सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती निमित्त दिनांक १८-०२-२०२३ रोजी सकाळी ९ वाजता गजराई कॉम्प्लेक्स येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे व शिवजयंती दिवशी दिनांक १९-०२-२०२३ सकाळी ठीक १० वाजता अण्णाभाऊ साठे येथून भव्य बाईक रॅली ची सुरुवात होईल तरी सर्वांनी उपस्थित राहावे..🙏🚩
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शालेय मुलींसाठी तालुकास्तरिय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेत अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला स्पेर्धेचे आज पारितोषिक वितरण झाले.
महाप्रतापी, महापराक्रमी, प्रकांड पंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना 'राज्याभिषेक दिना'च्या निमित्तानं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा!..💐💐
#छत्रपती#संभाजीमहाराज#Shambhuraje#RajyabhishekDin
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा... आज माँसाहेबांच्या पावन स्मृतीस मानवंदना व पुष्पहार अर्पण करण्यात आला व या वेळी सर्व मित्रपरिवार उपस्थित होता...🙏🙏
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निम्मित १३/०१/२०२३ रोजी शालेय मुलींसाठी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,तरी इच्छुक स्पर्धकांनी सहभाग घेण्यासाठी आप आपल्या शाळेत संपर्क साधावा..💐💐
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोस्तवा निमित्त दिं:- १२/०१/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता राजमाता जिजाऊ चौक येथे पुष्पहार व मानवंदना अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ..🙏🏼🙏🏼
सरत्या वर्षातील सुखद आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षात प्रवेश करूया. हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. नवीन वर्ष सर्वांगीण प्रगतीचं वर्ष ठरो!..💐💐
#HappyNewYear2023
'शिवराज्याभिषेक दिन' आणि 'शिवस्वराज्य दिना'च्या मनापासनं शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराजांनी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रुजवलं. शिवस्वराज्य निर्माण केलं. महाराजांना मानाचा मुजरा!
देशभरातील अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या, घाट, तलाव आणि धर्मशाळांची उभारणी करणार्या कर्तव्यनिष्ठ, प्रजाहितदक्ष, कुशल राज्यकर्त्या, पुण्यश्लोक वंदनीय अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#AhilyadeviHolkar
राजकारण, समाजकारण, अर्थकारणात पारंगत असलेलं, अनेक भाषांवर प्रभूत्व असलेलं व्यासंगी व्यक्तिमत्वं,प्रकांड पंडित,महान राजे, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! राज्यातील नागरिकांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा!
#sambhajimaharaj
महाराष्ट्राची भूमी शूरांची, वीरांची,संत-महात्म्यांची,समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष या भूमीत जन्मले.रयतेचं राज्य, स्वराज्य स्थापन करून राज्यकारभाराचा आदर्श त्यांनी घालून दिला. राज्यातील जनतेला 'महाराष्ट्र दिन' आणि 'जागतिक कामगार दिना'च्या शुभेच्छा!