काही वर्षांपूर्वी #MPSC चा प्रवास थांबवला.
दहा वर्षांच्या प्रवासानंतर बाहेर पडणं सोपं नव्हतं.
प्रवास थोडासा खडतर आहे, पण सुरू आहे
काही गोष्टींचं दुःख आहे, पण काहींचा आनंदही आहे.
माझ्यावर दहा वर्षं असलेला ‘अपयशाचा कलंक’ आज मिटला आहे.
कमतरता माझ्यात नव्हती
ती या व्यवस्थेत होती.
२६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा जाहीर पाठिंबा!
MPSC परीक्षार्थी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि त्यांच्या भविष्याशी होणाऱ्या खेळखंडोबाविरोधात २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पूर्ण ताकदीने पाठिंबा दर्शवत आहे.
महाराष्ट्राचा टक्का #UPSC मध्ये वाढवायचा आहे की #MPSC मध्ये परप्रांतीयांचा टक्का वाढवायचा आहे, हेच कळेनासं झालंय या descriptive परीक्षेच्या प्रयोगाने!
आयोग आणि सरकारने एकदा तरी स्पष्ट करावं—नेमकं उद्दिष्ट काय? @RajThackeray@ManseSpeaks@mnsadhikrut
#BJP चा अजेंडा राबवणाऱ्या 12K+ फॉलोअर्स असलेल्या #अंधभक्त ची हीच लायकी!
आणि शेतकऱ्यांबद्दलचा यांचा दृष्टिकोनही बघा—शेतमाल खरेदी करून उपकार करत असल्यासारखे वागायचे आणि कायम शेतकऱ्यांविरोधात आग ओकायची.
शेतकरी हा कुणाच्या उपकारावर जगत नाही; तो देशाला अन्न देतो. #FARMER @gajjabhu
अध्यक्षांचा राजीनामा ही अंतिम मागणी नसून उत्तरदायित्व निश्चित करण्याची सुरुवात आहे. #राजीनामा झाला म्हणून पेपरफुटी, चौकशी, दोषींवरील कारवाई, परीक्षा सुधारणां आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न संपत नाहीत. प्रत्येक मागणीवर ठोस निर्णय आणि अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन स्थगित करू नये. #MPSC
#MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी पुण्यात विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरत असून या आंदोलनास परवानगी मागण्यासाठी उद्या (मंगळवार दि. २२ सप्टेंबर) दुपारी २ वा. मीही विद्यार्थ्यांसोबत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाणार आहे. यावेळीही पोलिसांकडून सहकार्य मिळेल आणि आंदोलनात कोणताही अडथळा येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
माझी मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती आहे की, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावणार असाल तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काही विद्यार्थ्यांची यादी तयार असून हवी असल्यास ती आपणास दिली जाईल. शेवटी विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणं हे महत्त्वाचं असून त्यांच्या आंदोलनात कोणतंही राजकारण होता कामा नये. शिवाय चर्चा झाल्यास केवळ घोषणा नको तर अंमलबजावणीही झाली पाहिजे, पण चर्चेतून मार्ग निघाला नाही किंवा चर्चाच झाली नाही तर मात्र आंदोलन अटळ आहे.
@Dev_Fadnavis@CPPuneCity
📌 मराठवाडा…
याला म्हणतात दुष्काळ…
पावसाळ्यात तुडुंब भरणारे बंधारे आज कोरडेठाक आहेत…
शेतातील उभं पीक वाळून गेलं आहे…
मायबाप सरकार दुष्काळ जाहीर करायला अजून कशाची वाट पहायची?
निसर्गाने तर पाठ फिरवलीच आहे पण किमान सरकारनेही तरी डोळे बंद करु नये..!
कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची अक्षरशः चंपी केली आहे याठिकाणी या पत्रकाराने..!
आज राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टाकळगाव परिसरात, शेतकऱ्यांच्या शेतातील कोरड्या दुष्काळाची पाहणी केली.पण ज्याच्या शेतात पाहणी केली ते शेत एका रेस्टॉरंट आणि बार मालकच होत.
याबाबत प्रश्न विचारताच कृषिमंत्री भरणे यांचा पारा चढला...पण या हिम्मतवान पत्रकाराने शेवटपर्यंत किल्ला लढवला...!
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या गंभीर पार्श्वभूमीवर माननीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेबांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केलेल्या ९ प्रमुख मागण्या !!
बळीराजा संकटात; मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट!
पिके सुकली, विहिरींनी तळ गाठला; चाऱ्याचा प्रश्न गंभीर
काही भागांत २१ दिवसांहून अधिक पावसाचा खंड, खरीप पिकांचे ८० ते ८५ टक्के नुकसान
https://t.co/lSQ4lvfOy9
#Marathinews#Baliraja#Marathwada#Dushkal#MaharashtraDrought#KharifCrop #FarmersCrisis
मी याआधीही म्हटलं होतं—माझ्या आयुष्यात पाहिलेला हा सर्वात मोठा #दुष्काळ आहे.
#Latur मध्ये तब्बल 71% पावसाची तूट आहे. नद्या, नाले, ओढे, विहिरी पावसाळ्यातही ठणठणीत कोरडे आहेत. पुढे काय होणार माहीत नाही; पण परिस्थिती अत्यंत अवघड आहे.
सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा.
#Drought
मराठवाडा दुष्काळाने जळतोय अन् एसीत बसून काजू-बदाम खाणाऱ्या मंत्री-अधिकाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत!
बांधावर आल्याशिवाय आमची झळ कळणार नाही.
हे माझ्या शेतातील वाळलेलं सोयाबीन पाहा! आढावा बैठका बंद करून तात्काळ सरसकट दुष्काळ जाहीर करा!
#शेतकरी#दुष्काळ_जाहीर_करा#बैठक
मा. ना. देवेन्द्रजी फडणवीस साहेब..
२५ वर्षाला पिढी बदलते, तुम्ही १३ वर्षे झाली सत्तेत आहात, गेली १३ वर्षे आमची मराठवाड्याची स्वाभिमानी जनता हेच ऐकत आली आहे, पण परिस्थिती काही बदलली नाही..
दरवर्षी आश्वासन देऊन आणखी किती वर्षे आमच्या मराठवाड्याच्या जनतेला आशेवर ठेवणार आहात?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AUThackeray@ShivsenaUBTComm
#मराठवाडा #दुष्काळ #पाणी
पेपरफुटीनंतरही राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची घाई का? विद्यार्थ्यांच्या मनातील संशय दूर करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकला..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या गंभीर प्रकरणानंतर आयोगाच्या संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका परीक्षेतील गैरप्रकारामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली असताना, आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंका दुर्लक्षित करून परीक्षा घेण्याची घाई का केली जात आहे, हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर प्रश्न आहे..
वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करून, आपल्या आयुष्यातील मौल्यवान काळ आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पणाला लावून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे प्रश्नपत्रिकेची गोपनीयता सुरक्षित आहे की नाही, याबाबत त्यांच्या मनात किंचितही संशय निर्माण झाला तरी त्याकडे अफवा किंवा गैरसमज म्हणून पाहता येणार नाही. ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, त्यांच्या भविष्याची आणि परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाची बाब आहे..
पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी शासनाने व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय परीक्षा सुधार समिती नियुक्त केली आहे. परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत सुधारणा सुचविण्याचे काम समिती करत असताना, त्या सुधारणा प्रत्यक्षात लागू होण्यापूर्वीच राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची घाई आयोग का करत आहे, याचे उत्तर आयोगाने विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. या संदर्भात शासनाकडून आयोगाला कोणते विशिष्ट निर्देश अथवा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, हेही जाहीर करायला हवे..
तसेच, औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले अथवा चौकशीच्या फेऱ्यात असलेले संबंधित अधिकारी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६च्या प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन, अंतिमीकरण, छपाई किंवा वितरणाच्या प्रक्रियेशी कोणत्याही स्तरावर संबंधित नाहीत, याची ठोस आणि लेखी खात्री आयोग विद्यार्थ्यांना देणार आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे..
प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेबाबत कोणतीही वाजवी शंका असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा धोका पत्करून परीक्षा घेण्यापेक्षा विद्यमान प्रश्नपत्रिका रद्द करून स्वतंत्र आणि अधिक सुरक्षित प्रक्रियेतून नव्याने प्रश्नपत्रिका तयार करणे हाच जबाबदार मार्ग ठरेल. त्यासाठी परीक्षा काही दिवस पुढे ढकलावी लागली तरी विद्यार्थ्यांना त्याची हरकत नाही; कारण परीक्षा उशिरा होणे हे सहन करता येईल, परंतु परीक्षा झाल्यानंतर पुन्हा पेपरफुटी किंवा गैरप्रकाराचा संशय निर्माण होऊन संपूर्ण परीक्षा रद्द होणे, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणे आणि त्यांच्या कष्टावर पाणी फिरणे हे कदापि स्वीकारता येणार नाही..
मुख्यमंत्र्यांकडून फेरतपासणीचे तोंडी आश्वासन दिल्याचे सांगितले जात असताना, ऐन परीक्षेच्या तोंडावर आयोगाकडून मात्र विद्यार्थ्यांना विश्वासात घेणारी कोणतीही स्पष्ट अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांच्या मानसिक तयारीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे शासन आणि आयोगाने आता आश्वासनांवर न थांबता संपूर्ण परीक्षा प्रक्रियेबाबतची वस्तुस्थिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडावी..
विद्यार्थ्यांना विशेष सवलत किंवा कोणतीही अवाजवी मागणी नको आहे; त्यांना फक्त पारदर्शक परीक्षा व्यवस्था, सुरक्षित प्रश्नपत्रिका आणि आपल्या कष्टाला न्याय मिळण्याची हमी हवी आहे. त्यामुळे आधी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रत्येक रास्त शंका दूर करा, प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेची खात्री द्या आणि आवश्यक त्या परीक्षा सुधारणा लागू करा; त्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ घ्या. विद्यार्थ्यांच्या कष्टाशी, त्यांच्या विश्वासाशी आणि त्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड होता कामा नये, हीच आमची भूमिका आहे..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@AUThackeray@mpsc_office@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm@Mpsc_Andolan
पदोन्नतीचा कोटा वाढवून सरळसेवा भरतीचा कोटा कमी करण्याचा निर्णय स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारा आहे.
उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीचा वाटा 40 टक्क्यांवरून 60 टक्के करण्यात आला असल्याची माहिती आहे. नायब तहसीलदार पदासाठीही 80:20 चे प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे सरळसेवा भरतीचा वाटा कमी होत राहिला, तर MPSC मार्फत उपलब्ध होणाऱ्या जागांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते.
सरकारने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करून सरळसेवा भरतीचा कोटा वाढवावा आणि स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांना न्याय द्यावा.
नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीचा हक्क महत्त्वाचा आहेच; पण लाखो स्पर्धा परीक्षार्थींना खुल्या स्पर्धेतून संधी मिळणे हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे.
@INCMaharashtra@CMOMaharashtra@MahaChiefSec@mpsc_office #Justice #dhananjayshinde
परळी वैजनाथ ला रेल्वे लाइन १९३० पासून उपलब्ध असून सुद्धा, ज्याना गेल्या ३० वर्षात एक नवीन रेल्वे गाडी परळी येथून सुरू करण्यात यश आले नाही, ते लोक आज बीड रेल्वे चे श्रेय घेत आहेत.
सुधारा रे 😹😹लोकनेते फॅनक्लब !
आधी गाव च बस स्थानक बनवा मग श्रेय घ्या.
#Beed_Railway
स्वातंत्र्य सहज मिळालं नाही; त्यामागे असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष, त्याग आणि बलिदान आहे. 🇮🇳
निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढून मराठवाड्याला मुक्त करणाऱ्या त्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन! 🙏
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्व मराठवाडावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
#मराठवाडा_मुक्ती_संग्राम_दिन #MarathwadaMuktiSangramDin
लबाड लांडगं ढोंग करतंय!
मराठवाडा-विदर्भ दुष्काळाने होरपळतोय, पिकं करपली आहेत, पुढच्या वर्षी पाण्याचं संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे; पण सरकार मात्र ‘अभ्यास’च्या नावाखाली वेळकाढूपणा करतंय!
१२ वर्षांपासून भाषणातील घोषणा एकच “पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही!”
खोटं बोल, रेटून बोल आणि पुन्हा त्याच खोट्याची जाहिरात कर पण उपाययोजना मात्र शून्य...
#दुष्काळ #दलिंदर_सरकार
मेहबूब शेख यांचे #MPSC आयोगावरील आरोप गंभीर आहेत. आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करून गुन्हा दाखल करावा किंवा निष्पक्ष चौकशीचे आश्वासन द्यावे. तोपर्यंत अध्यक्ष व सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
https://t.co/q9PummPPD5
एकदा होऊनच जाऊ द्या Poll! 📊
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी कमीतकमी human involvement असलेला objective pattern लागू करावा का?
तुमचं मत काय? #MPSC