यूपी वाल्यांची ना गुजरात वाल्यांची
ही राजधानी मराठमोळ्यांची
ही मुंबई आगरी-कोळ्यांची🔱🚩
जैन असो, मुस्लिम असो , ईसाई असो किंवा कुठल्याही धर्माचा असो…
महाराष्ट्रात राहतोय, हे विसरू नका.
धर्म तुमची वैयक्तिक ओळख असेल;
पण महाराष्ट्राची माती आणि मराठीपण ही आपली सामूहिक ओळख आहे! 🚩
#महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रधर्म #आगरीकोळी #भूमिपुत्र
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या मागणीला यश! 🚶♂️
दहिसर चेकनाका परिसरातील ठाकूर मॉल ते लता मंगेशकर नाट्यगृहादरम्यान Foot Over Bridge (पादचारी पूल) उभारण्यात यावा, यासाठी MMRDA प्रशासनाकडे निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, Foot Over Bridge चे काम लवकरच सुरू होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या या मागणीला मिळालेले हे यश म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या एकत्रित पाठपुराव्याचे फलित!✊
विकास महत्त्वाचा आहे, पण त्या विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या सामान्य नागरिकाचा जीव त्याहून अधिक मौल्यवान आहे.
द���पेश हरेश गावंड
युवासेना जिल्हा अधिकारी (जिल्हा प्रमुख), मीरा-भाईंदर
बाजीराव साहेबराव दोंद
उपशहर प्रमुख
संदीप दत्तात्रेय पाटील
विभाग प्रमुख, प्रभाग क्र. १६
#FootOverBridge #RoadSafety #dahisar #mirabhayandar #publicsafety
प्रश्न अनेक आहेत… आता उत्तरांचा विचार करूया
Let's talk about SOLUTIONS, not just PROBLEMS. ♻️🙏
गणपती विसर्जन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी ही एक कल्पना —
चला, विचार करूया. प्रयोग करूया. उपाय शोधूया.
समस्या सगळ्यांना दिसतात; समाधान शोधण्याची जबाबदारी आपली आहे.
#EcoFriendlyGanpati #GreenGaneshotsav #EcoFriendlyVisarjan #SaveEnvironment #SustainableCelebration
यंदा तब्येतीच्या कारणामुळे प्रत्यक्ष भेटता आलं नाही, पण मन मात्र आपल्या सर्वांसोबतच आहे. ❤️🙏🏻
बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना — सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो! 🚩
गणपती बाप्पा मोरया! ❤️
#गणपतीबाप्पामोरया#गणेशोत्सव#गणपती#बाप्पामोरया#GanpatiBappaMorya
आमच्या पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर ह्यांची काल रात्री ठाणे परिसरात काही अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय चीड आणणारी आणि घृणास्पद आहे.
ह्या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत च���ललंय.
पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतील, पण राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळणारं वातावरण तयार होत असेल तर पोलीस विभाग तरी काय करणार?
ह्या हत्येतील गुन्हेगारांना आणि त्यामागील शक्तीला ताबडतोब अटक होईल अशी अपेक्षा करतो.
तसंच, पुर्णेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तांना ह्या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना करतो.
हे आरोप सिद्ध झाले, तर मी राजकारण सोडेन.
आदित्यजी आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप जर विश्वसनीय पुराव्यांसह आणि कायद्याच्या चौकटीत अंतिमतः सिद्ध झाले, तर मी माझ्याकडे असलेल्या सर्व राजकीय पदांचा राजीनामा देईन आणि राजकारणातून स्वेच्छेने बाजूला होण्याचा गंभीरपणे विचार करेन.
तोपर्यंत मात्र, आरोप म्हणजे दोषसिद्धी नव्हे.
ED/CBI प्रकरणांचा राजकीय इतिहास पाहा. केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जाणारे अनेक विरोध�� पक्षातील नेते नंतर भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर संबंधित प्रकरणांमध्ये अनेकदा दिलासा मिळाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत.
म्हणून स्वतःला एक साधा प्रश्न विचारा
आदित्यजी खरोखरच या आरोपांमध्ये दोषी असतील, तर त्यांच्यासमोर सर्वात सोपा राजकीय मार्ग उपलब्ध असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून संपूर्ण राजकीय पक्षासह सत्तेत जाण्याचा मार्ग का स्वीकारला नाही?
२०२२ मध्ये त्यांचा पक्ष दोन भागांत विभागला गेला. तरीही त्यांनी पक्ष सोडला नाही. प्रचंड राजकीय दबाव असतानाही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांना जे अन्यायकारक वाटते त्याविरोधात उभे राहिले.
त्यांच्यासमोर पक्ष बदलण्याची संधी होती. त्यांनी ती निवडली नाही.
मुंबई हायकोर्टानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे CBI चौकशीचा आदेश म्हणजे कोणाच्याही दोषाची नोंद किंवा दोषसिद्धी नाही. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, तपासातून मिळालेल्या सामग्रीच्या आधारे वाजवी संशय निर्माण होण्यासाठी पुरेसे आधार उपलब्ध होईपर्यंत कोणालाही आरोपी मानले जाऊ नये.
“पुरावा आहे” असे सांगणे आणि तो पुरावा प्रत्यक्षात सादर करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
मी कोणाच्याही आंधळ्या समर्थनाची मागणी करत नाही. मी फक्त पुराव्यांची मागणी करत आहे.
तपास होऊ द्या. पुरावे समोर येऊ द्या. सत्य काय आहे ते तपासातून ठरू द्या, सोशल मीडियाव���ील नरेटीव वरून नव्हे.
@AUThackeray
#DishaSalian #DishaSalianCase #EvidenceMatters #LetTheEvidenceSpeak #DueProcess
IF THESE ALLEGATIONS ARE PROVEN, I WILL QUIT POLITICS.
If the allegations against Aaditya Ji Uddhav Saheb Thackeray are ultimately proven with credible evidence and established in law, I will resign from every political position I hold and seriously consider walking away from politics altogether.
Until then, an allegation is not a conviction.
Look at the history of ED/CBI cases. There have been documented instances of opposition politicians facing central-agency probes later crossing over to the BJP, followed by cases being closed, stalled or receiving reprieve.
So ask yourself one simple question:
If Aaditya Ji was actually guilty of what is being alleged, why would he not take the easiest political exit ,cross over to the BJP and bring his entire political establishment with him?
His party split in 2022. He still chose not to cross over. He remained on his side and continued to stand against what he believed was unjust.
He had an opportunity to change sides. He chose not to.
The Mumbai High Court itself has made the position clear: the CBI investigation is not a finding of guilt, and nobody should be treated as an accused unless the investigation produces sufficient grounds for reasonable suspicion.
There is a difference between talking about “proof” and actually presenting proof.
I am not asking anyone to blindly defend anyone. I am asking for evidence. Let the investigation establish the truth not social-media narratives.
@AUThackeray
#DishaSalian #LetTheEvidenceSpeak #DueProcess #RuleOfLaw #TruthThroughEvidence
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसताना���ी माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबा��ोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुम���ा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
महाराष्ट्रात बहुभाषिक राहतात
महाराष्ट्र राज्य बहुभाषिक नाही! महाराष्ट्राची भाषा अजून तरी मराठीच आहे!
दोन वाक्यां(दाव्यां)मध्ये प्रचंड फरक आहे!
#Marathi#Maharashtra