#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका #Engineer भरतीत घोटाळा/सेटिंग झाली आहे का?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेबाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे.
काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. परीक्षेतील मार्क वाढवण्यासाठी यांचे बोलले सुरू आहे.
BMC भरतीत घोटाळा होऊ नये म्हणून फक्त #TCS_ION ची परीक्षा केंद्रे द्यावे म्हणून आपण मागणी करतो आहोत, उमेदवारांनी आंदोलने सुद्धा केली परंतु तरीही BMC प्रशासन नमले नाही.
BMC आणि सरकारने या ऑडिओ क्लिपला गांभीर्याने घेऊन याची पोलिसांमार्फत चौकशी करावी. असे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण करून परीक्षा घ्याव्यात ही नम्र विनंती.
@mybmc@Dev_Fadnavis@AUThackeray@mieknathshinde @Dhananjay_AAP @AjitPawarSpeaks@RRPSpeaks@ShelarAshish@Awhadspeaks@degree_holders@CMOMaharashtra@PatilKailasB@AbhiPawarBJP @harshsapkal .
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता भरतीत काही लोक गैरप्रकार करण्याच्या तयारीत आहेत.
तशा स्वरूपाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या दलालांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
@mybmc@CMOMaharashtra
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षे बाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप आहे. परीक्षा मधील मार्क वाढवणे या संदर्भात यांचे बोलले सुरू आहे. हे प्रकरण BMC आणि सरकारने गांभीर्याने घेऊन असले मार्क वाढवण्याचे प्रकार होऊ देऊ नका आणि मागील परीक्षे मध्ये पण असे काही झाले आहे का यांची चौकशी करा.
https://t.co/CsNzvEf8S6
https://t.co/CsNzvEf8S6
@mybmc@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@ShelarAshish@RRPSpeaks@degree_holders
सहा महिने काम करून #मुख्यमंत्री_युवा_कार्य योजनेतील उमेदवार आता "कायमस्वरूपी नोकरी" मागत आहेत.
राज्य सरकारने अशा मागण्यांकडे लक्ष देऊ नये. कारण लाखो प्रामाणिक बेरोजगार अनेक वर्षांपासून नोकर भरतीची तयारी करत आहेत, आमच्या हक्काच्या नोकऱ्या सहा महिने काम करणाऱ्यांना दिल्यात तर तो आमच्यावर अन्याय असेल.
मुख्यमंत्री_युवा_कार्य योजनेला आम्ही आधीपासूनच विरोध केला आहे, कारण ही सहा महिन्याची कंत्राटी भरती आहे.
महाराष्ट्रात सध्या प्रचंड #बेरोजगारी असून, मुख्यमंत्री युवा कार्य योजना हा त्यावर उपाय नाही. ही योजना तत्काळ बंद करून, कायमस्वरूपी नोकर भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@RRPSpeaks@AbhiPawarBJP @harshsapkal
खाजगी परीक्षा केंद्र देऊन , पेपर फुटीस , गैरप्रकारास चालना देऊन , विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून केलेले पाप कुठल्याच कुंभमेळ्यात स्नान करून पण फिटणार नाहीत @mybmc , हे कर्म कधी ना कधी तुमच्यावर पलटेलच हा श्राप आहे विद्यार्थ्यांचा 🛑
#BMC_At_TCS_Ion_Centre
जय महाराष्ट्र !
आज राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आगामी अभियंता पदांची परीक्षा फक्त TCS Ion Digital च्या केंद्रांवर घेण्याबाबत आदेश देण्यासाठी राज्य सरकारला पत्र देऊन लोकशाही मार्गाने आपल्याला “न्याय” मिळावा यासाठी प्रयत्न केलेल्या तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करून मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
आजच्या दिवसातील घडामोडी, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या शिष्टमंडळाची चर्चा
आणि “नेक्स्ट स्टेप्स” याबाबत सविस्तर माहिती उद्या ट्विटर वर देण्यात येईल.
एका वाक्यात सांगायचे तर महानगर पालिकेचे काही “मग्रूर + निर्बुद्ध” अधिकारी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, कारण त्यांना सागर बंगल्यावरील मंत्र्याचा आशीर्वाद आहे अशी आमची भावना होऊ लागली आहे !
“न्यायासाठी” सांविधानिक चौकटित लढाई चालू राहील
हर जोर जुलूम के टक्कर मे, संघर्ष हमारा नारा है 🇮🇳 !
@ArvindKejriwal@AUThackeray @harshsapkal
@degree_holders@Mpsc_Andolan@AAPMaharashtra@AamAadmiParty
#BMC_At_TCS_Ion_Centre #TCS_ion_digital
प्रति,
मा. शिवेंद्र राजे भोसले
सार्वजनिक बांधकाम मंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय: सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या वेटिंग लिस्टसाठी मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी.
महोदय,
२०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. सदर भरतीचा निकाल लागून पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. मात्र, अनेक उमेदवारांनी इतर विभागात निवड झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरी स्वीकारलेली नाही.
त्या रिक्त झालेल्या पदांसाठी वेटिंग लिस्टमधील पात्र उमेदवारांना संधी मिळायला हवी होती. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा प्रक्रिया स्थगित राहिली आणि त्यामुळे अनेक पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित राहिले आहेत.
सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाची वेटिंग लिस्ट २४ फेब्रुवारी २०२५ रोजी संपली आहे. सदर वेटिंग लिस्टला किमान १ वर्षांची मुदतवाढ देऊन रिक्त जागा भराव्यात ही बेरोजगार अभियंत्यांची मागणी आहे.
हा निर्णय घेतल्यास, एकीकडे शासनाच्या रिक्त जागा भरल्या जातील आणि दुसरीकडे पात्र उमेदवारांना न्याय मिळेल. त्यामुळे या मागणीचा सहनभूतिपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
प्रत,
मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री : महाराष्ट्र राज्य
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@degree_holders@Mpsc_Andolan@AAPMaharashtra@mahapwdofficial #AAP
मुंबई महानगरपालिका चे अधिकारी आपण परीक्षा केंद्र निवडताना review पहिले नाहीत का?
तुमचा नक्की विश्वास कोणावर आहे, जे विद्यार्थी भावी अधिकारी म्हणून निवडले जातील त्यांच्यावर की बाकी कोणावर.....???
एवढा अहंकार कामाचा नाही साहेब नम्र विनंती 🙏
#BMC_At_TCS_Ion_Centre
अश्या सेंटर ला परीक्षा घेण्या पेक्षा घरीच परीक्षा घ्या,@mybmc 900-1000 रुपये भरून असे परीक्षा केंद्र भेटत असेल तर एक्साम घेताच कशाला..... डायरेक्ट भरती करा..सामान्य विद्यार्थ्यांची एकच तर मागणी आहे TCS ION सेंटर, ते ही आपण देऊ शकत नाही कसली आर्थिक राजधानी?
#BMC_At_TCS_Ion_Centre
मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, उपअभियंता या पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. ह्या परीक्षा अधिकृत आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज राज्याभरातुन अनेक विद्यार्थ्यांमार्फत आझाद मैदान येथे आंदोलन पुकारण्यात आले.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने या आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, अभिषेक शिर्के, सिद्धेश धाऊस्कर, अश्विनी पवार, धनश्री कोलगे, सिद्धेश शिंदे, जय सरपोतदार व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते