आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळ��त पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुव���धा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ?
बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो.
आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधार��� मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत !
नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हण��ं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा.
तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच !
राज ठाकरे
#नाशिक #तपोवन #कुंभमेळा
#Nashik #Tapovan #Kumbhmela
@SumitBaneMNS कोकणातील लग्न म्हणजे व्यवहार नसतोच म���ळी, दोन्ही बाजूचा मान सन्मान जपला जातो, संस्कृती,जुन्या रूढी, परंपरा जपल���या जातात, अवास्तव बडेजावं नसतो.
@InfoRaigad रॅली तेवढी सुंदर आहे परंतु जिल्ह्यातील सरकारी शाळ��ंचे बंद होण्याचे प्रमाण आणि खाजगी शाळांचे अमाप फी आणि त्यांचे अवाजवी शैक्षणिक चोचले त्यावर प्रशासनाचा नसलेला अंकुश यातून सामान्य आणि गरीब माणूस कशी बेटी पढवणार??
@suvishelke@DGPMaharashtra@CMOMaharashtra नाथजल ही पाण्याची बॉटल 15 rs. MRP असताना सर्रास 20 रुपयाला विकली जाते आणि हे आगार व्यवस्थापकाला नक्कीच माहिती आहे परंतु कोणीही त्यावर कारवाई करीत नाही. हे जवळपास सगळ्याच बस स्थानक��वर चालू आहे.
@SumitBaneMNS नक्कीच यावेळेला social media वर मनसैनिकांनी चांगला किल्ला लढवला, आता दुसऱ��या फळीतील नेत्यांनी त्वेषाने बाहेर आले पाहिजे, प्रवक्ते बोलले पाहिजे पूर्ण माहोल मनसेमय केला पाहिजे... एका बाजूने साहेब आहेतच.... साम दाम दंड सगळ्या सोबत मैदानात आल पाहिजे.
@Shrirekha27 1.पडेल ते राजकारण न करता ethics संभाळणे(ला���की बहीण योजना विरोध),
2.नाती-मैत्री जपणे (लोकसभेला एकही सीट न घेता पाठिंबा), 3.गाफील रहाणे, विश्वास ठेवणे (माहीम आणि शिवडी मध्ये मित्रानी न दिलेली साथ)
येणाऱ्या सर्व निवडणूका पूर्णवेळ राजकारण करून ताकदीने लढाव्या तरच मनसेचे भविष्य आहे.
@mandar2404@RajThackeray Absolutely If he comes into power, With his leadership, we Kokankars can expect significant improvements in infrastructure, including roads, and more importantly, sustainable developments that protect our environment and safeguard the future for generations.
@RajuUmbarkar1 तुफान फटकेबाजी, सोबत जनते बद्दलचा कळवळा, ते प्रेम, ती जाणीव आणि काम करण्याची इच्छा आता खरच वणीकरांनी ��ा @RajThackeray च्या माणसाच्या मागे उभ राहील पाहीजे. @Yavatmal @mnsadhikrut
आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती.
तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र ��वनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती.
माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम के��द्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार.
मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळ��ो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत...
• भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
• या भाषेत प्राचीन साहित्य हवं.
• भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
•'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
२०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर, आता अभिजात भाषेच�� दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील...
•मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल.
•भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल.
•प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल.
•महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील.
•मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल.
* प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
* अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.
या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा ���ाझ्या पक्षाचा मुद्दा होता.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ ��ोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता.
जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन.
प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे.
पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन...
राज ठाक��े ।
@RavindraAmbekar प्रस्थापितांना लालसा दाखवून पक्षात घेऊन आमदार/खासदार करून मिळवलेल्या यशा पेक्षा, पक्ष मोठ करण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला राजकीय भवितव्य देण्याचा विचार करणारा नेता म्हणजे @RajThackeray , तो पा. पत्रकारी विचारांच्या फुट पट्टित कधीच बसणार नाही. नक्की यश मिळेल @mnsadhikrut 🤞✌
@jogalshailaja परंतु मंचावरून देव देवतांची खिल्ली उडवायची, शिव्या घालायच्या आणि निवडणूकांच्या आधी दर्शन घेत फिरायच हे राजकारण नाही तर आणखी काय??? मनापासून भक्ती श्रध्दा तर मुळीच नाही.
खाजगी शाळेच्या फी ने पालकांचे कंबरडे मोडले आहे ...
प्रत्येक वर्षी नवी मुंबईतील शाळांची फी कशी वाढते ?? ...
शिक्षण सर्वसामान्यांना परवडत नाही आहे ...
पण यावर स्थानिक आमदार काहीच बोलत नाहीत ...
हो पुढील ५ वर्षे एकाही शाळेची फी वाढणार नाही, याची शाश्वती आम्ही देतो पण त्यासाठी लोकांना विश्वास ठेवावा लागेल ... !!!
#mns #schoolfees #मनसे
#आपलागजाननहक्काचागजानन
#बेलापूरविधानसभा #Navimumbai