाटा यांनी टाटा एअरलाईन्सच्या रूपाने भारतीय विमानसेवेची मुहूर्तमेढ रोवली, त्यामुळे त्यांना भारतीय विमानसेवेचे जनक असे देखील संबोधले जाते.
#Tata
ओबीसी आरक्षण बचावाच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या १० दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती, तसेच काल सरकार व ओबीसी शिष्टमंडळ यांची बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या शिष्टमंडळासह वडीगोद्री येथील उपोषणस्थळी भेट दिली.
यावेळी हाके व वाघमारे या ओबीसींच्या दोन वाघांचे या संघर्षाबद्दल कौतुक केले. तसेच ओबीसी आंदोलकांच्या मागण्यांना अनुसरून ओबीसी आरक्षणास धक्का न लावण्यासंदर्भात सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनांचे पत्रक त्यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज १० व्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले. ओबीसींच्या हक्काचा लढा असाच सुरू राहील, असा विश्वास यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांना दिला.
#OBCReservation #OBC #ओबीसी_आरक्षण #reservation