भारतातील गेमिंग क्षेत्र झपाट्याने वाढत असताना व्यसन, मनी लाँड्रिंग आणि फसवणूक टाळण्यासाठी मोदी सरकारने आणलेले 'ऑनलाइन गेमिंग बिल २०२५' लोकसभेत मंजूर झाले आहे. या कायद्यानुसार राष्ट्रीय नियामक आयोग स्थापन करण्यात येईल आणि या आयोगाद्वारे गेम्सची वर्गवारी, नोंदणी व कठोर नियंत्रण आणले जाईल.
तसेच या कायद्याद्वारे अवैध गेम्स व जाहिरातींवर बंदी येणार असून ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक व सांस्कृतिक खेळांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत गेमिंग क्षेत्रात अग्रेसर होत आहे.
#OnlineGamingBill2025 #OnlineGaming #Esports #SocialGaming #NarendraModi #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi
I look forward to being in Gaya, where works worth over Rs. 13,000 crore will be inaugurated or their foundation stones will be laid. The projects include the four-lane Bakhtiyarpur to Mokama section of NH-31, Buxar Thermal Power Plant, Sewerage Treatment Plants and Sewerage Networks.
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र
तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी
२०२५ हे वर्ष म्हणजे कैवल्यचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे.
भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या, विश्वकल्याणाची शिकवण देणाऱ्या, श्री ज्ञानोबा माऊलींचे कार्य आजही आपल्यासाठी दिशा, प्रेरणा आणि चेतना यांचा चिरंतन 'ज्ञानदीप' आहे.
आपले भाजपा-महायुती सरकार हे महाराष्ट्रातील संत परंपरेचा सन्मान जपण्यासाठी कटिबद्ध असून याच अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी, श्री संत ज्ञानोबा माऊलींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील सर्व नगर परिषदांमध्ये माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचा उत्सव पालखी दिंडीच्या आयोजनातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
तेव्हा ज्ञानोबा माऊलींच्या गजरात सामील होऊया, ज्ञानोबा माऊलींची शिकवण जपूया !
या निर्णयाबद्दल आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार!
#संत_ज्ञानेश्वर_महाराज_सप्तशतकोत्तर_सुवर्ण_महोत्सव #maharashtra #vaari #वारकरी #BJP4Maharashtra
संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांची आज पुण्यतिथी!
संगीतामध्ये सतत नाविन्याचा शोध घेत त्यांनी आपली स्वतंत्र शैली निर्माण केली.
शास्त्रीय संगीत आणि संगीत नाटकांसोबतच त्यांनी 'अष्टविनायक' या चित्रपटामध्येही आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवली.
अशा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन!
#DrVasantraoDeshpande #KatyarKaljatGhusli #SangitNatak #ClassicalMusic
'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशासमोर हे स्पष्ट केले की आता भारतात दहशतवादाला थारा नाही!
आपल्या भारतमातेवर जर कोणी हल्ला केला तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, ज्यामुळे शत्रूही भीतीने थरथर कापू लागेल..!!
#ModiInParliament #NarendraModi #PMModi #IndianArmy #IndianHeroes #PahalgamTerrorAttack #OperationSindoor #Parliament #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवादाला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ‘एअर डिफेन्स सिस्टीम्स’ने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रं आणि ड्रोनला उद्ध्वस्त केलं. या गौरवास्पद कामगिरीची आज जगभर चर्चा आहे.
#ModiInParliament#NarendraModi#PMModi#IndianArmy#IndianHeroes #PahalgamTerrorAttack #OperationSindoor #Parliament #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP
देशवीरांच्या पराक्रमाला जगाने पाठिंबा दिला; पण काँग्रेसने नाही!
दहशतवादी कारवायांवर प्रहार करताना भारताने जगाच्या समर्थनासह पाऊल उचललं. कोणत्याही देशाने भारताला अडवलं नाही, उलट साथ दिली; पण देशाच्या शौर्यावर, ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या पराक्रमी मोहिमांवर काँग्रेसकडूनच प्रश्न उपस्थित होतात, हेच आपलं दुर्दैव आहे!
#ModiInParliament #NarendraModi #PMModi #IndianArmy #IndianHeroes #PahalgamTerrorAttack #OperationSindoor #Parliament #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP
मी भारताची बाजू मांडण्यासाठी उभा आहे आणि जे भारताची बाजू पाहू शकत नाहीत, त्यांना आरसा दाखवण्यासाठीही उभा आहे. - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
मैं भारत का पक्ष रखने के लिए खड़ा हूँ, और जो भारत का पक्ष नहीं देख पाते, उन्हें आईना दिखाने के लिए भी खड़ा हूँ- मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी
(मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का लोकसभा में संबोधन | नई दिल्ली | 29-7-2025)
@narendramodi
#Maharashtra #ModiGovtAgainstTerror #OperationSindoor
हर हर 'महादेव' !
जम्मू-काश्मीरमधील लिडवास प्रांतात झालेल्या 'ऑपरेशन महादेव' च्या माध्यमातून सुलेमान उर्फ फैजल, अफगाण आणि जिब्रान या ३ दहशतवाद्यांना भारतमातेच्या वीरपुत्रांनी कंठस्नान घातले.
पहलगाम येथे भ्याड हल्ला करणारे हेच तीन दहशतवादी होते, अशी अधिकृत घोषणा आज केंद्रीय गृहमंत्री आदरणीय
अमितभाई शाह यांनी केली.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील नवा भारत आता दहशतवाद खपवून घेत नाही, हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
'ऑपरेशन महादेव' यशस्वीपणे राबवणाऱ्या भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस दल यांचे खूप खूप आभार ! सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन !
India avenges the cowardly April 22 Pahalgam attack.
Brave Indian soldiers eliminate terrorists Suleman alias Faizal, Afghan & Jibraan in Lidwas, J&K.
Under PM Modi’s leadership, New India tolerates no terror.
Salute to our forces, Indian Army, CRPF & J&K Police!
#OperationMahadev #IndianArmy #IndianHeroes #ProudMoment
#PahalgamTerrorAttack #OperationSindoor #JammuKashmir #Lidwas
‘इन्फ्रामॅन’ देवाभाऊ!
अटल सेतू, रस्ते, मेट्रो, समृद्धी महामार्ग, भव्य पूल यासारखे संकल्प यशस्वीपणे साकारले ते आदरणीय देवाभाऊंनी!
शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण, बळीराजासाठी कल्याणकारी योजना, उद्योग व गुंतवणूक अशा सर्वच क्षेत्रांत ठोस कामगिरी करत महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेणारे नेतृत्व म्हणजेच आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस.
देवाभाऊंच्या कार्यकुशल नेतृत्वात भाजपा-महायुती सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे!
#HBDDevaBhau
#InfraMan
#DevendraFadnavis #BJPForDevelopment #EmpoweringFarmers #WomenEmpowerment #ModernMaharashtra
#BJPMahayuti
#BJP4MAHARASHTRA
#RavindraChavan4BJP
प्रत्येक गोष्ट व्हिजन ठेवून करणारा एक द्रष्टा नेता म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस!
आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात विकासाच्या दृष्टिकोनातून ट्रिलियन इकोनॉमीच्या दिशेने महाराष्ट्राची आज वाटचाल सुरू आहे.
#BJP#BJP4Maharashtra#Maharashtra#MaharashtraPolitics
#ModiSarkar #BJPMAHAYUTI #NarendraModi #DevendraFadnavis #RavindraChavan4BJP
तटकरेंना शब्दशुभेच्छा...
रायगडच्या सुतारवाडीचे @SunilTatkare हे माझे गेली अनेक वर्षांचे स्नेही कौटुंबिक मित्र म्हणून मला व रायगडातील राजकीय कार्यकर्त्यांना परिचित आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पदापासून सध्याच्या खासदारकी पर्यंत या आमच्या स्नेह्याने या सर्व जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या असेच दिसते. आता नव्याने स्वीकारलेल्या महायुतीचे खासदार या पदाची जबाबदारी पार पाडताना शक्यतो महायुतीतील राजशिष्टाचारात चूक होऊ नये असाच प्रयत्न त्यांचा दिसत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील पालकमंत्री पदाची स्पर्धा ही त्यांनी त्याच राजशिष्टाचाराच्या सौजन्याने स्वीकारलेली दिसते आहे. रायगडच्या स्थानिक राजकारणामध्ये विशेष गुंतून न पडता आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने केंद्रातील महायुतीच्या अपरिहार्यतेचा उपयोग करून केंद्राच्या दरबारी राजकारणात स्वतःची वेगळी छाप उमटवण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ एकमेव खासदार असून सुद्धा कौतुकास्पद आहे. भाजपचे नसतानाही केवळ स्नेह मैत्रीच्या आग्रहाखातर माननीय केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितभाई शहा यांनी रायगड किल्याच्या दौऱ्याप्रसंगी मुद्दाम वेळ काढून वाट वाकडी करून तटकरे साहेबांच्या घरी सुतारवाडीला स्नेहभोजन घेतले; हे त्यांच्या दिल्लीतील प्रयत्नांमुळे निर्माण झालेल्या स्नेहाचे प्रतीक असावे. सहसा माननीय अमितभाई पक्षाबाहेरील खासदाराच्या घरी भोजनास गेल्याचे उदाहरण विरळाच आहे. या प्रसंगाचे अप्रक्षेपित उदात्तीकरण साधण्याचे कौशल्य माननीय सुनील तटकरेंच्याकडे खचितच आहे. त्याचा प्रत्यय अगदी माझ्यासारख्या सामान्य भाजप कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंत येताना दिसतो. आगामी चार महिन्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या सहकार्याने, प्रसंगी भाजपकडे जेते पद देऊनसुद्धा स्वतःचीच विजयी छाप उमटवण्याची यशस्वी राजनीती करण्याकरिता त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे.
बहुतेक दरवर्षी मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या शब्द शुभेच्छांची भेट त्यांना देत आलो आहे. माझ्या आणि त्यांच्या राजकीय भूमिकांपलीकडे जाऊन मी ही स्नेह मैत्री जपण्याचा प्रयत्न केला आहे. माननीय सुनीलजी 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मंगलमूर्तीच्या कृपेने त्यांना उत्तम आरोग्य प्रदान होवो व आमची स्नेहमैत्री अशीच स्वार्थरहित विकसित होतो या अपेक्षित शुभेच्छा ! माननीय सुनीलजी तुमचाच ...
@SATISHDHARAP
Heartiest birthday greetings to our senior leader, Hon’ble Raksha Mantri Shri Rajnath Singh ji! Wishing you a long life and good health!
केंद्रीय रक्षा मंत्री मा. श्री राजनाथ सिंह जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
@rajnathsingh
🌟 आमदार संजय केळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🌟
आज आपल्याला @SanjayKelkar_ साहेबांचा वाढदिवस साजरा करताना अत्यंत आनंद होत आहे. एक लोकनेता म्हणून त्यांनी समाजाच्या प्रत्येक थरातील लोकांशी हृदयाशी नातं जपलेलं आहे. त्यांची विचारशीलता, कार्यतत्परता आणि लोकांसाठी असलेली बांधिलकी ही नव्या पिढीसाठी एक आदर्श आहे.
संजय केळकर साहेबांनी राजकारणाला केवळ सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी माध्यम मानलं आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनहिताची कामं त्यांनी प्रभावीपणे पार पाडली. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये जनतेच्या हिताचा विचार स्पष्टपणे दिसून येतो.
त्यांची विनम्रता, सुसंस्कृत वागणूक आणि संयमी स्वभाव यामुळेच ते सर्वपक्षीय आदराचे आणि प्रेमाचे पात्र झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील लढवय्या ब्राह्मण आणि कोकणाच्या पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रेमाचा आधार म्हणून संजयजींचा परिचय सर्वांना आहे. संजयजींमधला संवेदनशील कवी त्यांच्या माणूस नावाचे बेट या कवितेतून मी अनुभवला आहे.
"सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्"
या उक्तीनुसार संजयजींचे जीवनचरित्र नव्या पिढीतील राजकीय कार्यकर्त्याला मार्गदर्शक ठरावे. आगामी काळात त्यांच्या भटक्या व गरीब मुलांसाठी केलेल्या उपक्रमास खूप प्रसिद्धी व यश मिळो . आंबा महोत्सवासारख्या त्यांच्या उपक्रमांनी कोकणच्या आंबा उत्पादकांना न्याय मिळो आणि ही सर्व उपक्रमशीलता ऊर्जितावस्थेत येण्यासाठी मा. संजय केळकर यांना आरोग्यसंपन्न आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
ज्ञान, शील आणि एकता या त्रिसूत्रीवर उभी राहिलेली जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना म्हणजेच 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' !
आजच्या दिवशी या संघटनेचा स्थापना दिन साजरा करताना, नव्या पिढीतील तरुणांना जागरूक, जबाबदार आणि राष्ट्रनिर्मितीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळो, हीच शुभेच्छा!
#अभाविप #छात्रशक्ति_राष्ट्रशक्ति
#ABVPFoundationDay #NationalStudentsDay #YouthPower #NationFirst #ABVP #StudentUnity #FutureOfIndia #VandeMataram